Breaking News

महत्वाच्या बातम्या

विवेक पाटलांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

पनवेल ः प्रतिनिधी कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे चेअरमन आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला आहे. त्यामुळे पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम 21 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. विवेक पाटलांच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि. 14) सुनावणी होणार होती, पण सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अ‍ॅड. …

Read More »

मोदी सरकारकडून प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचे काम -आमदार प्रशांत ठाकूर; असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी केंद्राचे पनवेलमध्ये उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत महत्त्वाकांशी योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या धोरणांतर्गत अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी करीत तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचे काम मोदी सरकारमुळे होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

…तर आम्ही पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू -अमित शाह

पणजी ः काश्मिरातील नागरिकांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांना मदत करणे न थांबवल्यास सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला दिला आहे. आम्ही कोणीही आमच्यावर केलेले हल्ले खपवून घेत नाही हे यापूर्वी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने सिद्ध केले आहे. त्यामुळे जर तुम्ही सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले किंवा काश्मीरमधील आमच्या नागरिकांना मारण्याचा …

Read More »

माथेरानमध्ये युनियन बँकेचा भोंगळ कारभार; खातेदार त्रस्त

माथेरान : प्रतिनिधी युनियन बँकेच्या माथेरान शाखेची ऑनलाईन सेवा वारंवार बंद असते, तसेच नेमक्या वीकेण्डला बँकेचे एटीएम बंद पडत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक त्रस्त झाले आहेत. माथेरानमध्ये एकमेव असलेल्या युनियन बँकेच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिक व पर्यटक काही वर्षापासून हैराण झाले आहेत. माथेरानमध्ये या बँकेचे  एकमेव एटीएम केंद्र आहे. …

Read More »

परतीच्या पावसामुळे महावितरणचे नुकसान

कर्जतमध्ये रोज सायंकाळी वीजपुरवठा होतोय खंडित कर्जत : प्रतिनिधी परतीच्या पावसामुळे महावितरणचे कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, रोज सायंकाळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे, ऑक्टोबर महिना सुरू आहे, त्यामुळे दिवसभर उकाड्याने कर्जतमधील नागरिक हैराण होत आहेत. सध्या रोज सायंकाळी आकाश …

Read More »

रायगडातील ऐतिहासिक स्थळे पर्यटकांसाठी खुली

अलिबाग ः प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके व स्थळे  पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोनाविषयक नियमांचे पालन करून ती पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. रायगडचे  जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी त्यास मान्यता दिली आहे. महाड तालुक्यातील अचलोल येथील सोनगड (सोनगिरी), अलिबाग तालुक्यातील आगरकोट येथील कॅथेड्रल, चौकोनी किल्ला …

Read More »

पांढर्या कांद्याला मानांकन मिळाले, पुढे काय?

अलिबागच्या प्रसिद्ध पांढर्‍या कांद्याला केंद्र सरकारने  भौगोलिक मानांकन (जीआय) देण्यास मान्यता दिली आहे.  यामुळे या कांद्याला आता वेगळी ओळख मिळेल. अलिबाग तालुक्यातील शेतकर्‍यांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कांद्याला देशासह जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवणे शक्य होणार आहे. या मानांकनामुळे पांढर्‍या कांद्याला वेगळी ओळख मिळेल, हे खरं आहे. परंतु शेतकर्‍यांना त्याचा फायदा काय. मानांकन …

Read More »

मुरूडमधील टपरीधारकांना शासनाने सोडले वार्यावर

मुरूड : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात मुरूड समुद्रकिनारी असलेल्या 44 टपरीधारकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्याची शासन दरबारी नोंद होऊन वर्ष उलटून गेले, तरी कुठलीही मदत न मिळाल्यामुळे हातावर पोट असणार्‍या लोकांमध्ये नाराजी व संताप निर्माण झाला आहे. मुरूड समुद्रकिनारी वडापाव, चायनिज, नारळ पाणी, स्नॅक्स सेंटर, भेळपुरी, पाणीपुरी व अन्य …

Read More »

कर्जत पालिकेचे रोड व्हॅक्युम स्विपर मशीन एक वर्षानंतर दिसले रस्त्यावर

कर्जत : प्रतिनिधी नगर परिषदेने आरोग्य विभागासाठी एक वर्षापूर्वी  रोड व्हॅक्युम स्विपर मशीन घेतले होते. तिचे लोकार्पणही झाले, मात्र ती रस्त्यावर कधीच दिसली नव्हती. तब्बल एक वर्षांनंतर ही मशीन बुधवारी (दि. 13) कर्जत शहरातील रस्ते साफ करताना दिसले. कर्जत नगर परिषद हद्दीतील बहुतांश रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. हे रस्ते स्वच्छ …

Read More »

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाडमध्ये सफाई कामगारांचा सन्मान

महाड : प्रतिनिधी राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाडमधील सफाई कामगारांचा भाजपकडून सन्मान करण्यात आला. महाडमध्ये 22 जुलै 2021 रोजी महाप्रलय आला होता. त्यानंतर संपूर्ण शहरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता महाड शहर स्वच्छ केले …

Read More »