मुंबई : प्रतिनिधीमुंबईत मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचून मुंबईची तुंबई झाली. चेंबूरमध्ये डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा बळी गेला आहे. याचबरोबर विक्रोळीत एक दुमजली इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय भांडूपमध्ये भिंत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते पडसरेत खावटी अनुदान योजनेचा शुभारंभ
सुधागड : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक प्रादेशिक कार्यालय जव्हार व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य वस्तूचे किटवाटप वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ पेण-सुधागड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ …
Read More »पालीची नळपाणीपुरवठा योजना अडकली लालफितीत
दुषित पाण्याचा पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली गावाची सुमारे 12 कोटींची शुद्ध नळपाणीपूरवठा योजना लालफितीत अडकून पडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पाली शहराला अंबा नदिचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पुरविले जाते. तब्बल 15 हजारांहून अधिक लोक या पाण्यावर अवलंबून आहेत. पालीकरांना दूषित पाणी …
Read More »कोरोना काळातील मृत पोलीस पाटलांच्या कुटूंबीयांना मदत
खालापूर, मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुका पोलीस पाटील संघ व पोलीस ठाण्याच्या वतीने कोरोना काळात मृत झालेल्या पोलीस पाटलांच्या ढेकू येथील सम्राट सुर्वे यांच्या कुटुंबाला एक लाखाचा चेक देण्यात आला. खालापूर तालुका पोलीस पाटील संघाची सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 17) सकाळी 11 वाजता खालापूर पोलीस ठाण्यात खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी …
Read More »मुरूड तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी
सर्वत्र पाणी साचल्याने नागरिक चिंतेत मुरूड : प्रतिनिधी मुरूडमध्ये शनिवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली असून रविवारीही संततधार सुरू होती. रस्ते, बागायतींमध्ये सर्वत्र पाणी साचले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन आधीच खूप नुकसान झाले आहे असाच पाऊस सुष् राहिला तर करायचे काय या विवंचनेत सर्व …
Read More »अनाथ, वंचित बालकांना ‘ग्राम संवर्धन’कडून साहित्य
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे हितचिंतक किशोर पाटील यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथील ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या अनाथ, वंचित आणि आदिवासीं बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी चालविल्या जाणार्या बालग्राम मधील बालकांना दैनंदिन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू ,वह्या,पेन, चित्रकला साहित्यासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक …
Read More »‘होप मिरर’तर्फे तळोजात वृद्धांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त होपमिरर फाऊंडेशनने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत तळोजा एमआयडीसी येथील परमशांती वृद्धाश्रम यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यामध्ये टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, वॉशिंग पावडर इत्यादी वस्तू देण्यात आल्या. संस्थेचे संस्थापक रमजान शेख यांनी त्यांच्या टीम सदस्यांसह आश्रमातील वृद्धांना आवश्यक किट्सचे योग्य वाटप केले. ते म्हणाले की, आम्हाला …
Read More »पनवेल, नवी मुंबईत परिसरात जोरदार पाऊस
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरात मागील काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दमदार एन्ट्री केलेली पहावयास मिळाली. रात्रीपासूनच पनवेल तालुका तसेच नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. शनिवारपासून सुरू झालेला पाऊस रविवारीही (दि. 18) धो-धो कोसळत होता. नवी मुंबई, पनवेल परिसरात सलग दुसर्या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावली. …
Read More »पांढरवेढा ः एका जंगलातील रहस्यमयी गोष्ट
श्रीवर्धनमधील तरुणांनी साकारला लघुचित्रपट श्रीवर्धन : प्रतिनिधी निसर्गाचे वरदान लाभलेल्या घनदाट जंगलात दडलेली नैसगिर्क संपत्ती लाटण्यासाठी मानव कोणत्याही थराला जातो. त्यासाठी दुर्मीळ जनावर, दुर्मीळ वनस्पती आदींची कत्तल केली जाते. इतकाच नाही तर लालसेपोटी यासाठी मानव मानवाचादेखील बळी घेण्यास कमी करत नाही. त्याचप्रमाणे एका घनदाट जंगलातील विहिरीतून सोन्याची नाणी काढण्यासाठी गावातील …
Read More »वारकरी संप्रदायाकडून राज्य सरकारचा निषेध
खालापूरमध्ये तहसीलदारांना निवेदन खालापूर ः प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरची पायी वारी दिंडी रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा विश्व हिंदू परिषद आणि समस्त वारकरी संप्रदायाकडून निषेध करण्यात आला. वारकर्यांनी भजन करीत रस्त्याने वारीमधून जात आंदोलन केले आणि तहसीलदारांना निवेदन सादर केले. पायी वारीला विरोध, वारकर्यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper