Breaking News

महत्वाच्या बातम्या

गाढी नदी परिसरात वृक्षारोपण; वकील महिलांचा उपक्रम

पनवेल : वार्ताहर पनवेलमधील वकील महिला एकत्र येऊन त्यांनी पनवेलमधील गाढी नदी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम निसर्ग मित्र पनवेल संस्थेच्या सहकार्याने आयोजित केला होता. सुरुवातीला भरत ठाकूर यांनी निसर्ग मित्र संस्थेचा सर्वांना परिचय करून दिला. महिला वकील यांनी आणलेल्या 14 ते 15 वेगवेगळ्या वृक्षांची म्हणजेच वड, पिंपळ, जांभूळ, आंबा इत्यादीचे वृक्षारोपण …

Read More »

तिसर्या लाटेला थोपविण्यासाठी उरणमध्ये सज्जता

शहरासह तालुक्यात कोरोनाच्या नियंत्रणासाठी जनजागृती उरण : वार्ताहर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना शासनाच्या आकडेवारीनुसार पुढील काही आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. उरण तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना विषय नागरिकांमध्ये जागृकता वाढविण्यासाठी उरण येथील तहसील कार्यालय, उरण पंचायत समिती, डीओएचसी तसेच उरण मेडीकल असोसिएशन यांचेमार्फत जनजागृती …

Read More »

ओबीसींसाठी रस्त्यावर उतरणार : विजय वडेट्टीवार

पुणे ः प्रतिनिधीसर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत. ओबीसींसाठी संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचे राज्याचे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. ओबीसी मंत्रालयाला स्टाफ नसणे, निधीची तरतूद नसणे चिंताजनक असून अजित पवार व धनंजय मुंडेंकडे याबाबत वारंवार विचारणा करावी …

Read More »

जम्मू-काश्मीर : दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

नवी दिल्ली ः जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. हल्ल्यासाठी आणलेली आयईडी स्फोटके पोलिसांनी जप्त केलीत. या प्रकरणी लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी मध्यरात्री जम्मूतील एअर फोर्स स्टेशनवर ड्रोनहल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर आणखी एका मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले. या …

Read More »

राज्यातील निर्बंध बदलले

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरियंटचा धोकादेखील वाढू लागल्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसर्‍या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे. जमावावर बंदी कोविड-19 जोपर्यंत अस्तित्वात असेल, तोपर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर पूर्णपणे …

Read More »

पुनश्च निर्बंध

गेल्या दोन वर्षांपासून उद्भवलेली कोरोना महामारी काही केल्या पाठ सोडायला तयार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव सरला असे वाटत असतानाच हा विषाणू नवनवी रूपे घेऊन अधिक घातक पद्धतीने आक्रमण करीत आहे. आपल्या देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू होत आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन-अनलॉकचा लपंडाव रंगताना …

Read More »

लसीकरण मोहिमेत योगदान द्या!

पंतप्रधानांचे ‘मन की बात’मधून देशवासीयांना आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी कोरोनाच्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे आवर्जून सांगितले, तसेच लसीसंबंधीच्या अफवांपासून दूर राहून लसीकरण मोहिमेत आपले योगदान द्या, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

इगतपुरीत रेव्ह पार्टीचा धांगडधिंगा

22 जण ताब्यात; सिनेसृष्टीतील चार महिलाही सहभागी नाशिक ः प्रतिनिधीनाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे रविवारी (दि. 27) पहाटेच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलिसांनी एका हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीवर धाड टाकली. मुंबई-आग्रा महामार्गावरील मानस रिसॉर्टमधील स्काय ताज व्हिलातील दोन बंगल्यांत रेव्ह पार्टीचा धांगडधिंगा सुरू होता. या धाडीत ड्रग्ज व हुक्का सेवन करताना 22 …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणाचे राजकारण

प्रवीण दरेकरांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्र्यांना आदळआपट वाटते. मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल, तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणाचे राजकारण करीत असल्याची टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी (दि. 27) मुंबईत शिवसंग्राम संघटनेचे नेते …

Read More »

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आरक्षण गेले

नागपूर ः प्रतिनिधीमराठा आरक्षणापाठोपाठ राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत बनला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, शनिवारी (दि. 26) राज्यभरात चक्का जाम आंदोलन केले.  नागपुरात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात सहभागी होत महाविकास आघाडी सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला. …

Read More »