अलिबाग ः प्रतिनिधीचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष निधी चौधरी यांनी रविवारी (दि. 16) रात्री उशिरा जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकार्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा समन्वय अधिकारीसर्जेराव …
Read More »चक्रीवादळामुळे रायगडची वाताहत
खोपोली : प्रतिनिधीचक्रीवादळाचा खालापूर तालुक्यासह रायगड जिल्ह्याला प्रचंड फटका बसला असून, अनेक घरांचे पत्रे उडून नुकसान झाले, तर आंबा उत्पादक, वीटभट्टी व्यावसायिकांचीही हानी झाली आहे.चक्रीवादळाने रविवारी संध्याकाळपासून खालापुरात हजेरी लावली. सुरुवातीला सौम्य स्वरूपात वारा व पाऊस सुरू झाला. आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. पाऊस आणि वार्याचा जोर …
Read More »संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार..!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंजार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसच्या धोरणानुसार स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांनी फाजल अली कमिशनची नेमणूक केली. …
Read More »काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांचे निधन
पुणे ः प्रतिनिधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे काँग्रेस नेते व खासदार राजीव सातव यांचे रविवारी (दि. 16) पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. सातव यांना 22 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू …
Read More »ग्रामीण भागातील कोरोना फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता शहरांसोबत ग्रामीण भागातही वाढताना दिसत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता शहरांसोबत ग्रामीण भागात कोरोना फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीत देखभाल, स्क्रिनिंग आणि आयसोलेशनवर भर देण्यात आला …
Read More »मराठा आरक्षण : ‘मविआ’ची होणार पोलखोल, कायदेतज्ज्ञ समितीची भाजपकडून स्थापना, चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केलाय. आरक्षणाचा मुडदा पाडून ते मातीमोल केले, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला, तसेच महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठे कमी पडले याची पोलखोल करण्यासाठी आम्ही लवकरच कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहोत, अशी माहितीही चंद्रकांत …
Read More »राज्यात चक्रीवादळाचा रुद्रावतार; विविध ठिकाणी पडझड; नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
अलिबाग ः प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाने देशाच्या दक्षिण किनारपट्टीपासून ते कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. हे वादळ गुजरातकडे जाणार असून या मार्गातील रायगड जिल्ह्यालाही त्याचा तडाखा बसणार आहे. मागील वर्षाचा निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव असल्यामुळे रायगडकरांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. जीवितहानी होऊ नये म्हणून 2254 …
Read More »वावळोली कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून ’एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत वावळोली कोविड केअर सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व औषधे भेट देण्यात आली. तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी स्वेच्छेने निधी गोळा केला आणि त्यातून वावळोली कोविड केअर सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व औषधांची भेट दिली. तहसीलदार दिलीप …
Read More »पाली प्राथमिक आरोग्य केंद्रास संपूर्ण किटसह ऑक्सिजन सिलेंडर भेट
कोरोना संकटात बल्लाळेश्वर देवस्थानचा मदतीचा हात पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात सामाजिक बांधिलकी जपत येथील बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे पाली प्राथमिक आरोग्य केंद्राला संपूर्ण किटसह तीन ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले आहेत. कोरोना संकटात बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा …
Read More »पालीतील जनता कर्फ्युला प्रतिसाद
औषधांची दुकाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यात कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालीमध्ये शनिवारपासून नऊ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. त्याला प्रतिसाद देत रविवारी (दि. 16) दुसर्या दिवशीही औषधांची दुकाने सोडून कडकडीत बंद पाळण्यात आला होता. करोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी पालीमध्ये शनिवार (दि. 15) पासून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper