पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यासह करंजाडे वसाहतीत हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असतानादेखील नियमांचे उल्लंघन सर्रास केले जात असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. करंजाडे वसाहतीमध्ये गेल्या वर्षभरात एकूण 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यामुळे आता तरी नागरिकांनो सुधारा, असे …
Read More »रेमडेसिवीरच्या नावाखाली फसवणूक; पनवेल पोलिसांकडून त्रिकूट गजाआड
पनवेल : वार्ताहर रेमडेसिवीर इंजेक्शन देतो असे सांगून फसवणूक करणार्या त्रिकुटाला पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सहआयुक्त डॉ. जय जाधव, उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 83 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. साक्षीदारांचे काका कोरोना झालेला असल्याने ते पुणे …
Read More »बीड खुर्दमधील महिलांची पाण्यासाठी वणवण; सरपंचांना घातले साकडे
खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील बीडखुर्द गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी (दि. 27) ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन, आमचा पाण्यासाठीचा वनवास कधी संपणार?, अशी विचारणा केली. या वेळी आजपासून गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती सरपंच कविता पाटील यांनी दिली. …
Read More »कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर पोलिसांचा बडगा; 25 दिवसांत 20 हजार जणांवर कारवाई, 50 लाखांची दंडवसुली
अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलिसांनी आताकारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली. गेल्या 25 दिवसात करोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्या 20 हजार जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या बेजबाबदार नागरिकांकडून तब्बल 50 लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे.रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. करोनाबाधितांची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. …
Read More »सुधागडातील रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; आमदार रविशेठ पाटील यांच्या पाठपुराव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रतिसाद
पाली, पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांच्या पाठपुराव्याने केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पेण विधानसभा मतदार संघातील रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे. पेण तालुक्यातील वाशी-वढाव-काळेश्री रस्त्याकरिता 4.86 कोटी व सुधागड तालुक्यातील उद्धर-कुंभारघर-महागाव-चंदरगाव-हातोंड-गोंदाव रस्त्यासाठी 6.76 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार रविशेठ पाटील यांनी नुकताच नवी …
Read More »सडेतोड उत्तर
महाविकास आघाडी सरकारची तळी उचलणारी काही मंडळी आहेत. त्यांनी फडणवीस-दरेकर यांच्याविरोधात खोट्यानाट्या कंड्या पिकवल्या. ही मंडळी म्हणजे एक प्रकारची फेक नॅरेटिव्ह गँग आहे आणि भाजपचे नेते त्यांना पुरेपूर ओळखून आहेत. दुर्दैवाने विचारशील असूनही रिबेरोसाहेबांना मात्र या फेक नॅरेटिव्ह गँगबद्दल काहीच कल्पना नसावी! म्हणूनच त्यांनी वृत्तपत्रात लेख लिहून फडणवीस यांच्यावर तोंडसुख …
Read More »पनवेल मनपा हद्दीतील बाधित इमारती कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले
पनवेल ः प्रतिनिधी येथील महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना, नागरिकांचा प्रतिसाद तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील इमारतींमधील रहिवाशांनी शासन व मनपाच्या सूचनांचे काटेकोर पालन केल्याने महानगरपालिकेच्या खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल नोडमधील प्रतिबंधित क्षेत्रातील इमारतींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये दुसर्या लाटेत एकूण 504 प्रतिबंधित क्षेत्रापैकी 389 इमारती कोरोनामुक्त …
Read More »तारा भाजपतर्फे मोफत सॅनिटायझर फवारणी
पनवेल ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्त्यांकडून तारा गाव परिसरात मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल तारा ग्रामस्थांकडून भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले. तारा गाव बूथ अध्यक्ष जितेंद्र पाटील, पनवेल तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष दिनेश पाटील, तारा गाव …
Read More »पनवेलमध्ये लसीकरण केंद्रे निश्चित करावीत
भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे यांचे निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त देशभरात सध्या कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 1 मेपासून सुरू होणार्या 18 वर्षांवरील नागरिकांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी लसीकरण केंद्र निश्चित करण्याबाबत भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख …
Read More »कोरोना संकटात गरजूंना मदतीचा हात
पंचशीलनगर सामाजिक संस्थेतर्फे अन्नदान पनवेल ः वार्ताहर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्यामुळे गोरगरीब लोकांचे रोजगार बंद पडले आहेत. याची सामाजिक जान ठेवत पंचशीलनगर रहिवासी सामाजिक संस्थेमार्फत गरीब, गरजूंना खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाची माहिती देताना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper