Breaking News

महत्वाच्या बातम्या

वीकेण्ड लॉकडाऊनचे उल्लंघन दोन लाख 10 हजारांचा दंड वसूल

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2मध्ये पोलीस प्रशासनाने वीकेण्ड लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून दोन लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोन लाख 13 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासन आणि शासनातर्फे करण्यात येत आहे, …

Read More »

समस्या सोडविण्यासाठी संपर्क करा -विक्रांत पाटील

पनवेल : वार्ताहर माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने काम करीत असणारे कार्यक्षम माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील हे आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्यास नेहमीच तत्पर असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना रक्त तसेच प्लाझ्मा आवश्यक गोष्ट असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून व इतर संपर्कातून गरजवंतांना त्वरित मदत करीत आहेत. त्यासाठी त्यांनी …

Read More »

उरण शहरात कडक पोलीस बंदोबस्त

उरण : वार्ताहर राज्यात गुरुवार (दि. 22) पासून नवीन कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उरणमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्याकरिता राज्यात कडक लॉकडाऊन करून त्याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नवीन नियमावली नुसार सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत किराणा, दुध विक्रीची …

Read More »

औद्योगिक क्षेत्रातील शेकडो कामगार बेरोजगार; पनवेल परिसरातील कामे ठप्प

पनवेल : वार्ताहर सद्य स्थितीत कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती अधिक गंभीर होत चालले आहे. रुग्णांना लागणार्‍या ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी हॉस्पिटलला लागणार्‍या ऑक्सिजन व्यतिरिक्त औद्योगिक ऑक्सिजन पुरवठा शासनाने बंद केल्यामुळे पनवेल आणि परिसरातील कटिंग आणि फेब्रिकेशन उद्योग पूर्णतः ठप्प झालेले आहेत. त्यामुळे या व्यवसाय मध्ये काम करणारे शेकडो कामगार बेरोजगार झाले …

Read More »

पेणमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय 15 दिवस बंद

कोरोना महामारीचा बसला फटका पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राज्य शासनाच्या आदेशानुसार व कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यास काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे आरटीओची ऑनलाइन कागदपत्रे पूर्तता करणारे केंद्र व्यवसायिकांना कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसलेला दिसून येत आहे. शासनाच्या आदेशानुसार पेण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय …

Read More »

…अन् जिल्हा महिला व बालविकास अधिकार्यांनी रोखले बालविवाह

अलिबाग : जिमाका टाळेबंदी लागू असतानाही रायगड जिल्ह्यात विवाह सोहळे सुरू असून चक्क बालविवाहांच्या घटनाही समोर येत आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे बालकांचे विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रायगड जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तातडीने हालचाली करुन हे बालविवाह रोखले. तसेच या बालकांचे आई-वडील व नातेवाईकांना समज देण्यात आली व योग्य …

Read More »

पालीतील व्यापार्यांना ऑनलाइन गंडा

पोलिसांचे सतर्क राहण्याचे आवाहन पाली : प्रतिनिधी आर्मीचा कॅम्प पालीजवळ लागला आहे, त्यासाठी दूध, दही, पनीर, किराणा, जेवण, भाजीपाला आदी पाहिजे असे फोनवर सांगून एटीएम फोटो आणि पिन नंबर घेवून पालीतील व्यापार्‍यांची ऑनलाइन फसवणूक केली जात असल्याच्या घटना बुधवारी (दि. 21) समोर आल्या आहेत. यासंदर्भात व्यापार्‍यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पाली …

Read More »

जेएसडब्ल्यूकडून 170 मेट्रिक टन ऑक्सिजनपुरवठा

पेण : प्रतिनिधी सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीकडून मुंबई महानगर क्षेत्रासाठी 170 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात असल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी नारायण बोलबंडा यांनी दिली. ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांची होणारी फरफट थांबवण्यासाठी औद्योगिक कंपन्यांमध्ये तयार होणारा ऑक्सिजन आरोग्य …

Read More »

धवनकडून आयपीएलमध्ये पाच हजार धावांचे ‘शिखर’ सर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएल 2021च्या 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला. मागील मोसमातील अंतिम सामन्यांसह दिल्लीला सलग चार सामन्यांमध्ये मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता, परंतु दिल्लीने या मोसमात बरोबरी साधली. दिल्लीच्या विजयात अमित मिश्रा, शिखर धवन हे खेळाडू नायक ठरले. धवनने आपल्या 45 धावांच्या …

Read More »

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशासाठी आग्रही असणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी (आयसीसी) टेन-10 म्हणजेच 10 षटकांच्या सामन्यांच्या आयोजनाचा प्रस्ताव उपयुक्त ठरू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) यांनीही ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या पुनरागमनाला हिरवा कंदील दाखवल्याने आता आयसीसी यावर कशा प्रकारे तोडगा …

Read More »