उपचाराच्या दिरंगाईने रुग्णाची प्रकृती चिंताजनक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले आहे. जसा कोरोना वाढतोय तसा त्याविषयीचा गैरसमजही बळावतोय. लक्षणे असूनही काही नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी घाबरतात. बरेचदा दुखणे अंगावर काढतात आणि जेव्हा त्रास वाढतो तेव्हा अशा रुग्णावर अतिदक्षता विभागाची गरज लागते. त्यामुळे कोरोनाविषयीची …
Read More »अलिबागच्या हॅम रेडियो संघाचे सुयश
देशात मिळवला तृतीय क्रमांक अलिबाग ़: प्रतिनिधी आपत्ती काळात हॅम रेडीओ ऑपरेटर्सनी जास्तीत जास्त अंतरापर्यंत संपर्क साधण्याची क्षमता आजमविण्यासाठी अमॅच्युअर रेडीओ सोसायटी ऑफ इंडियाने (एआरएसआर) अखिल भारतीय स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत अलिबागहून सहभागी झालेल्या संघाने एकूण 102 क्यूएसओ गुण मिळवून देशात तृतीय क्रमांक मिळवला. एआरएसआर दर वर्षी हॅम …
Read More »बालरोगतज्ज्ञांनी दिले तीन नवजात बालकांना जीवदान
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्ण मयत होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीमवर आनंदाची बाब म्हणजे कमी वजनाच्या तीन नवजात बालकांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांनी जीवदान दिले आहे. तीनही बालकांवर उपचार करून त्यांचे वजन वाढल्यानंतर त्यांना सुखरूप घरी सोडण्यात डॉक्टरांना यश आले आहे. अलिबागच्या …
Read More »वन्यजीवांचे माहेरघर नरनाळा अभयारण्य
चैत्र पाडव्याचा साडेतीन मुहूर्ताचा दिवस, माझ्यासाठी एक पर्वणीच घेऊन आला होता. नरनाळा किल्ला पाहून मी अभयारण्य पहाण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी शून्य होती. मी एकटाच पर्यटक व सोबत गाईड आणि फॉरेस्ट शिपाई असे तिघेच जण नरनाळा अभयारण्याच्या परिसरात होतो. हीच संधी होती मनसोक्त हुंदडायची, जंगलाच्या निसर्गरम्य वातावरणात रमण्याची. पाय …
Read More »दारू समजून सॅनिटायझर प्यायल्याने सात जणांचा मृत्यू
यवतमाळ ः प्रतिनिधीदारूचे व्यसन जडलेल्या काहींना दारू समजून सॅनिटायझर प्यायल्याने आपला जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडला आहे.यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. सात जणांपैकी तिघांचा घरी, तर अन्य व्यक्तींचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने बंद असल्याने राहवले न गेल्याने काही जणांनी दारू …
Read More »कोरोना लस, ऑक्सिजन, उपकरणांवरील सीमा शुल्क माफ
मोदींचा दिलासादायक निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्र सरकारने कोरोनावरील लशी आणि ऑक्सिजनवरील आयातीवर लागणारे सीमा शुल्क तसेच आरोग्य सेस तीन महिन्यांसाठी माफ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीनंतर लगेचच हा निर्णय जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या दुसर्या लाटेत देश मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. त्यामुळे या …
Read More »नाशिक दुर्घटनेची दिल्लीत पुनरावृत्ती
25 रुग्णांचा करुण अंत नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करीत असलेल्या दिल्लीत भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून, ऑक्सिजन तुटवड्यामुळे मृत्यूचे तांडव सुरूच आहे. नाशिकच्या घटनेच्या स्मृती जाग्या करणारी घटना येथे घडली आहे. ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्याने एकाच रुग्णालयातील 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दिल्लीत ऑक्सिजनअभावी 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याची …
Read More »अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल
मालमत्तांवर सीबीआयचा छापा मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप प्रकरणानंतर आता मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. या प्रकरणी तपास करीत असलेल्या सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एफ आयआर दाखल केला आहे. इतकेच नाही तर …
Read More »सिंगापूरमधून करणार 3500 व्हेंटिलेटर्स एअर लिफ्ट
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सिंगापूरमधून पुण्यातील उद्योजक सुधीर मेहता यांच्या सहकार्याने आठ हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व साडेतीन हजार व्हेंटिलेटर्स एअर इंडियाच्या माध्यमातून एअर लिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व गोष्टी भारतात आणण्यासाठी परवानगी दिल्याचेही पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. सुधीर मेहता …
Read More »अनाथांच्या ‘संवेदना’ जाणून आर्थिक मदत
पनवेल : प्रतिनिधी शांतीवन आश्रमातील अनाथ वंचित मुलांसाठी अन्नधान्य आणि किराण्याच्या मदतीची गरज असल्याचे समजल्यावर पनवेलच्या संवेदना चॅरिटेबल संस्थेतर्फे 33,500 रुपयांचा धनादेश शांतिवन आश्रमाला देण्यात आला. ही माहिती अध्यक्ष सुनेत्रा गवाणकर यांनी दिली. अनाथ वंचित मुलांसाठी दोन घास हवे आहेत आणि यासाठी शांतिवनला अन्नधान्य आणि किराणा साठी मदतीची गरज आहे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper