7th March 2021
महत्वाच्या बातम्या
पनवेल : भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांनी पनवेल हॉस्पिटलमध्ये जाऊन सपत्नीक कोरोना लस टोचून घेतली. डॉ. कारंडे यांनी हे लसीकरण केले. या वेळी देशमुख यांनी इतरांनाही कोरोना लस घेण्याचे आवाहन केले.
Read More »
7th March 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी मैदानावर सोसायटी क्रिकेट क्लबतर्फे क्रिकेट कोचिंग अॅकॅडमी सुरू करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी उद्योजक राजू गुप्ते, किरण मनोरे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, सुनील मोरे, …
Read More »
7th March 2021
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
अहमदाबाद ः वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांत भारतीय फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने इतक्या विकेट घेतल्या की, पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अक्षरने स्वत:च्या नावावर केला. अक्षरने तीन सामन्यांतील सहा डावांत 27 विकेट घेतल्या. यासह एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा दिलीप दोषी यांच्या विक्रमाशीही अक्षरने बरोबरी केली. दोषी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1979 …
Read More »
7th March 2021
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने मॅट्टेओ पेलेकोन रँकिंग मालिका स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले आणि तिच्या गटात अव्वल स्थान मिळवले. जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी 26 वर्षीय विनेश टोकियो गेम्ससाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे. विनेशने 53 किलो वजनी गटात कॅनडाच्या डायना मेरी हेलन वेकरला …
Read More »
7th March 2021
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. खरंतर या अधिवेशनाचा पहिला आठवडा सरला असून, आता केवळ तीनच दिवस उरले आहेत. या कालावधीत विरोधी पक्ष भाजपने विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडले, तर दुसरीकडे तीन पक्षांच्या सरकारमध्ये एवढे दिग्गज नेते असूनही हे सरकार हतबल दिसून आले. राज्यात सर्वसाधारणपणे हिवाळी, पावसाळी …
Read More »
7th March 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : प्रतिनिधी आपल्याकडे महिला प्रत्येक क्षेत्रात काम करीत असल्या तरी पेट्रोल पंपावर महिला काम करीत नव्हत्या. पण आता नवी मुंबई आणि पनवेलमध्ये महिला पेट्रोल पंपावर काम करताना दिसतात. महिला दिनानिमित्त पनवेलमधील शासकीय विश्राम गृहासमोरील भारत कंपनीच्या पेट्रोल पंपावर काम करणार्या तिघींनी आपल्या कुटूंबाच्या पाठिंब्यामुळेच आपण काम करीत असल्याचे सांगितले. …
Read More »
7th March 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने रविवारी (दि. 7) महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा येथील शासकीय विश्रामगृहात झाला. यामध्ये दैनिक रामप्रहरच्या उपसंपादिका तन्वी गायकवाड, मल्हार टिव्हीच्या वृत्त निवेदिका मेधावी घोडके, क्षितीज पर्वच्या उपसंपादिका …
Read More »
7th March 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण : प्रतिनिधी उरण द्रोणागिरी डोंगरावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांवर अचानकपणे मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण दरीत कोसळून जखमी झाले. त्यांच्यावर पालवी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. दुपारच्या सुमारास काही तरुण हे उरणच्या द्रोणागिरी किल्ल्यावर गेले होते. यावेळेस, त्यांच्या समवेत एक 60 वर्षीय गृहस्थदेखील होते. याचदरम्यान, डोंगराच्या वरच्या भागात असताना …
Read More »
7th March 2021
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत कामाचे भूमिपूजन नवी मुंबई : प्रतिनिधी दिवाळे गावातील मासळी मार्केट हे भव्य व सुसज्ज असे निर्माण व्हावे, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून एक कोटी 25 लाख व नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 40 लाख अशा एकूण एक कोटी 65 लाख …
Read More »
6th March 2021
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
अहमदाबाद : वृत्तसंस्थाचौथ्या कसोटी भारताने एक डाव राखून आणि 25 धावांनी इंग्लंडचा पराभव केला. या सामन्यासोबतच भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका 3-1ने जिंकली. त्याचप्रमाणे आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी अव्वल स्थानासह गाठली आहे.ऋषभ पंतची शतकी खेळी आणि वॉशिंग्टन सुंदरची नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डाव्यात …
Read More »