Breaking News

महत्वाच्या बातम्या

कामोठ्याच्या सोसायट्यांमधील पाणी समस्येबाबत अधिकार्यांना सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे शहर सेक्टर 20 येथील वीरमा आर्केड, आइजी सोसायटी, जलाराम सोसायटी या सोसायट्यांमध्ये काही दिवसांपासून पिण्याचे पाणी दूषित येत असल्यामुळे रहिवाश्यांना उलट्या, डायरीया, डोकेदुखी अशा आजाराने ग्रासले आहे. या समस्येबाबत भाजप पदाधिकार्‍यांनी पाठपुरावा केला. या वेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचे व गटार दुरुस्ती …

Read More »

लसीकरणासाठी केंद्राकडून नियमावली जाहीर

राज्यांना महत्त्वाच्या सूचना नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण शनिवारपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. याआधी केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवली आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. …

Read More »

लष्कर दिनानिमित्त ड्रोनचे शक्तिप्रदर्शन

शत्रू राष्ट्रांची उडणार दाणादाण नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लष्कर दिनानिमित्त शुक्रवारी (दि. 15) झालेल्या संचलनात लष्कराने शक्तिप्रदर्शन केले. या वेळी भारतीय लष्कराने प्रथमच आपल्याकडे असलेल्या ड्रोनची क्षमता जगासमोर आणली. हे ड्रोन कुठल्याही मानवी नियंत्रणाविना शत्रूच्या ठिकाणांना कशा प्रकारे लक्ष्य करतात हे लष्कराने दाखवून दिले. अनेक ड्रोन एकत्र मिळून एका मोहिमेला …

Read More »

’राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा’

पुणे केंद्राच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ पनवेल ः प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या ’अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका’ स्पर्धेच्या पुणे केंद्रातील प्राथमिक फेरीला शुक्रवारपासून (दि. 15) पिंपरी-चिंचवड येथे प्रारंभ झाला …

Read More »

श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियानाच्या पनवेल येथील कार्यालयाचे उद्घाटन मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि. 14) डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, संघाचे प्रांत सहकार्यवाह शरद ओगले, प्रांत …

Read More »

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पेणमध्ये पथनाट्य व सायकल रॅली

पेण : प्रतिनिधी स्वच्छता सर्वेक्षण 2021 अंतर्गत माझी  वसुंधरा योजना अभियान पेण नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असून शुक्रवारी (दि. 15) शहरात पथनाट्य व सायकल रॅली काढून स्वच्छते विषयी जनजागृती करण्यात आली. रॅलीचा शुभारंभ आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील, महिला व बालकल्याण समिती …

Read More »

खोपोलीत कंपनी अधिकार्यावर जीवघेणा हल्ला

खोपोली : प्रतिनिधी येथील वासरंग रस्त्यावर महिंद्रा सानयो कारखान्यात कामावर जात असताना, तेजस सुरेंद्र भाई थंडार या अधिकार्‍यावर स्कुटीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी लोखंडी पाइपने हल्ला केला. हल्लेखोर थंडार यांना जखमी करून लवजीच्या दिशेने पसार झाले. गुरुवारी (दि. 14) सकाळी साडे आठच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने कंपनी परिसरात खळबळ उडाली. …

Read More »

राम मंदिर एकतेचे प्रतीक -राघुजीराजे आंग्रे

कर्जतमध्ये मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालयाचे उद्घाटन कर्जत : प्रतिनिधी श्रीराम आपल्या कणाकणात आहे. श्रीराम हा राष्ट्राचा आत्मा आहे. राम मंदिर म्हणजे राष्ट्राच्या बंधुत्वाचे, चारित्र्याचे, एकतेचे आणि संस्काराचे प्रतीक असून ते आयोध्येत उभे राहणार आहे, असे प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पंधरावे वंशज रायगड जिल्हा संघचालक रघुजीराजे आंग्रे यांनी येथे …

Read More »

खारघर गावात राम मंदिर उभारणीच्या जनजागृतीसाठी दिंडी

पनवेल : प्रतिनिधी खारघर गावात स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक  प्रवीण पाटील यांनी शुक्रवारी (दि. 15) अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर उभारणीसाठी निधी गोळा करण्यासाठी दिंडी काढून जनजागृती केली. अयोध्येतील नियोजित श्रीरामजन्मभूमी मंदिर हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार असून संक्रांतीपासून म्हणजेच 15 जानेवारीपासून पनवेल महापालिका क्षेत्रात निधी समर्पण अभियान सुरू …

Read More »

पोलिसांकडून महिला स्वसंरक्षात्मक धडे

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे बुधवारी (दि. 13)  महिला दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे, पोलीस निरीक्षक चवरे, नगरसेविका दर्शना भोईर, मनोहर मुंबईकर, सपना पाटील, शैला आंबेकर, गिता म्हात्रे, आरपीएफची एक महिला अधिकारी व 12 महिला सदस्य आदी …

Read More »