Breaking News

महत्वाच्या बातम्या

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिका आक्रमक

बेकायदा व्यवसायांवर धडक कारवाई पनवेल ः वार्ताहर तळोजा वसाहतीमधील पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय करणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करून पनवेल महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केलेले पदपथ मोकळे केले आहेत. तळोजामधील पाचनंद हाईट्स, कर्नाळा बँक आणि तळोजा पोलीस चौकीसमोरील चौकात बेकायदा फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय थाटल्याने नागरिकांना पदपथ …

Read More »

अधिकाधिक भारतीय नागरिक आता पेन्शन योजनांत का भाग घेत आहेत?

बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने सामावून घेण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग म्हणजे त्यांच्या आर्थिक विवंचना आधी दूर करणे. त्यासाठी पेन्शन योजना हा मार्ग जगाने निवडला आहे. त्याला भारतात प्रथमच चांगली गती आली आहे ही स्वागतार्ह गोष्ट आहे, मात्र भारतीय ज्येष्ठ नागरिकांची विशिष्ट स्थिती लक्षात घेता सर्व ज्येष्ठ नागरिकांना …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चेच नाव हवे!

राज्यात सध्या नामांतराचा मुद्दा प्रचंड गाजतोय. औरंगाबादसह अन्य ठिकाणांच्या नामांतरावरून मतमतांतरे व्यक्त होत असतानाच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला आहे. त्यामुळे पनवेल, उरणसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. …

Read More »

रिलायन्स व्यवस्थापनाला निर्णय घ्यायला एवढा वेळ का?; लोकशासन संघटनेचा सवाल

नागोठणे : प्रतिनिधी कंपनीच्या कंत्राटी सेवेत कायमस्वरूपी काम करण्यास आमचे प्रकल्पग्रस्त तयार असल्याचे लोकशासन आंदोलन समितीने स्पष्ट केले होते. मात्र, रिलायन्स व्यवस्थापनाला निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागत आहे, असा सवाल संघटनेचे स्थानिक सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी केला आहे. लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर चालू करण्यात आलेल्या …

Read More »

कोविड लसीकरणाची रंगीत तालीम; रायगड जिल्ह्यात चार ठिकाणी ‘ड्राय रन’

अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे शुक्रवारी (दि. 8) रायगड जिल्ह्यातदेखील कोविड 19 लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली.  जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा रूगणालय, पेणचे उपजिल्हा रूग्णालय, तसेच बोर्लीपंचतन व पोयनाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अशी चार केंद्रे लसीकरणासाठी निश्चीत करण्यात आली होती. या केंद्रांत प्रत्येकी 25 लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. …

Read More »

पनवेलमधील 400 वर्षीय पुरातन लक्ष्मी नारायण मंदिराचा जीर्णोद्धार

मंदिर उद्यापासून दर्शनासाठी खुले पनवेल : वार्ताहर चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाचे 400 वर्षीय पुरातन असलेल्या लक्ष्मी नारायण मंदिराचा आता जीर्णोद्धार होत असून त्याच्या अध्यात्मिक रुपामुळे पनवेलची शोभा वाढविणारे देवस्थान ठरणार आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज रोडवर लक्ष्मी नारायण मंदिर असून 400 वर्षीय पुरातन असे मंदिर असल्याने त्याचा जीर्णोद्धार …

Read More »

जेएनपीटीच्या ताफ्यात डेझी स्टार टग बोट समाविष्ट

उरण : वार्ताहर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)च्या ताफ्यात डेझी स्टार टग समाविष्ट झाला. जेएनपीटीचे अध्यक्ष भा.प्र.से. संजय सेठी यांनी या नवीन टगचे उद्घाटन केले. या वेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष  भा.रा.से. उन्मेष वाघ, डेजी स्टारचे कर्मचारी, पोलेस्टार मेरीटाइमची टीम, जेएनपीटीचे वरिष्ठ अधिकारी आणि …

Read More »

पत्रकार दिनानिमित्त नवी मुंबईत परिसंवाद

नवी मुंबई : विमाका नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग यांच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त नवी मुंबईच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात 21व्या शतकातील 21वे वर्ष: आव्हाने या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या …

Read More »

कामोठ्यात तोतया पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला लुबाडले

पनवेल : वार्ताहर पोलीस असल्याची बतावणी करून दोघा तोतया पोलिसांनी कामोठे भागात राहणार्‍या वृद्ध दाम्पत्याजवळचे 38 हजार रुपये किमतीचे दागिने लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कामोठे पोलिसांनी या तोतया पोलिसांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.  या घटनेत फसवणूक झालेल्या दाम्पत्याचे नाव वासुदेव कुंभार (66)  आणि …

Read More »

उरणमध्ये भाजपची प्रचारात आघाडी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी घरोघरी संपर्क उरण : वार्ताहर होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उरण तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी दिसणार आहे. यंदाची लढत भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद पाहता या केगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. …

Read More »