Breaking News

महत्वाच्या बातम्या

सौरव गांगुलीला बुधवारी मिळणार डिस्चार्ज

कोलकाता : वृत्तसंस्थाभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली याची प्रकृती स्थिर असून, बुधवारी (दि. 6) त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. गांगुलीली घरी सोडल्यानंतर डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीची रोज माहिती घेतली जाणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल …

Read More »

टीम इंडियाला धक्का

दुखापतीमुळे के. एल. राहुल संघाबाहेर सिडनी : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा कसोटी सामना जिंकत चार सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के. एल. राहुलला दुखापत झाली आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे राहुल उर्वरित मालिकेला मुकणार आहे. सराव करीत असताना त्याला दुखापत झाली होती.भारतीय …

Read More »

मृत्यूचा घाट सुरक्षिततेच्या मार्गावर; बोरघाटातील अपघात 50 टक्क्यांनी कमी, बळींची संख्याही घटली

खालापूर : अरुण नलावडे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात प्रमाण कमी व्हावे, याकरता महामार्ग पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या विशिष्ट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याने 2020या वर्षामध्ये या महामार्गावरील  अपघातांचे प्रमाण 50 टक्क्याने घटले आहे. राज्यातील महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार …

Read More »

बनावट एटीएम कार्डद्वारे 54 हजार लांबविले

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील पालखार येथील फिर्यादीच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून बनावट एटीएम कार्डचा वापर करून चोरट्याने 54 हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. पालखार येथील फिर्यादीचे बँक ऑफ इंडियाच्या गडब शाखेत बचत खाते असून  या खात्याचे फिर्यादीकडे एटीएम डेबिटकार्ड आहे. या खात्यामध्ये 53 हजार 515 रूपये रक्कम शिल्लक होते. …

Read More »

माणगावात वाहतूक पोलिसाला मारहाण : 18 आरोपींना अटक

माणगाव : प्रतिनिधी वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकाणी कारवाई केल्याचा राग मनात धरून रिक्षा चालक संतोष शिर्के, विकास मोरे, राजेंद्र मोरे यांच्यासह सुमारे 60 ते 70जणांनी वाहतूक पोलीस निवास साबळे यांना सोमवारी (दि. 4) सायंकाळी 5.30. वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ व मारहाण केली. माणगाव निजामपुर रोडवरील अमित कॉम्प्लेक्सजवळ झालेल्या या घटनेत वाहतूक पोलीस …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट; कर्जत तालुक्यात 89 जागांसाठी 164 उमेदवार रिंगणात; हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध

कर्जत : प्रतिनिधी/बातमीदार तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक 15जानेवारीरोजी होत आहे. नऊ ग्रामपंचायतीमधील सदस्यपदाच्या 89जागांसाठी 164उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर पाच ग्रामपंचायतीलमधील 17 जागा बिनविरोध झाल्या असून त्यांची अधिकृत घोषणा 18 जानेवारी रोजी होणार आहे. निवडणूका होत असेलेल्या कर्जत तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींमधील सदस्य पदाच्या एकूण 89 जागांसाठी सुरुवातीला 297 नामांकन …

Read More »

ही बाळासाहेबांची शिवसेना नव्हे; ही तर ‘औरंगजेबसेना’!

मुंबई : प्रतिनिधीऔरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून विरोध केला जात असतानाच भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका अत्यंत दुटप्पी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नसून, आता ती औरंगजेबसेना झालेली आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रदेश …

Read More »

‘सेंट्रल विस्टा‘चा मार्ग मोकळा

नव्या संसद इमारत उभारणीस सर्वोच्च न्यायालयाची परवानगी नवी दिल्ली : वृत्तसंस्थासर्वोच्च न्यायालयाने सेंट्रल विस्टा अर्थात संसदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. बांधकामासंबंधीची सर्व योग्य कागदपत्रे केंद्र सरकारकडे असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.केंद्राने डीडीए कायद्यांतर्गत आपल्या हक्काचा केलेला उपयोग योग्य असल्याचे सांगतानाच जमिनीच्या वापरासाठी मास्टर प्लान 2021मध्ये करण्यात आलेल्या …

Read More »

पनवेल, उरणमध्ये विकासकामांचा झंझावात

खिडूकपाड्यात गटार बांधकामांचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेमार्फत खिडूकपाडा गावात विकासाचे पर्व सुरू झाले आहे. या अंतर्गत प्रभाग समिती ‘ब’मधील प्रभाग क्रमांक 9 येथे गटारांचे बांधकाम करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 5) करण्यात आला.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

रायगडातील 10 ग्रामपंचायती बिनविरोध

848 उमेदवारांची माघार, 1588 जण निवडणुकीच्या रिंगणात अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात होणार्‍या 88 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीपैकी 10 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता 78 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात एकूण 848 उमेदवारांनी माघार घेतली असून, 1588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.पनवेल तालुक्यातील आकुर्ली, खानावले; माणगाव तालुक्यातील टेमपाले, लाखपले; महाड तालुक्यातील …

Read More »