Breaking News

महत्वाच्या बातम्या

उलवे येथे भूमी एंजल बांधकाम कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे येथील शिवाजी नगर येथे भूमी एंजल बांधकाम कार्यालय साईचरण म्हात्रे यांनी सुरू केले असून या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी साईचरण म्हात्रे यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा …

Read More »

द्रोणागिरी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

आमदार महेश बालदी यांची उपस्थिती उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण येथील द्रोणागिरी इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन ‘रयत’चे मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 5) करण्यात आले. या वेळी पारितोषिक वितरण आणि …

Read More »

तळोजात आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त श्री कृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पेठाली येथील मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 6) झाले. या …

Read More »

नोकरभरतीत लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर करणार्‍या इसमाविरोधात पोलिसांत तक्रार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेत होत असलेल्या नोकरभरतीच्या अनुषंगाने पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर आणि जनतेची फसवणूक एक इसम करीत असल्याचे उघडकीस आले. या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेची नोकरभरती रितसर ऑनलाईन अर्ज आणि केंद्रावर लेखी परीक्षा घेऊन होत आहे. असे …

Read More »

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

उरण : प्रतिनिधी अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू (मुंबई पारबंदर प्रकल्प)चे 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि.6) या अटल सेतूची ठिकठिकाणी थांबून पाहणी करून आढावा घेतला. देशातील सर्वांत जास्त लांबी असलेला 22 किमीचा समुद्री मार्गावरील अटल सेतू …

Read More »

एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सुविधा राबविणारी पहिली महापालिका पनवेल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणाली सुविधेचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 5) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत लोणेरे (ता. माणगाव) येथे करण्यात आला. महाराष्ट्रात …

Read More »

कोकणात 20 हजार कोटींचा नवा उद्योग येतोय -मुख्यमंत्री

शासन आपल्या दारी कार्यक्रम उत्साहात माणगाव : प्रतिनिधी कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी 20 हजार कोटींचा नवा उद्योग येतोय. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर 2024पर्यंत पूर्ण होईल, असे सांगतानाच माणगाव नगर परिषद बांधकामासाठी 15 कोटी, पावनखिंड येथे जाणार्‍यांच्या विश्रामधामासाठी 15 कोटी दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.5) केली. लोणेरे …

Read More »

क्रिकेटचा खेळखंडोबा

केपटाऊनमध्ये गुरुवारी झालेल्या भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेट सामन्याचे धड ना कुणाला विश्लेषण करता आले, ना कुणाला अभिजात क्रिकेटचा आस्वाद घेता आला. पाच दिवसांची ही कसोटी लढत अवघ्या 642 चेंडूंमध्ये संपली. हा खेळपट्टीचा दोष मानायचा की खेळाडूंच्या बदलत चाललेल्या मानसिकतेचा याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. कुणी म्हणेल वर्षभर …

Read More »

पनवेलच्या रोहिदास वाड्यात तीन कोटींची विकासकामे

भाजप शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील रोहिदास वाड्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तीन कोटी रुपयांची विकासाची कामे होणार आहे. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या या कामांचे भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 4) भूमिपूजन झाले. भारतीय …

Read More »

करंजाडेमध्ये विकासाची गंगा

सरपंच मंगेश शेलार यांचा पुढाकार; वर्षभरात 31 कामे पनवेल ः प्रतिनिधी नवीन वर्षात करंजाडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुमारे 400 सीसीटीव्ही लावण्याचा संकल्प केला आहे. त्याचबरोबर सेक्टर 6 ते 1 या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने नागरिकांना नवीन वर्षात चांगल्या दर्जाच्या रस्त्यांचे गिफ्ट मिळणार आहेत. पाणी, वीज, आरोग्य सुविधा, गटारे, रस्ते …

Read More »