मुंबई हायकोर्टाने महापालिकेला फटकारले मुंबई : प्रतिनिधीअभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे तसेच पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीसही हायकोर्टाने रद्द केली आहे.मुंबई महापालिकेकडून कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. या विरोधात कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या …
Read More »कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही ठरविणार का?
देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन शुक्रवारी (दि. 27) एक वर्ष पूर्ण झाले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरून महापालिकेला …
Read More »कर्जतमध्ये 70 जणांचे रक्तदान
शहिदांना वाहिली आदरांजली कर्जत : प्रतिनिधी मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्मरणार्थ कर्जतमध्ये गुरुवारी (दि. 26) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात 70जणांनी रक्तदान करून शहिदांना आदरांजली वाहिली. कर्जत पोलीस ठाणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी पोलीस ठाण्याच्या …
Read More »रोहा-कोलाड रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
धाटाव : प्रतिनिधी रोहा-कोलाड रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी माती मिश्रीत बारीक खडीचा वापर केला जात आहे. त्यावरून वाहने वेगात गेल्यानंतर रस्त्यावर अक्षरशः धुळीचे लोट उसळतात. या धुळीच्या साम्राज्यामुळे रोज ये-जा करणारे प्रवासी, कामगार, विद्यार्थी, ग्रामस्थ यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करावे, अशी मागणी …
Read More »घरकुलांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे -विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ
अलिबाग : प्रतिनिधी सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून राज्य शासनानेही त्याचा स्वीकार केला आहे. त्या अनुषंगाने कोकण विभागातील जिल्ह्यांना घरकुलांच्या कामांचे उद्दिष्ट्य विहीत कालावधीत पूर्ण करावे, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी शुक्रवारी (दि. 27) येथे दिले. महा आवास अभियान-ग्रामीण अंतर्गत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित कोकण …
Read More »नागोठण्यात रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन
मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार न घेण्याचा लोकशासन समितीचा निर्धार नागोठणे : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. 27) रिलायन्स व्यवस्थापनाला दिला. नागोठणे येथील रिलायन्स (पूर्वीची आयपीसीएल) प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या …
Read More »लढाई की भ्रष्टाचार?
कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा मागोवा घेण्याचे अर्थात ट्रेसिंगचे काम अतिशय प्रभावीपणे सुरू आहे, असे ठाकरे सरकारतर्फे वारंवार सांगण्यात येत आहे. या प्रयत्नांमुळेच कोविडविरुद्धची लढाई आपण जिंकत आलो आहोत असा आविर्भाव सरकारने आणला आहे. प्रत्यक्षात मात्र किती सावळागोंधळ आहे हे नवी मुंबईतील बनावट कोरोना …
Read More »रायगडात 141 नवे कोरोना पॉझिटिव्ह; एका रुग्णाचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, गुरुवारी (दि. 26) नवे 141 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 100 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 102 व ग्रामीण 19) तालुक्यातील 121, पेण नऊ, खालापूर सहा आणि उरण, कर्जत, अलिबाग, …
Read More »मराठी पत्रकारिता वर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेतर्फे माध्यम व्यवस्थापन हा एक वर्ष कालावधीचा पत्रकारितेचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (PGDMM) मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून चालविला जातो. कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी पात्र असतील. मराठी पत्रकारिता वर्गात अत्यंत अनुभवी पत्रकारांकडून मार्गदर्शन केले जाते. पत्रकारितेचे साकल्याने ज्ञान देण्याबरोबरच कार्यानुभव, …
Read More »घरोघरी तुळशीच्या रोपाचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त आपला सण-उत्सव-संस्कृती ही सर्व प्रथम आपण जपली पाहिजे. हल्लीच्या काळात पूर्वी घरो-घरी होणारे तुलसी विवाहाच प्रमाण हळूहळू घटत जात आहे. या गोष्टीची दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणलीच्या माध्यमातून गेली तीन वर्षे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी पवित्र तुळशीचे रोप कुंडीसहित भेट देत आहेत. याही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper