ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीच्या दोघा कर्मचार्यांनी केलेल्या आत्महत्या या खरोखरीच कुणाही संवेदनशील नागरिकाला अस्वस्थ करतील अशा आणि वेदनादायी आहेत. कोरोनाच्या या भीषण संकटकाळात समाजातील काही घटकांची किती असह्य परवड झाली असावी याचे हे अतिशय बोलके उदाहरण म्हणावे लागेल. लागोपाठ दोन एसटी कर्मचार्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या आल्यानंतर सरकारने दोन महिन्यांचे वेतन देऊ …
Read More »पक्षविरोधी कार्यवाहीबद्दल गणेश वाघिलकर सहा वर्षांसाठी निलंबित
पनवेल : पक्षविरोधी कार्यवाही केल्याबद्दल तक्का येथील गणेश वाघिलकर यांचे भारतीय जनता पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी वाघिलकर यांना निलंबन पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आपण आपल्या गावातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याविरोधात अपप्रचार व त्यांची खोटी बदनामी …
Read More »तक्का परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करा -नगरसेवक अजय बहिरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20मधील तक्का गाव परिसरातील विजेच्या समस्यांचे निवारण करून येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नगरसेवक अजय बहिरा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. वॉर्ड अध्यक्ष रघुनाथ बहिरा सोबत होते. नगरसेवक अजय बहिरा यांनी निवेदनात म्हटले की, प्रभाग क्रमांक …
Read More »भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते आत्मनिर्भर प्रभाग 18 दिवाळी महोत्सवाचे उद्घाटन
पनवेल ः वार्ताहर माजी उपमहापौर व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते आत्मनिर्भर प्रभाग 18 दिवाळी महोत्सव 2020चे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत व वोकल फॉर लोकल या संकल्पनेतून आत्मनिर्भर प्रभाग 18 दिवाळी महोत्सव 2020चे आयोजन गोखले हॉल येथे करण्यात आले होते. प्रभागातील …
Read More »पक्षी सप्ताहानिमित्त ‘सीकेटी’मध्ये कार्यशाळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त दरवर्षी 5 नोव्हेंबर हा पक्षितज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस आणि 12 नोव्हेंबर हा डॉ. सलीम अली यांचा जन्मदिवस असल्याने हा सप्ताह महसूल आणि वन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या पक्षी सप्ताहानिमित्त सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाने विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग …
Read More »राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांची पिळवणूक थांबवावी!; अन्यथा जनआंदोलनाचा भाजपचा इशारा
मुरूड ः प्रतिनिधी एसटी महामंडळातील चालक-वाहक, तांत्रिक विभाग, लिपिक आदी सर्व घटकाला मागील तीन महिन्यांचा पगार मिळाला नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी वृंदांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. खोलीचे भाडे व जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत. सर्वांत कमी पगार एसटीमधील कर्मचार्यांना दिला जातो. त्यातच तीन महिने पगार नसल्याने कुटुंबाची …
Read More »सीमेवरील जवानांसाठी पौष्टिक लाडू; ‘भाविप’ची अनोखी दिवाळी
पनवेल ः वार्ताहर लेह, लडाख, उधमपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम येथे सीमेवरील सैनिकांना दिवाळी फराळ पाठविण्याचा उपक्रम भारत विकास परिषद संस्थेच्या पनवेल शाखेच्या वतीने या वर्षी प्रथमच राबविण्यात आला. एकूण 14 हजार पौष्टिक लाडू वेगवेगळ्या सीमेवर पाठविण्यात आले. भारतीय सैनिकांना दिवाळी फराळ पाठवावा ही प्रेरणा मुळात गेली काही वर्षे …
Read More »फटाके विक्रीस तूर्त मोकळीक; नवी मुंबईतील गर्दीवर मात्र दक्षता पथकांची नजर
नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने फटाके फोडण्यास मज्जाव केला असला तरी नवी मुंबईत अद्याप अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नाही, मात्र बंदी नसली तरी प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा आजार श्वसनाशी संबंधित असल्यामुळे अशा रुग्णांना फटाक्यांच्या प्रदूषणाचा त्रास …
Read More »देशात मोदी लाट कायम
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची मुसंडीविविध राज्यांतील पोटनिवडणुकांमध्येही सरशी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जबरदस्त यश मिळविले आहे. मतदान आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तापरिवर्तनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र मंगळवारी (दि. 10) मतमोजणीचे कल समोर येऊ लागल्यापासून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी …
Read More »यंदा ऑनलाइन ‘दिवाळी पहाट’
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना संक्रमण पाहता यंदा भाजप पनवेल तालुका सांस्कृतिक सेल व नादब्रह्म साधना मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि. 14) रोजी ऑनलाईन दिवाळी पहाट 2020 या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी पहाट उपक्रमाचे या वर्षीचे हे 10 वर्ष आहे.शनिवारी सकाळी 8.30 ते 10 वाजेपर्यंत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper