Breaking News

महत्वाच्या बातम्या

केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी

मंत्री प्रकाश जावडेकर यांची ग्वाही पुणे : प्रतिनिधीपुण्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, येथील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांवर गेली आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि. 5) बैठक घेण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. …

Read More »

पावसाळी अधिवेशनात कोरोनामुळे विविध निर्बंध

मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणार आहे, पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या अधिवेशनात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात प्रेक्षकांना प्रवेश नाकारला जाणार आहे, तर आमदारांच्या पीएनादेखील प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय मंत्रिमंडळापासून …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा गौरव

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला दुसर्‍यांदा सामोरे जाणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्याचप्रमाणे भारत-चीन संघर्षात मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

Read More »

रायगड जिल्ह्यात गौरा गणपतींचे आगमन

अलिबाग : प्रतिनिधीगणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची संगता अनंत चतुर्दशीला झाली. त्यानंतर शनिवारी (दि. 5) आलेल्या संकष्ट चतुर्थीला रायगड जिल्ह्यात साखरचौथीच्या म्हणजेच गौरा गणपतींचे आगमन झाले. साधारणत: दीड दिवसाच्या मुक्कामानंतर रविवारी (दि. 6) या बाप्पाला निरोप दिला जाईल.  रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात हा साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. …

Read More »

देशात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक

24 तासांमध्ये 86 हजार बाधित; एकूण संख्या 40 लाखांच्या पार नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असून, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 40 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात शनिवारी (दि. 5) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 86 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वांत …

Read More »

एमटीडीसीची कोकणातील रिसॉर्ट्स, हॉटेल्स सुरू

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात कंटाळा आलेल्या आणि पर्यटनासाठी बाहेर पडू इच्छिणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टारंट आणि ई-पासबाबत काही नियम शिथिल झाल्यानंतर आता महाराष्ट्र पर्यटन मंडळानेदेखील (एमटीडीसी) कोकणातील आपली सर्व रिसॉर्ट्स आणि ह़ॉटेल्स सुरू करण्याचा  निर्णय घेतला आहे. सध्या किमान 33 टक्के बुकिंग घेतली जाणार आहे. ऑनलाइन …

Read More »

टाळेबंदीमध्येही जेएनपीटीचे कार्य उल्लेखनीय

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणि देशांतर्गत आर्थिक व्यवहारात सुरू झाल्याने जेएनपीटीमध्ये  मालवाहतूकीमध्ये निरंतर वाढ झाली आहे. कोविड 19 साथीच्या काळात भारतातील सर्व व्यवसाय ठप्प झाले असताना मालवाहतुकीमधील ही प्रगती म्हणजे सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये लवकरच सुधारणा …

Read More »

पडझडीत घ्याव्यात अशा सहा कंपन्या

बाजारात सध्या होत असलेली पडझड ही उत्तम कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. ज्यांना गेल्या दोन महिन्यांतील तेजी पकडता आली नाही, त्यांच्यासाठी या चांगल्या सहा शेअर्सची शिफारस. मागील आठवड्यात आपण बाजारात खूप हेलकावे पहिले. आठवड्याच्या सुरुवातीसच सीमेवर चीननं केलेल्या घुसखोरीच्या बातमीमुळं बाजाराशी घूस लागली तर गुरुवारी अमेरिकेत बेरोजगारीचे वाढते दर आणि …

Read More »

‘शहरी मनरेगा’ला वाढती बेरोजगारी झेपेल?

ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी जशी मनरेगा योजना राबविली जाते आहे, तशी शहरी भागातील बेरोजगारांसाठी शहरी मनरेगा योजना येऊ घातली आहे, पण कोरोना संकटात वाढलेली बेरोजगारी आणि आधीच रोजगार न वाढविता होत असलेली उत्पादन वाढ या भयावह संकटांचा मुकाबला ही योजना करू शकणार आहे? कोरोनाचे संकट जगाचे किमान एक वर्ष घेऊन टाकणार, …

Read More »

नव्या युगाचे शिल्पकार

‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे’ या कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्तीमध्ये उल्लेखलेले हात हे फक्त एखाद्या शिक्षकाचेच असू शकतात. तशी निर्मिती एखादा शिल्पकार, चित्रकार किंवा इतरही अनेक कलावंत करतात व त्यांच्या हातांना देखील निर्मितीच्या कळा सोसाव्या लागतात. परंतु शिक्षक जे निर्माण करतो, त्याला तोड नसते. म्हणूनच ‘शिक्षक दिन’ …

Read More »