Breaking News

महत्वाच्या बातम्या

सेवानिवृत्त फौजी समीर दुंदरेकर यांचे विचुंबे गावात जंगी स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विचुंबे गावचे सुपुत्र समीर दुंदरेकर हे भारतीय सैन्यदलातून देशसेवा करून 16 वर्षांनी निवृत्त झाले. त्यांचे गावात जल्लोषात स्वागत झाले. यानिमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने फौजी दुंदरेकर यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला …

Read More »

सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी महाडिक भाजपमध्ये

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिला मोर्चा अध्यक्षा शर्मिला सत्वे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून माणगावमधील सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी महाडिक यांनी शुक्रवारी (दि. 4) माणगाव येथील भाजप कार्यालयात भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी …

Read More »

महिलांच्या तक्रारी महिला पोलीस अधिकार्यांकडून नोंदवाव्यात -सीता पाटील

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात महिला तक्रारदाराची तक्रार महिला पोलिस अधिकार्‍यांच्या मार्फत नोंदवण्यात यावी. अशी मागणी महिला दक्षता समितीच्या सदस्य नगरसेविका सीता पाटील यांनी केली आहे. त्या अशयाचे पत्र नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांना पाठवण्यात आले आहे. पनवेल परिसरात महिलांच्या अनेक कौटुंबिक तक्रारी पोलीस …

Read More »

खोपोलीतील भुयारी गटार योजना लालफितीत

उघडी गटारे, नाले बनले डम्पिंग ग्राऊंड खोपोली : प्रतिनिधी लोकल सेवा, मुंबई-पुणे महामार्ग, एक्स्प्रेस वे व मोठया संख्येने कारखानदारीच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहर विकसित शहर बनले आहे. शहरातील पायाभूत सुविधा अधिक मजबुतीसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून नवनवीन कल्पना अमलांत आणल्या जात आहेत. यात महत्वकांक्षी भुयारी गटार योजनेचा समावेश आहे. मात्र या ना त्या …

Read More »

जेएनपीटी कामगारांना मिळाला प्रलंबित एरियेस

जनरल कामगार संघटनेचा पुढाकार उरण : वार्ताहर, प्रतिनिधी जेएनपीटी जनरल कामगार संघटनेच्या पुढाकाराने इलेक्ट्रिकल मेन्टेनन्समधील दोन इंजिनियर्स आणि आठ सुपरवायझर यांचा गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेला एरीयेस जेएनपीटी जनरल कामगार संघटनेच्या वतीने प्रत्येकी दोन लाख 75 हजार मिळवून देण्यात आला एकूण 35 लाख मिळवून दिले त्याबद्दल अधिकारी आणि युनियनचे पदाधिकारी …

Read More »

पनवेलमध्ये 290 नवे कोरोनाबाधित

पाच जणांचा मृत्यू    259 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 4) कोरोनाचे 290  नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू  झाला आहे तर 259   रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 223 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा  मृत्यू झाला आहे तर 194  …

Read More »

चिरनेर वनक्षेत्रात साकारले नक्षत्र वन

उरण : प्रतिनिधी पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी नेहमी अग्रेसर असणार्‍या वन्यजीव निसर्ग संरक्षण आणि वटवृक्ष फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या सहकार्याने चिरनेर हद्दीतील वनक्षेत्रावर सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. 3) नक्षत्र वन निर्माण करण्यासाठी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केले. या संकल्पनेनुसार विविध प्रकारच्या जंगली पण औषधी झाडांच्या रोपांची …

Read More »

उरण मोरा ते भाऊचा धक्का जलवाहतूक पुन्हा सुरू

उरण : वार्ताहर लॉकडाऊन झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आत्या होत्या. त्याच अनुषंगाने उरणकरांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मोरा (उरण) ते भाऊचा धक्का (मुंबई) ही प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा ही प्रवासी जलवाहतूक (लॉंचसेवा) गुरुवार (दि. 3) पासून सुरू करण्यात आली आहे. मोरा …

Read More »

कोरोनाबाधित विद्यार्थ्याने दिली रुग्णालयातून परीक्षा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आई-वडिलांसह कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या 13 वर्षीय मुलाने रुग्णालयात उपचारादरम्यान आठवीची ऑनलाइन परीक्षा दिली. त्यासाठी त्याला नवी मुंबईतील नेरूळ येथील एका रुग्णालयाने सर्वोपरी मदत केली. नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे येथे राहणार्‍या नीलेश कदम, पत्नी निशी आणि मुलगा निरंजन (13) यांना कोरोना …

Read More »

नियमांचे पालन न केल्याने कोरोना संसर्गात वाढ

पनवेल : बातमीदार पनवेल शहरात गणशोत्सवानंतर कोरोना रुग्णांत वाढ झाली आहे. दरदिवशी दोनशेपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. एकाच कुटुंबातील 19 जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात घराघरांत झालेल्या गर्दीमुळे सामाजिक अंतराच्या नियमाला हारताळ फासल्याने …

Read More »