Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोळी बांधव आर्थिक संकटात

राज्य सरकारने मदत करण्याची अपेक्षा उरण : प्रतिनिधीआधीच पावसाळी हंगामातील दोन महिने मासेमारी बंदी, त्यानंतर खराब हवामानाबरोबरच मासेमारी सुरू करण्याच्या हंगामातच चक्रीवादळांच्या मालिकेमुळे सुमारे पाच-सहा महिन्यांच्या मासेमारीचा हंगाम पुरता वाया गेला असतानाच कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदी लॉकडाऊनमुळे मासेमारी व्यवसाय मागील दोन महिन्यांपासून पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. …

Read More »

ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांत झाली वाढ

पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊन हा 3 मेपर्यंत वाढविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक घरातच वास्तव्यास आहेत. अशा लोकांना ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणुकीच्या प्रकाराला सुरूवात झाली असून त्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येवू लागल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन दारु खरेदी करा, ऑनलाइन आंबे खरेदी करा, वेगवेगळ्या योजना, पैसे गुंतवणुकी संदर्भात आकर्षक योजना, नोकरी …

Read More »

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी विशेष कक्ष

नवी मुंबई : बातमीदार – एपीएमसी मार्केटमधील व्यापारी, कामगार, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, ट्रक चालक व क्लिनर्स यांच्या वैद्यकीय तपासणीकरिता तातडीने कोरोना नियंत्रक वैद्यकीय तपासणी कक्ष सुरु करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी 12 तासाच्या आत त्वरीत एपीएमसी प्रशासनाशी चर्चा करीत पाच मार्केटमध्ये कोरोना नियंत्रक वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन …

Read More »

83 वर्षीय आजींकडून घरीच राहण्याचे आवाहन

पनवेल : वार्ताहर – सध्या माझे वय 83 असून गेल्या 20 वर्षापासून आजारी असल्याने व्हिल चेअरवरच मी घरात आहे. आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रत्येकाने घरी राहणे गरजेचे आहे. मी गेल्या 20 वर्षांपासून घरातच आहे. मग तुम्ही एक दोन महिने घरात राहू शकत नाहीत का? असा सवालच शहरातील ज्येष्ठ नागरिक …

Read More »

गर्दीच्या ठिकाणी एकत्र जमू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा -जगदिश कुलकर्णी

उरण : वार्ताहर – उरण शहर व आसपास खेड्यातील लोकांनी ज्या वेळी भाजीपाला, मांस, मच्छी किंवा किरणा खरेदी करण्यासाठी येतात त्यावेळी प्रत्येकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळायचे आहे.प्रत्येकाने आपली स्वताची काळजी घेतली पाहिजे. एखादा नागरिक कोरोनाबाधित झाला असेल कोरोनाचा संसर्ग दुसर्‍यांना होऊ नये या दृष्टीकोनातून स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे, त्यासाठी  सोशल  …

Read More »

आशा वर्करच्या दक्षतेमुळे विचुंबेतील ‘त्या’ रुग्णाचे कोरोना निदान

पनवेल : प्रतिनिधी – विचुंबे येथे रविवारी सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने लक्षण दिसत असताना ही कोणतीही काळजी घेतली नव्हती. कोरोनामुळे पनवेल पंचायत समितीतर्फे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांचा सर्व्हे करण्यात येत असताना आशा वर्कर अर्चना भोईर यांच्या दक्षतेमुळे हा रुग्ण आढळला. त्यामुळे अनेकांचा संसर्ग टळल्याची माहिती गट विकास अधिकारी तेटगुरे यांनी …

Read More »

म्हसळा-श्रीवर्धनमधील 50 गावांचा वीजपुरवठा पूर्ववत

म्हसळा ः प्रतिनिधी – दक्षिण रायगडमधील माणगाव, महाड, म्हसळा, पोलादपूर तालुक्यांत मेघगर्जनेसह कोसळलेल्या पावसाने येथील वीजपुरवठा सायंकाळी खंडित झाला होता. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याच वेळी म्हसळा तालुक्यात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वार्‍यामुळे श्रीवर्धन व म्हसळा या दोन्ही तालुक्यांतील किमान 50-60 गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता, …

Read More »

अवैध दारू धंद्यावर कोलाड पोलिसांची कारवाई

मुंबई : प्रतिनिधी – पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात तिघांची जमावाकडून हत्या करण्यात आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत 5 प्रमुख हल्लेखोरांसह एकूण 105 जणांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी सीआयडी चौकशी सुरू करण्यात आली असताना भाजपने ही चौकशी अमान्य करत याप्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. ’पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस …

Read More »

कर्जत पोलीस ठाण्यातर्फे दोन लाख 24 हजारांचा दंड वसूल

कर्जत : प्रतिनिधी – शासन आणि प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच रहा सुरक्षित रहा, असे वारंवार ओरडून सांगत आहेत. मात्र काही विनाकारण, बिनकामाचे नागरिक आजही आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन सर्रास बाहेर पडतात. अशा चालकांवर आणि वाहन जप्त करून कर्जत पोलिसांनी कारवाई केली असून दोन लाख 24 रुपयांचा दंडही वसूल …

Read More »

लॉकडाऊनमध्ये ‘संवाद’चा आधार

मुंबई : प्रतिनिधी – कोरोना लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी नागरिकांना जाणवणारा मानसिक तणाव दूर करता यावा, सध्याच्या कठीण परिस्थितीत त्यांच्याशी संवाद साधून या नागरिकांचे मनोबल वाढवता यावे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1800 102 4040 या हेल्पलाईन टोल फ्री सेवेची माहिती दिली. राज्य शासनाच्या आदिवासी विकास …

Read More »