उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नेते चंद्रकांत घरत यांनी मंगळवारी (दि. 7) बोकडवीरा येथील वायू विद्युत केंद्र शेजारील झोपडपट्टीत, तसेच वसाहतीमधील सफाई कामगार यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच घरत यांनी पंतप्रधान मदत निधी म्हणून एकरा हजार एकशे अकरा रुपयांची मदत केली आहे. जीवनावश्यक …
Read More »कर्जत नगर परिषदेतर्फे विशेष स्वच्छता मोहीम
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत शहरात साथरोगाचा प्रसार होऊ नये यासाठी कर्जत नगर परिषदेच्या वतीने बुधवारी (दि. 8) विठ्ठलनगर परिसरात कोविड-19 विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता स्वच्छतेच्या दृष्टीने काही पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी नगर परिषदेच्या वतीने 3 एप्रिलपासून वेगवेगळ्या प्रभागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात झाली …
Read More »चिर्ले येथील आदिवासींना मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या आदेशानुसार चिर्ले येथील आदिवासी व गरजू अशा 85 कुटूंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप भारतीय जनता पक्ष चिर्ले व रायगड जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत यांच्याकडून करण्यात आले. या वेळी कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, तालुका पदाधिकारी संतोष मढवी, रणजित …
Read More »वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पवार दाम्पत्याने आपली मुलगी दुर्वाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त 100 गरीब, गरजू व फुटपाथवरील निराधारांना सोशल डिस्टन्स ठेवून अन्नदान केले. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्ताची आवश्यकता असल्याने शिक्षक कुणाल पवार यांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने आपल्या लेकीचा वाढदिवस साजरा केला.कुणाल पवार हे जिल्हा परिषदेच्या सुधागड येथील पायरीचीवाडी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; दिघाटी गावातील विधवा महिलांना मदतीचा हात
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरस पसरू नये त्या करिता सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. गरिबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने उरणचे आमदार महेश बालदी यांच्या वतीने दिघाटी गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूमध्ये कांदे, बटाटे, मसाला, हळद तेल आदींचा समावेश होता. या वेळी दिघाटी ग्रामपंचायत सरपंच अमित चांगाजी …
Read More »खोपोली पालिकेत कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष
खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाचे महाभयानक संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. खोपोलीतही संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. खोपोली पालिकेच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. 7) पालिकेच्या प्रवेशद्वारावर नगरपालिका प्रशासनाकडून कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष विनिता कांबळे-औटी, मुख्याधिकारी गणेश शेटे, खोपोलीचे वरिष्ठ पोलीस …
Read More »रायगड पोलिसांकडून अलिबागमध्ये निर्जंतुकीकरण कक्ष कार्यान्वित
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा पोलीस दलाकडून अलिबाग शहरातील पीएनपी परिसरात जंतुनाशक फवारणी यंत्रणा कार्यान्वित कऱण्यात आली आहे. बाजारात येणार्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा कार्यरत असणार आहे. अलिबाग येथील भाजी मार्केट आणि मच्छीमार्केट परिसरात ग्राहकांची नियमित वर्दळ असते, मात्र अशाच गर्दीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे. ही …
Read More »दररोज 100 भुकेल्यांना अन्नदान
कर्जत शहर भाजपचा स्तुत्य उपक्रम कर्जत ः बातमीदार कर्जत शहरातील व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात रोजंदारी कामगार आणि मजुरांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यांच्या एकवेळच्या भोजनाची तारांबळ झाल्याचे पाहून कर्जत शहर भाजपने दररोज 100 भुकेल्या लोकांना जेवण आणि धान्यवाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. …
Read More »गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
भाजप तालुकाध्यक्षांचा मदतीचा हात माणगाव ः प्रतिनिधी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जनतेला मार्गदर्शनपर सूचना करीत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषाणूला डोके वर काढू न देण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. हे लॉकडाऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वाढण्याची शक्यता …
Read More »ट्रँक्विल ग्रुपकडून मदत
श्रीवर्धन ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणार्या गोरगरीब कुटुंबीयांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहून परिवर्तन सामाजिक विकास संस्था कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष शिवराज भोसले-पाटील व ट्रँक्विल ग्रुपच्या कर्मचार्यांनी माणुसकी दाखवत या संकटग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विजापूर येथील बांधकाम कामासाठी बाहेरून आलेल्या 35 मजुरांना 10 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper