Breaking News

महत्वाच्या बातम्या

करोनामुळे पुण्यात तिघांचा मृत्यू

पुणे : प्रतिनिधी येथे 24 तासांत करोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या तिघांच्या मृत्युमुळे पुण्यातील मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. एका 69 वर्षीय महिलेला पित्ताशयाच्या त्रासामुळे गुलटेकडी येथील अडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये 30 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री …

Read More »

उरण पोलिसांकडून 32 दुचाकी जप्त

उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला झाहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आपल्याला घरात राहणे ही गुरुकिल्ली आहे. तरीसुद्धा काही हवशे-नवशे रस्त्यावर फिरत असतात. अशा शायनिंग बहाद्दरांवर उरण पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी कोरोना …

Read More »

माणगाव बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप

गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचे प्रयत्न माणगाव ः प्रतिनिधी – कोरोनाची वाढती दहशत विचारात घेता माणगावमधील सर्व दुकानदार, नगरपंचायत, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांनी बैठक घेऊन माणगाव सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतला होता. या निर्णयाला माणगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला, मात्र रविवारी (दि. 5) पुन्हा सकाळी 8 ते …

Read More »

दहिवली ग्रामपंचायत हद्दीत मदत वाटप

कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाने मदत वाटप करण्यात आघाडी घेतली असून सर्वत्र भाजप कार्यकर्ते गरजूंना मदत करण्यात आघाडीवर आहेत. उमरोली जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष केशव तरे यांनीदेखील दहिवली ग्रामपंचायतीमधील गरजू आणि गरीब लोकांना त्यांच्या घरी जाऊन मदत पोहचविली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍या गोरगरिबांचे …

Read More »

कोरोना ः खबरदारी हाच उत्तम पर्याय!

चीनमधून उदयास आलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना व्हायरस जीवघेणा ठरत आहे. या प्राणघातक विषाणूमुळे होणार्‍या आजारावर आजतागायत कोणताही अधिकृत उपचार शोधला गेला नाही. तसेच या व्हायरसवर ठोस उपाय म्हणून कोणतेही लसीकरण उपलब्ध नाही. जर एखादा व्यक्तीला कोरोनाची लागण झाली, तर या गंभीर आजारावर …

Read More »

नेरळ पोलिसांकडून गावठी हातभट्टी उद्ध्वस्त

कर्जत ः बातमीदार – नेरळ पोलिसांनी गावठी दारू बनविणार्‍या हातभट्ट्याविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत बेकरे येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात एक लाख 20 हजार  रुपयांची गावठी दारू पोलिसांनी उद्ध्वस्त केली.  नेरळ पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या जंगल भागात  गावठी दारू बनविली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने …

Read More »

रोह्यात सोशल डिस्टन्सिंगला हरताळ

बाजारपेठेत प्रचंड गर्दी; पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष रोहे ः प्रतिनिधी – कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभर व राज्यभर लॉकडाऊन असताना सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत, परंतु अत्यावश्यक सेवा असलेल्या किराणा, दूध, भाजीपाला व मेडिकल सेवांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे, मात्र या अत्यावश्यक सेवांमधील साहित्य खरेदीसाठी रोहा बाजारपोठेत प्रचंड गर्दी होताना दिसत …

Read More »

चिरनेर-खारपाडा रस्त्यावरील वणव्यांमुळे जंगलसंपत्तीचा र्हास

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात थंडीचा मोसम संपताच अनेक ठिकाणच्या जंगलांना बेसुमारपणे वणवे लावण्याचा प्रताप सुरू होत असतो. यंदाही वणव्यांची कमतरता नसून नित्यनेमाने लपून-छपून जंगलसंपत्तीचा र्‍हास करण्यासाठी समाजकंटक यशस्विता दाखवीत आहेत. उरण तालुक्यातील चिरनेर-खारपाडा महामार्गावरील तलाखराच्या घाटात व घाटाच्या खाली वरच्या उजव्या बाजूला लावण्यात आलेला वणवा मागील …

Read More »

वाहतूक शाखेतर्फे अन्नधान्य वाटप

पनवेल : शहर वाहतूक शाखेतर्फे करंजाडे येथील कातकरीवाडीत 100च्यावर कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साळवे, पोलीस नाईक सुरवाडे, पोलीस हवालदार उमेश उटगीकर, सामाजिक कार्यकर्ते राजू गोविंद आदींनी त्या ठिकाणी जाऊन हे वाटप केले आहे. करंजाडेत तरुणाची आत्महत्या …

Read More »

गर्दीला आवर घालण्याची मागणी

उरण : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, औषधे यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले. या सेवा 24 तास सुरु राहणार आहे. मात्र उरणच्या मासळी, चिकन-मटण व भाजीपाला मार्केटमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी आटोक्यात येत नसल्याचे चित्र पाहायला …

Read More »