Breaking News

महत्वाच्या बातम्या

नेरळमधील रक्तदान शिबिरास उत्स्फू र्त प्रतिसाद; 155 दात्यांचा सहभाग

कर्जत ः बातमीदार – कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन अथक  प्रयत्न करीत असून रुग्णांवर उपचार करताना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत नेरळ येथे आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 155 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. दरम्यान, नेरळमधील …

Read More »

भटक्या कुत्र्यांना अन्नदान; रोह्यातील प्राणीमित्रांनी जपली भूतदया

रोहा ः वार्ताहर – देशभरातील लॉकडाऊनमुळे भटके श्वान, रस्त्यावर फिरणार्‍या गायी तसेच अन्य प्राण्यांना अन्न मिळत नसल्यामुळे त्यांचे हाल होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर रोह्यातील प्राणीमित्र कुमार देशपांडे, शेखर सप्रे, स्वप्ना सप्रे व रोह्यातील अन्य प्राणीमित्रांनी एकत्र येत विशेष अभियान हाती घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात ते रोह्यातील प्राण्यांना नित्यनेमाने दहीभात …

Read More »

शिक्षकांकडून एसटीचालक, आदिवासींना मदतीचा हात

मुरूड ः प्रतिनिधी – संचारबंदीच्या काळात येथील श्री. छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतगर नांदगाव हायस्कूलमधील मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर वृंदाने मुरूड आगारातील एसटी चालक-वाहक व काशीद ग्रामपंचायतीमधील दोन आदिवासीवाडीमधील लोकांना तांदूळ, डाळ व गोडेतेल पाकिटांचे वाटप केले. या वेळी मुख्याध्यापक चिंतामणी जोशी, पर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे, …

Read More »

बँक ऑफ इंडियाकडून निराधार महिलांना धान्यवाटप

महाड ः प्रतिनिधी – लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब मजुरांचे रोजगाराअभावी हाल होऊ लागले आहेत. तसेच निराधार महिलांना कोणताच रोजगार नाही आणि त्यामुळे अन्नधान्यही मिळत नाही. या पार्श्वभूमीवर बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेने पुढे येत या महिलांना आधार दिला आहे. देशासह राज्यात कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे गरिबांचे कंबरडे मोडले आहे. निराधार महिलांना …

Read More »

निजामपूरला पाणीटंचाईचे चटके कायम

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पायपीट माणगाव ः प्रतिनिधी – भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावू लागली आहे. त्यामुळे नदी, विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू लागल्याने माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. निजामपूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाई सुरू झाली असून गेली अनेक दिवसांपासून निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे व …

Read More »

दीर्घ लढाईसाठी देश सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार नवी दिल्ली : वृत्तसंस्थासध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाविरुद्धची लढाई ही दीर्घकालीन असून, देशातील 130 कोटी जनता या युद्धात जिंकण्याच्या इच्छाशक्तीने एक झाली आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 6) काढले. ते भारतीय जनता पक्षाच्या 40व्या स्थापना दिनानिमित्त भाजप कार्यकर्त्यांशी …

Read More »

देशातील रुग्णांचा आकडा चार हजारांच्या वर

नवी दिल्ली, मुंबई : देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 4067वर पोहोचली आहे. एकूण 109 जणांचा आतापर्यंत मृत्यू आहे. यातील 30 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला असून 693 नवे करोना रुग्ण देशात आढळून आले आहेत, तर 4067 रुग्णांपैकी तबलीघी जमात मरकझशी संबंधित 1445 रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या …

Read More »

‘घरी थांबूनच डॉ. आंबेडकर जयंती साजरी करा’

पनवेल : प्रतिनिधीकोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरी थांबूनच साजरी करू या. कोरोनाविरुद्धचा मुकाबला जिंकल्यानंतर 14 एप्रिलनंतर आपण भीम …

Read More »

हापूस आंब्यालाही कोरोनाचा फटका

एपीएमसीत ग्राहकांची पाठ नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील फळ बाजारात फळांच्या राजा हापूस आंबा दाखल झाला आहे. वातावरणाचा फटका बसल्याने या वर्षी हापूस आंब्याची बाजारातील आवक नेहमीच्या मानाने घटलेली आहे. त्यातच कोरोनाच्या प्रभावाने बाजारात आंब्याला आता उठावही नाही, निर्यातही कमी ठप्प असल्याने कोकणातील …

Read More »

उलवे नोडमध्ये आणखी तीन, तर खारघरमध्येही नवा कोरोनाग्रस्त

पनवेल तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या 20 पनवेल : प्रतिनिधीउलवे नोडमध्ये तीन आणि खारघरमध्ये एक नवीन रुग्ण आढळल्याने पनवेल तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 20 झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे. उलवे नोड सेक्टर 20मधील कोरोना झालेल्या व्यक्तीच्या घरातील तीन व्यक्तींची टेस्ट सोमवारी (6 एप्रिल) पॉझिटिव्ह आल्याने एकाच घरातील …

Read More »