Breaking News

महत्वाच्या बातम्या

म्हसळ्यात ग्रामपंचायत स्तरावर कोरोना संसर्ग नियंत्रण कक्ष व पथकाची स्थापना

म्हसळा : प्रतिनिधी – कोरोनाचाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग नियंत्रण पथकाची स्थापना ग्रामपंचायत पातळीवर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. 22 मार्चला दिले आहेत. त्याची तालुक्यात अंमलबजावणी सुरुवात झाली आहे. तालुक्याचे नोडल ऑफीसर म्हणून गटविकास अधिकारी व शहराचे नोडल ऑफीसर म्हणून नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांची जिल्हाधिकारी यांनी नेमणूक केली आहे. तालुक्यातील एक …

Read More »

नागोठण्यात पत्रकारांना पेट्रोल देण्यास पंपचालकाचा नकार

शासकीय आदेशाचे उल्लंघन नागोठणे ः प्रतिनिधी – रायगड जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेत असलेल्यांव्यतिरिक्त इतर सरसकट सर्वांना वाहनांमध्ये पेट्रोल देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. संबंधित आदेशानुसार पत्रकारांना पेट्रोल देण्यावर कोणतेही निर्बंध नसल्याचे स्पष्ट असतानाही येथील मुंबई-गोवा महामार्गावर मीरानगर भागात असणार्‍या इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोलपंपावर पत्रकारांना त्यांच्या दुचाकीत पेट्रोल भरून …

Read More »

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तत्पर

नगरसेवक संजय भोपी सोशल क्लबचे सामाजिक दायित्व कळंबोली : प्रतिनिधी – संपुर्ण जगाला कोरोनाचा महाराक्षस गिळंकृत करायला निघाला असून या महाकाय राक्षसाला संपविण्यासाठी देश व राज्याने युद्ध सुरू केले आहे. यात संचारबंदी, लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये पोलीस, पालिका प्रशासन आपले शर्थीचे प्रयत्न करत जनतेची सेवा करत आहे. त्यांची …

Read More »

मोदींची सुयोग्य प्रशंसा

मोदी सरकारने 80 कोटी जनतेसाठी रेशनचे मोफत धान्य उपलब्ध करून दिले. 20 कोटी 40 लाख गरजू स्त्रियांच्या बँक खात्यात रोख रक्कम टाकण्यात आली. 80 कोटी जनतेला मोफत घरगुती गॅस उपलब्ध करून देण्यात आला, याचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी केला आहे. कोरोना फैलावाच्या संदर्भातील आपल्याकडची आकडेवारी सातत्याने वाढतच आहे. गुरुवारी …

Read More »

पनवेल परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी

पनवेल : बातमीदार संचारबंदी असताना देखील नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत त्यामुळे पनवेल परिसरात पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. या नाकाबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या वाहनांना जाऊ दिले जात आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभर लॉकडाऊन केले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त

रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा पोलीस कोरोनाच्या संकटकाळात सतर्कतेने काम करीत असून कडकडीत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणे  इन्चार्ज पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक उपनिरीक्षक, सहा. फौजदार, पोलीस हवालदार यांसह 40 पोलीस कर्मचारी व सहा होमगार्ड यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कडकडीत बंदोबस्तामुळे …

Read More »

किरवली ग्रामपंचायतीचा गरजूंना मदतीचा हात

कडाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जतमधील किरवली ग्रुप ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत हद्दीतील गोरगरीब व गरजू आदिवासी बांधवांना धान्यवाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीने पुढाकार घेत 15 टक्के मागासवर्गीय निधीतून किरवली ग्रामपंचायतमधील आदिवासी बांधवांना किराणा मालाचे वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले. या वेळी माजी सभापती तथा कर्जत पंचायत समितीचे सदस्य प्रदीप …

Read More »

गरजवंतांना दगडे खानावळीकडून अन्नदान

कर्जत ः बातमीदार लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरीब, रोजंदार, भटकंती करणारे निराधार तसेच भिक्षेकरींना अन्न-पाण्यावाचून उपासमारीस सामोरे जावे लागत आहे, परंतु लॉकडाऊन काळात गरजवंतांना दोन वेळ पोटभर अन्न देऊन दगडे खानावळीच्या बेबीताई दगडे या माऊलीने त्यांना देवदूताप्रमाणे आधार दिल्याने कर्जतसह राज्यात त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्याकडून कर्जत रेल्वेस्थानक परिसरातील सुमारे 50 ते …

Read More »

कोरोनामुळे एकदरा राम मंदिरात शुकशुकाट

मुरूड ः प्रतिनिधी मुरूडच्या एकदरा राम मंदिरात रामनवमीनिमित्त दरवर्षी रामजन्मकाळ हा तालुक्यात सर्वात मोठा उत्सव होतो. 2000 भक्त खास जन्मकाळासाठी येतात, पण यंदा कोरोनामुळे गावकर्‍यांनी रामजन्मकाळ कार्यक्रम रद्द केला. सकाळी गावातील चार प्रमुखांनी रामाचे पूजन केले. सर्व गावकर्‍यांनी आपापल्या घरातून रामप्रतिमेचे पूजन करून उत्सव साजरा केला. रामनवमीनिमित्त मुरूड शहरातून निघणारी …

Read More »

आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

माणगाव ः प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या आदिवासी बांधवांवर उमासमारीची वेळ येऊ नये यासाठी निजामपूर विभागातील बोंडशेत नमस्कार मित्र मंडळातर्फे बोंडशेत आदिवासीवाडी  येथील कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. नमस्कार मित्र मंडळाच्या माध्यमातून निजामपूर विभागात जनजागृती व मास्कवाटप करण्यात आले. आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नमस्कार मित्र मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. …

Read More »