Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोनाबाबत प्रभावी उपाययोजनांसाठी पनवेल पालिका हद्दीतील सोसायट्यांना सूचना द्या

नगरसेविका दर्शना भोईर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरसच्या साथीबाबत प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व सोसायट्यांना सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल आयुक्तांकडे निवेदन दिले आहे. नगरसेविका दर्शना भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये …

Read More »

पोदी भुयारी मार्गाच्या रस्त्यावर पथदिवे बसवा

पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल व पनवेलला जोडणार्‍या पोदी भुयारी मार्गाच्या रस्त्यावर तत्काळ विद्युत पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग क्र. ’ड’ चे सभापती तेजस कांडपिळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी अभियंता इलेक्ट्रीक हाऊस सिडको कार्यालय यांना निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सिडको प्राधिकरणाच्या हद्दीतील पोदी येथील …

Read More »

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात लवकरच

डायलिसिसची सुविधा पनवेल : बातमीदार काही महिन्यांपूर्वी पनवेलमध्ये सुरू झालेल्या पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी डायलिसिसची सुविधा सुरू होणार आहे, तसेच आयसीसीयू सेंटर देखील उपलब्ध होणार आहे. या सुविधा सुरू होणार असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना अत्यंत कमी दरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. नऊ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पनवेलमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी …

Read More »

अश्विनी मयेकरला पॉवर लिफ्टिंमध्ये सुवर्णपदक

अलिबाग ः प्रतिनिधी बिहार राज्यातील पटना येथे अखिल भारतीय नागरी सेवा पॉवर लिफटींग स्पर्धा 4 ते 8 मार्च या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत पेण तालुका क्रीडा अधिकारी अंकिता अशोक मयेकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. बिहार आणि हरियाणाच्या खेळाडूंना मागे टाकत अंकिता मयेकर यांनी 277 किलो इतके वजन उचलून सुवर्णपदक …

Read More »

फ्रेंड्स ग्रुप साई क्रिकेट संघाला अंतिम विजेतेपद

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत फ्रेंड्स ग्रुप साई संघाने अंतिम सामन्यात स्पार्टन माणगाव संघावर मात करीत अंतिम विजेतेपद मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस 10 हजार रुपये व आकर्षक चषक पटकावला. येथील माणगाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नवयुवक मित्रमंडळ खांदाड   माणगावतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. माणगावातील लोणशी …

Read More »

ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या मुलीसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅक्सवेलने काही दिवासांपूर्वी विनी रमण या भारतीय वंशाच्या मुलीशी विवाह करणार असल्याचे जाहीर केले होते. आता या दोघांनी साखरपुडा केला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे दोघांनी भारतीय पद्धतीने …

Read More »

विश्वनाथन आनंद अडकला जर्मनीत; कोरोना व्हायरसचा फटका

चेन्नई : वृत्तसंस्था कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा स्थगित केल्या आहेत. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिससह जवळपास सर्वच स्पर्धा रद्द केल्या असून यात आता बुद्धिबळाचादेखील समावेश झाला आहे. भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद सध्या जर्मनीमध्ये एससी बॅडेन स्पर्धा खेळत आहे. पाच वेळा विश्वविजेता आनंदला …

Read More »

शेकापचे नेते निवडणुकीत पैसे खर्च करायला तयार आहेत…; मग कर्नाळा बँक ठेवीदारांचे पैसे का नाही परत करीत?

पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाचे नेते निवडणुकीत पैसे खर्च करायला तयार आहेत, मग ही मंडळी कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे का परत करीत नाहीत, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. कर्नाळा ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने रविवारी (दि. 15) खांदा कॉलनीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. …

Read More »

कोरोनाचा ब्रह्मराक्षस!

चीनमधून पसरलेल्या महाभयंकर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता भारतातही वाढू लागला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून, सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना या तीन अक्षरी शब्दाने सध्या जगभरात धुमाकूळ माजवला आहे. चीनपाठोपाठ आता …

Read More »

ना. नितीन गडकरी यांची प्रवाशांना भेट; बहुप्रतीक्षित रो-रो सेवेचा शुभारंभ

अलिबाग : प्रतिनिधी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली भाऊचा धक्का (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) ही बहुप्रतीक्षित रो-रो फेरीबोट रविवारपासून (दि. 15) प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. रो-रो सेवेची बोट प्रवाशांना घेऊन मांडवा बंदरात दाखल झाली तेव्हा तिचे स्वागत करण्यात आले.   कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात …

Read More »