Breaking News

महत्वाच्या बातम्या

मागूर माशांच्या साठ्यावर कारवाई

अलिबाग : जिमाका राष्ट्रीय हरीत लवादाने प्रतिबंधित केलेल्या मागूर माशाचा साठा केल्याप्रकरणी मत्स्यव्यवसाय विभाग रायगड जिल्हा सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाने कारवाई केली आहे. या अंतर्गत खालापूर तालुक्यात दोन ठिकाणचा साठा पथकाने नष्ट केला, तर पनवेल तालुक्यात नऊ जणांना नोटीस बजाविण्यात आली आहे. खालापूर तालुक्यातील महड गावात एका मत्स्यसंवर्धकाच्या तलावात प्रतिबंधित मागूर …

Read More »

पनवेल : तरघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या सविता कोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मच्छिंद्र कोळी, बाळाराम कोळी, विठ्ठल ओवळेकर, जयेंद्र कोळी, शैलेश भगत आदी सोबत होते.

Read More »

धाटाव एमआयडीसीतील अन्शुल कंपनीत वायुगळती; 11 कामगार रुग्णालयात दाखल

रोहे ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील मे. अन्शुल स्पेशालिटी मोल्युक्युल्स प्रा. लि. या कंपनीत रासायनिक अभिक्रिया चालू असताना पाइपलाइन फुटल्याने वायुगळती झाली. त्यामुळे तेथे काम करीत असलेल्या तीन कामगारांना वायूची तीव्र बाधा झाली. त्याचप्रमाणे कंपनीतील आणखी आठ जणांना त्रास झाल्याने त्यांनाही तातडीने रोहा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले …

Read More »

भूखंड वापर बदल, अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकाबाबत सिडकोचे नवीन धोरण

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा : सिडको संचालक मंडळाच्या फेब्रुवारी 2020मध्ये पार पडलेल्या बैठकीत भूखंड वापर बदल व अतिरिक्त चटई क्षेत्र देण्याबाबतचे व्यापक धोरण ठरविण्यात आले असून त्यानुसार भाडेपट्टा अधिमूल्य आकारून विविध वापरासाठी दिलेल्या भूखंडांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक देण्यासह भूखंड वापर बदल करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. नवी मुंबईसाठीचे …

Read More »

पनवेल मनपा स्थायी समितीची सभा पुन्हा स्थगित

पनवेल : प्रतिनिधी : पनवेल महापालिकेचा 2019चा सुधारित व 2020-21च्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी  मंगळवारी (दि. 17) झालेली स्थायी समितीची सभा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली. या वेळीही संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. स्थायी समितीसमोर 6 मार्चला सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी 12 मार्च रोजी स्थायी समितीची सभा …

Read More »

कोरोना व्हायरससंदर्भात नवी मुंबईत डॉक्टरांचे प्रशिक्षण

नवी मुंबई : बातमीदार : नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग व ‘इ’प्रभाग समिती सदस्य डॉ. प्रतीक प्रभाकर तांबे यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. 14) हिम्पाम, नवी मुंबई व निमा, नवी मुंबई या वैद्यकीय संघटनेच्या सर्व डॉक्टरांचे प्रशिक्षण नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झाले. कोरोनासंदर्भात नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नवी …

Read More »

अत्यावश्यक कामाशिवाय जनतेने बाहेर पडू नये -महसूल आयुक्त शिवाजी दौंड

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त  : कोकण विभागातील जनतेला आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोरोनासंदर्भात कोकण विभागात शासकीय पातळीवर सर्व प्रकारच्या यंत्रणा कार्यान्वित झाल्या असून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा काम करीत असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही दिवसांत कोकण …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसही दक्ष

पनवेल ः रामप्रहर वृत्त : देशभर उद्रेक माजवलेल्या कोरोनाचा सर्वांनीच धसका घेतला आहे. शाळा, कॉलेजेस, मॉल्स तसेच विविध कार्यक्रमही शासनातर्फे बंद ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी 24 तास कर्तव्य बजावत असणार्‍या पोलिसांना स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनीही सतर्कता दर्शविली आहे. पोलीस ठाण्यात …

Read More »

महाडमध्ये कोरोनटाईन सेंटर कार्यान्वित; चार जण निरीक्षणाखाली

महाड : प्रतिनिधी : कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये कोरोनटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी देशात आणि देशाबाहेर पर्यटनासाठी जाऊन आलेल्या चार जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. कोरोना व्हायरसमुळे महाडमधील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, शाळा तसेच किल्ले …

Read More »

कर्जत नगर परिषदेतर्फे जनजागृती मोहीम

कर्जत : प्रतिनिधी जीवघेण्या कोरोना विषाणूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून कर्जत नगर परिषदेच्या वतीने जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोरोना प्रतिबंधका काय काळजी घ्यायची याबाबत माहिती पत्रके वाटण्यात आली. नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेवक, कर्मचारी यांनी कर्जत शहराच्या मुख्य बाजार पेठेत फिरून जनजागृती केली. बाजारपेठेत …

Read More »