Breaking News

महत्वाच्या बातम्या

लिमये वाचनालयात महिला दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पनवेलमधील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला. माधुरी गोसावी, मीरा जाधव, प्रभा सहस्त्रबुध्दे, जोशी मॅडम यांच्या सोबतच समाजातील तळागाळातील पदपथावर फुले, भाजी विकणार्‍या, भंगार व कचरावेचक स्त्रियांचा …

Read More »

पनवेलच्या काळसेकर पॉलिटेक्निकचे ‘ज्युनिअर तंत्रोत्सव 2020’मध्ये यश

पनवेल : रामप्रहर वृत्त अंजुमन-ए-इस्लाम या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेच्या अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेलच्या सव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रस्तरीय ज्युनिअर तंत्रोत्सव 2020मध्ये लक्षणीय यश संपादन केले. नुकत्याच वसई येथील युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे आयोजित ज्युनिअर तंत्रोत्सव 2020या राष्ट्रस्तरीय तंत्रमहोत्सवात काळसेकर पॉलिटेक्निकच्या सिव्हिल  इंजिनिअरिंग विभागाच्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभागी …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त उरणमध्ये विविध उपक्रम

उरण : वार्ताहर उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांस 800 ते 900 महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  प्रमुख पाहुण्या डॉ. अरुंधती भालेराव व नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे होत्या. संस्थेच्या अध्यक्षा कल्याणी दुखंडे यांच्या अध्यक्षतेखाली फ्रेंड्स फॉर एव्हर मंडळाच्या कल्पना …

Read More »

राजस्थान वैष्णव मित्र मंडळातर्फे होलिकोत्सव; आमदार महेश बालदी यांची उपस्थिती

उरण : वार्ताहर उरण येथील राजस्थान वैष्णव मित्र मंडळाच्या वतीने होळी महोत्सव 2020चे युईएस कॉलेज येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी उपस्थित होते. या वेळी विशेष होळीच्या गाण्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे दहावी  व बारावीत 72 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा आमदार …

Read More »

भटक्या व विमुक्त जाती संघाच्या पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्रे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भटक्या व विमुक्त जाती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तिपत्रके वाटप करण्यात आली. यामध्ये युवक प्रदेश अध्यक्ष आकाश भोसले, महिला आघाडीच्या शारदा इंगोले, …

Read More »

उरणच्या नेव्हल परिसरात बिबट्याचा वावर? वनविभाग आणि नेव्हीकडून संयुक्त गस्त

पनवेल : बातमीदार उरण येथील नेव्हल परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला असून जेट्टीनजीक बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. यामुळे वनविभाग आणि नेव्ही यांची या परिसरातील संयुक्त गस्त सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उरण शहरालगत असलेल्या नेव्हल परिसरात जेट्टीलगत गस्त घालत असलेल्या कर्मचार्‍यांना बिबट्या दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. …

Read More »

भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पावसाचा विजय

धरमशाला : वृत्तसंस्थाभारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. 12)धरमशाला येथे होणार होता, मात्र सतत पडणार्‍या पावसामुळे अखेर एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द करण्यात आला. धरमशाला येथे दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होणार होता, पण पाऊस आणि ओली खेळपट्टी यामुळे सामन्याची नाणेफेकही होऊ शकली नाही. आधी ओली …

Read More »

महिलांच्या आगामी वन डे विश्वचषकात बाद फेरीच्या लढतींसाठी राखीव दिवस

वेलिंग्टन : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियात झालेल्या महिला विश्वचषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य सामन्यांसाठी राखीव दिवस न ठेवल्यामुळे टीकेला सामोरे जाणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रकरणातून बोध घेतला आहे. 2021मध्ये रंगणार्‍या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही उपांत्य लढती, तसेच अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात येणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले.भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात गेल्या …

Read More »

भालाफेकपटू शिवपाल सिंह टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताचा भालाफेकपटू शिवपाल सिंह आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. नीरज चोप्रानंतर टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवलेला शिवपाल हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. पात्रता फेरीत ऑलिम्पिक तिकीट मिळवण्यासाठी 85 मीटरचे अंतर पार करण्याची अट होती. शिवपालने 85.47 मी. लांब भाला फेकत टोकियोचे तिकीट मिळवले.साबळेलाही तिकीट शिवपाल सिंहव्यतिरिक्त …

Read More »

10पीएल टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट; भारताकडून पाकचा धुव्वा

शारजा : वृत्तसंस्था10पीएल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात भारतीय संघाने कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 45 धावांनी दणदणीत विजय साकारला. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 10 षटकांत 5 बाद 86 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा संघ मात्र 8.5 षटकांत 41 धावांमध्ये गारद झाला.  पाकिस्तानातून सातत्याने होत असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे भारताने …

Read More »