Breaking News

महत्वाच्या बातम्या

काशीद किनारा पर्यटकांनी गजबजला; वाहनांच्या मोठ्या रांगा

मुरुड : प्रतिनिधी                   मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनारी रविवारची सुट्टी साधून मोठ्या संख्येने पर्यटक काशीद किनारी स्थिरावले होते. वाहनांच्या मोठ्या रांगा समुद्र किनारी लागल्या होत्या. पर्यटक समुद्र किनारी मोठ्या संख्येने आल्याने मुरुड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पर्यटक उंट स्वारी, घोडागाडी तर काहींनी समुद्रात बनाना रायडींग तर पॅरासेलिंग चा …

Read More »

उरण येथे पोलिओ लसीकरण मोहिमेला प्रतिसाद

उरण : वार्ताहर उरण शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी (दि. 19) इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रेयांच्या हस्ते बालकांना डोस देण्यात आले. या वेळी राज्यपातळी चे अधिकारी डॉ. कर्नाटक सिव्हील हॉस्पिटल आलिबागचे उषा …

Read More »

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला सक्तमजुरी

पनवेल : बातमीदार चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यामध्ये हातोड्याने प्रहार करून तिची हत्या करणार्‍या श्रीनिवास सुब्बाराव चित्तुरी (45)याला पनवेल सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जानेवारी 2016मध्ये ही घटना खारघरमधील केंद्रीय विहारमध्ये घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी श्रीनिवास हा शिक्षिका असलेली पत्नी पुष्पा व …

Read More »

नाइट लाइफवरून विसंवाद

मायानगरी मुंबापुरीत नाइट लाइफ सुरू करण्याची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली. येत्या 26 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार होती, मात्र यावरून सरकारमध्ये सहभागी प्रमुख नेत्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे महाआघाडीतील विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबईची …

Read More »

कोकण विभागीय मेळाव्याला आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन यांच्यावतीने आयोजित कोकण विभागातील पनवेल महानगरपालिकेसह नगरपालिका, आणि नगरपंचायतीमधील कामगार कर्मचारी आणि अधिकार्‍यांचा कोकण विभागीय मेळावा रविवारी (दि. 19) काळण समाज हॉलमध्ये झाला. या मेळाव्यास रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. हा मेळावा …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेणार -आमदार महेश बालदी

मोहोपाडा : प्रतिनिधी सामान्य जनतेबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविताना शासकीय मदतीबरोबर मी व्यक्तीगत देखील देखभाल करीन, असे आश्वासन उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिले. ज्येष्ठ नागरिक संस्था चौक यांच्यावतीने उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सत्काराचे आयोजन शनिवारी (दि. 18) ज्येष्ठ नागरिक सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी आमदार बालदी बोलत होते. …

Read More »

चांगल्या योजनांना ब्रेक लावणारे सरकार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची आघाडी सरकारवर टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्याच्या राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ चालणार नाही. महायुतीच्या काळातील अनेक चांगल्या योजनांना ब्रेक लावू पहाणारे हे ब्रेक सरकार आहे. चांगल्या योजना बंद करण्याऐवजी त्यांनी त्याहून अधिक चांगल्या योजना आणून त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी नाशिकमध्ये …

Read More »

नागोठण्यात नेत्रचिकित्सा शिबिरास प्रतिसाद

नागोठणे : प्रतिनिधी शासनाच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 17) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर चालणार्‍या वाहनांच्या चालकांसाठी नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी 25 वाहनचालकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. नागोठणे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, नेत्रचिकित्सा अधिकारी …

Read More »

कर्जतमध्ये रस्ता सुरक्षा अभियान

कर्जत : प्रतिनिधी अपघातग्रस्तांना मदत करणार्‍यांना कोणताही त्रास होणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे रस्ता अपघातात सापडलेल्यांना तातडीने मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पनवेल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक गजानन ठोंबरे यांनी कर्जत येथे केले. कर्जत येथील कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर …

Read More »

केळवली-बीडखुर्द मार्गाची चाळण

प्रवास करणे बनले कठीण; खड्ड्यांतून मार्गक्रमण जिकिरीचे खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील काही रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासीवर्गाला व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच खालापुरातील केळवली रेल्वे स्टेशन ते बीडखुर्द हा मार्ग जणू खड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जात असल्याने या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांसह प्रवासीवर्गाला …

Read More »