पनवेल ः प्रतिनिधी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल ओवेपेठ विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव दि. 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. या महोत्सवात खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. म्हात्रे सर व क्रीडा शिक्षक श्री. संभाजी जाधव सर …
Read More »मंगेश घासे यांची एनआयएस कबड्डी कोच कोर्ससाठी निवड
पाली ः प्रतिनिधी शिहू बेणसे विभागातील मुंढाणी गावचे सुपुत्र, भारतीय सैनिक तथा जे. जे. पाटील सर यांचे शिष्य असलेल्या मंगेश नामदेव घासे यांची स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ इंडियामार्फत (पटियाला) येथे होणार्या एन. आय. एस. कबड्डी कोच कोर्ससाठी निवड झाली आहे. मंगेश घासे श्री गावदेवी क्रीडा मंडळ संघाचा उत्कृष्ट व नावाजलेला खेळाडू …
Read More »आचरेकर सरांच्या आठवणींनी सचिन झाला भावूक
मुंबई ः प्रतिनिधी भारतीय संघाचा माजी कसोटीपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करणार्या सचिन तेंडुलकरचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांची गुरुवारी पहिली पुण्यतिथी होती. 2 जानेवारी 2019 साली आचरेकर सरांचे वयाच्या 87व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. या दिवशी सचिन आपल्या आवडत्या आचरेकर सरांच्या आठवणींमुळे भावूक झाला असून, त्याने आपल्या …
Read More »मनजोत कालरावर एका वर्षाची बंदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक ठोकून हिरो ठरलेला सलामीवीर मनजोत कालरा याला मोठा झटका बसला आहे. अंडर 16 आणि अंडर 19 स्पर्धांमध्ये खेळताना वयाशी फेरफार केल्याचा ठपका कालरावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी डीडीसीएच्या लोकपालांनी त्याला एका वर्षासाठी निलंबित केले आहे. त्याला …
Read More »लाराला भारतीय खेळाडूंवर विश्वास
नवी दिल्ली : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये आयसीसीची प्रत्येक स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे, असे वेस्ट इंडीजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा याने सांगितले. तसंच त्यानं कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावांचा (400) विक्रम मोडू शकणार्या तीन फलंदाजांची नावंही सांगितली. यात दोन भारतीय फलंदाज आहेत. ब्रायन लारा यानं सध्याच्या भारतीय संघाचं …
Read More »विराट टीम इंडियाचा कणा, कृष्णामाचारी श्रीकांत यांच्याकडून कौतुक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या जगातला अव्वल फलंदाज आहे. अवघे क्रिकेटविश्व त्याला रनमशीन म्हणून ओळखते. क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यालाही अनेक वेळा संधी देण्यात आली होती. त्यामुळेच तो आज टीम इंडियाचा ’कणा’ आहे. माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णामाचारी श्रीकांत यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली …
Read More »साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन
पनवेल : विहीघर येथे साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा, मंगेश फडके यांचा वाढदिवस समारंभ आणि कुस्त्यांच्या दंगलींचे पंढरीशेठ फडके यांनी आयोजन केले होते. या सोहळ्याला सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजप महिला मोर्चा अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी गुरुवारी भेट दिली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य …
Read More »दूध पिऊन करा नवीन वर्षाचे स्वागत
स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्थेचा उपक्रम नवी मुंबई : प्रतिनिधी महापे येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, महापे वाहतूक शाखा, स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दूध वाटप करण्यात आले. दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे या वेळी आवाहन करण्यात आले. 300 नागरिकांनी याचा लाभ …
Read More »तळोजात शेकडो अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
औद्योगिक विभागाची धडक कारवाई कळंबोली : प्रतिनिधी तळोजा औद्योगिक विभागातील शेकडो अनधिकृत बांधकावर औद्योगिक विभागाने धडक कारवाई करत शेकडोच्यांवर बांधकामे गुरूवारी (दि. 2) जमिनदोस्त केली. या कारवाईमुळे स्थानिक गावकर्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तळोजा औद्योगिक विभागाचे उपाअभियंता राजेंद्र बेलगामवार यांनी तळोजा औद्योगिक विभागातील अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्याचा संकल्पच केला आहे. …
Read More »शाळेत चोरी करणार्याचा शोध
पनवेल : वार्ताहर खारघर सेक्टर-15 मधील विबग्योर हाय माध्यमिक शाळेमध्ये घुसलेल्या एका चोरट्याने शाळेच्या रिसेप्शन विभागात असलेला एलईडी टीव्ही, लॅपटॉप तसेच क्रिडांगणाच्या कोपर्यात लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरट्याची हि चोरी कैद झाली असून खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper