Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाला वेग

अंतिम टप्प्यात असलेली कामे लवकरच पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस पनवेल : बातमीदार नवीन वर्षात मागील वर्षी पूर्ण करता न आलेल्या कामांना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमधील गाभा क्षेत्रातील पूर्ण न झालेली प्राथमिक कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न या वर्षी केला जाणार आहे. …

Read More »

हस्तांतरण शुल्काचे दर कमी केल्याने पालिकेची प्रलंबित प्रकरणे निकाली

परेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने कमी झाला हस्तांतरण शुल्क दर पनवेल : बातमीदार पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर वाढविण्यात आलेले हस्तांतरण शुल्काचे दर कमी करण्यात आल्यामुळे वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेली मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. मालमत्ताधारकांची मोठी आर्थिक बचत झाल्यामुळे हस्तांतरण करण्यास मालमत्ताधारकांनी सकारात्मकता दाखवली. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत वर्षभरातील आणि गतवर्षीची …

Read More »

रायगडात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

अलिबाग : प्रतिनिधीफटाक्यांची आतषबाजी करीत रायगड जिल्ह्यामध्ये सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.  थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांवर दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. यंदा सुटीचा दिवस नव्हता तरीही किनार्‍यांवरील गाव-वाड्यांमध्ये पर्यटक हजारोंच्या संख्येने आले होते. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, बोर्ली पंचतन, काशिद, आवास, नागाव, …

Read More »

उरणमध्ये तेलाचा कंटेनर उलटून वाहतूक ठप्प

उरण : बातमीदारतालुक्यातील न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोरील उड्डाणपुलाजवळ बुधवारी (दि. 1) तेलाचा एक कंटेनर उलटला. त्यामुळे तेल रस्त्यावर पसरून वाहतूक जवळपास पाच ते सहा तास ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातून निघालेल्या ट्रायटोन मल्टिमोडल लिमिटेड कंपनीच्या ट्रेलरवरून नेण्यात येणारे दोन 20 फुटी कंटेनर न्हावा-शेवा पोलीस …

Read More »

खासदार संजय राऊत उद्धव ठाकरेंवर नाराज?

‘त्या’ फेसबुक पोस्टद्वारे चर्चेला उधाण मुंबई : प्रतिनिधीशिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचे आता उघड झाले आहे. याचे कारण आहे एक फेसबुक पोस्ट. राऊत यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून उद्धव यांच्यावर निशाणा साधला असून, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी …

Read More »

महाराष्ट्रात बेईमान सरकार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका पालघर : प्रतिनिधीजनतेने आम्हाला जनमत दिले होते, मात्र शिवसेनेने बेईमानी केली. त्यामुळे हे बेईमानी करून तयार झालेले सरकार आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर बुधवारी (दि. 1) घणाघाती टीका केला. पालघरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात …

Read More »

नववर्षात इस्रो घेणार भरारी!

गगनयान, चांद्रयान-3साठी केंद्र सरकारची परवानगी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नव्या वर्षात गगनयान आणि चांद्रयान-3 अवकाशात सोडणार आहे. ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच पत्रकार परिषदेत बोलताना बुधवारी (दि. 1) देशवासीयांना ही आनंदाची बातमी दिली. या वेळी त्यांनी इस्रोची पुढील मोहीम व योजनांची माहिती दिली.चांद्रयान-3 मोहिमेसाठी …

Read More »

मिनी अर्थसंकल्पच!

देशात होऊ घातलेल्या कामांच्या संदर्भात ‘सरकार विचार करत आहे’ असे छापील उत्तर नेहमीच दिले जाते. हे नेहमीचे उत्तर देण्यापेक्षा निश्चित तरतुदींची घोषणा पहिल्यांदाच असावी. सरकारच्या निश्चयात्मकतेमुळे उद्योगपतींच्या गुंतवणूक संकल्पांनाही बळ प्राप्त होणार असून, भांडवलाची जुळवाजुळव करण्यास त्यांना पुरेसा अवसर प्राप्त होऊ शकेल. त्यामुळेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पायाभूत सेवांसाठी दिलेले …

Read More »

विहीघर (ता. पनवेल) : भाजप युवा नेते मंगेश फडके यांना वाढदिवसानिमित्त तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. सोबत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ज्येष्ठ नेते पंढरीशेठ फडके, युवा कार्यकर्ते शेखर शेळके, सुनील पाटील.

Read More »

पनवेलकरांनी केले नववर्षाचे स्वागत जल्लोषात, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

पनवेल : वार्ताहर नववर्षाचे स्वागत दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलकरांनी जल्लोषात केले असले तरी बाजारपेठेत मंदीचा फटका या जल्लोषात दिसून आला. त्यातच हॉटेल पहाटे पर्यंत तर वाईन शॉप एक वाजेपर्यंत आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले असले तरी त्यांना प्रतिसाद लाभला नाही. नाक्यानाक्यावर असलेला पोलीस बंदोबस्त व ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या …

Read More »