Breaking News

महत्वाच्या बातम्या

शैक्षणिक साहित्यनिर्मिती स्पर्धेत टिळक खाडे प्रथम

नागोठणे : प्रतिनिधी  सुतारवाडी येथे 23 व 24 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या रोहे तालुका विज्ञान प्रदर्शनातील शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत माध्यमिक गटात नागोठणे विभागातील वांगणी येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक टिळक उमाजी खाडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. खाडे यांनी या स्पर्धेत प्रकाशीय उपकरणे या घटकावर अध्ययन अध्यापनास उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य …

Read More »

नेरळ कुंभारआळी शाळेचे भिजत घोंगडे; इमारत पाडून तीन वर्षे पूर्ण

कर्जत ़़: बातमीदार नेरळ  कुंभारआळी भागातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी जुन्या इमारती पाडण्यात आल्या आहेत, त्याला तीन वर्षे पूर्ण झाली असून नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती नाही. दरम्यान, इमारत उपलब्ध नसल्याने त्या शाळेचे विद्यार्थी एकाच इमारतीमध्ये दाटीवाटीने बसून शिक्षण घेत आहेत. नेरळ गावातील कुंभारआळी येथे …

Read More »

महाडमध्ये हजारो भीमसैनिकांचे महामानवाला अभिवादन!

महाड : प्रतिनिधी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाचे दहन करून भारतातील उपेक्षितांना त्यांचा न्याय हक्क प्राप्त करून दिला. या दिनाचे स्मरण म्हणून महाडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्मृतिदिनाकरिता भीमसैनिकांची महाडच्या क्रांतिस्तंभाला अभिवादन करण्याकरिता एकच गर्दी लोटली होती. या कार्यक्रमाकरिता हजारो भीमसैनिकांनी हजेरी लावून महामानव …

Read More »

राष्ट्रवादी-सेना-शेकापत जुंपली, खोपोलीत पालिकेच्या नूतन कार्यालय नामकरणावरून तू…तू मै…मै…

खोपोली : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व शेकापमध्ये खोपोली नगरपालिका नूतन कार्यालयाच्या नामकरणावरून तू…तू मै…मै…सुरू असून, त्यातून मार्ग काढताना नगरपालिका प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत. येथील नगरपालिकेचे नूतन प्रशासकीय संकुल तयार असून काही पुढील महिन्यात त्याचे उद्घाटन करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या …

Read More »

प्रा. आमलपुरे यांना राष्ट्रीय पुरस्कार रोहे ः मुंबईतील ग्लोबल टिचर्स असोसिएशनतर्फे कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. सूर्यकांत आमलपुरे यांना रविवारी (दि. 22) राष्ट्रीय गुरू गौरव विद्यारत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मुंबईत रविवारी झालेल्या कार्यक्रमात पद्मश्री डॉ. शहा आणि असोसिएशन अध्यक्ष श्री. जगदाडे यांच्या हस्ते …

Read More »

कर्जत :  पोलीस हवालदार कृष्णा जानू वाघमारे यांनी आपल्या समाजाविषयी लिहिलेल्या ‘मी कातकरी‘ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कर्जतमधील सीबीसी हॉलमध्ये झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला पोलीस निरीक्षक अरुण भोर, सहाय्यक निरीक्षक जोगदंड, उपनिरीक्षक देठे, महिला समाजसेवक ठमाबाई पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी …

Read More »

प्रधान महाविद्यालयाचा प्रकल्प विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र

नागोठणे : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठ आयोजित रायगड जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा खालापुरातील विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आली. स्पर्धेत जिल्ह्यातील 197  प्रकल्प सहभागी झाले होते व त्यात नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान  महाविद्यालयातील 8 प्रकल्पासह 18 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यातील एक प्रकल्प विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. प्रा. चैत्राली पाटील यांच्या …

Read More »

हाळ गावात स्वच्छतेचा बोजवारा; ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका

खोपोली : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानाला हाळ ग्रामपंचायतीने असहकार पुकारला, अशी परिस्थिती गावात असून सर्वत्र कचर्‍याचे ढिग पडले आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत महड देवस्थानालगत हाळ ग्रुप ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत हद्दीत असणार्‍या खैरा लोकवस्तीत सध्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार …

Read More »

काशीद व मुरुडमध्ये पर्यटकांचा महापूर

मुरुड : प्रतिनिधी सलग आठ दिवस नाताळाची सुट्टी शाळेला पडल्याने  पर्यटकांनी मुरुड व काशीद समुद्रकिनारी तुफान गर्दी केली आहे. सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी बुधवारी (दि. 25) सकाळपासूनच राजपुरी जेट्टी, खोरा बंदर, आगरदांडा जेट्टी तसेच दिघी येथून पर्यटकांनी गर्दी केली होती. किल्ल्यावर जाण्याकरिता बोटीत बसण्यासाठी पर्यटकांना किमान एक ते दिड …

Read More »

थंडीची चाहूल लागताच मेजवान्यांना बहर

वालाऐवजी पावट्याच्या शेंगा टाकून ‘पोपटी’चा बेत पनवेल : बातमीदार थंडीची चाहूल लागल्यानंतर सध्या खवय्यांना वालाच्या शेंगाच्या ‘पोपटी’चेही वेध लागले असतात. मात्र यंदा पाऊस लांबल्याने वालाच्या शेंगांचे उत्पादनच आले नसल्याने पनवेल तालुक्यातील पोपटी पावट्याच्या शेंगावर साजरी केली जात आहे. अर्थात पोपटीत वालाच्या शेंगांची चव पावट्यांमध्ये नसल्याची बाब अनेकांनी नोंदवली. वालाच्या शेंगासह …

Read More »