कर्जत ः प्रतिनिधी पोशीर येथील श्रमजीवी जनता विद्यामंदिर विद्यालयात अनेक गावांतून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, परंतु गावांमधून येणार्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते. ज्या गावात रिक्षा, एसटी जात नाही अशा गावांमधील गोरगरीब, गरजू सुमारे 50 मुलींना रोटरी क्लब ऑफ देवनार यांच्या वतीने शनिवारी सायकलचे वाटप करण्यात …
Read More »नलक्षवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ
दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी एक डम्पर आणि जेसीबीसह नऊ वाहने पेटवून दिली. या अगोदर झारखंडमध्ये लातेहार जिल्ह्यात नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिसांचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी 13 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड येथील सुकमामधील गचनपल्ली गावात डीआरजी (डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्स)कडून करण्यात आलेल्या कारवाईत एक लाखाचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला …
Read More »फडणवीस सरकारकडून शेतकर्यांना मदत मिळेल : विखे-पाटील
नगर : प्रतिनिधी ओल्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्याला मदतीची अपेक्षा ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडूनच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार मिळणार असल्यामुळे शेतकर्यांना भरघोस मदतीची असलेली अपेक्षा पूर्ण होईल, असा विश्वास माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचा 70वा गळीत …
Read More »खासदार संजय काकडेंनी घेतली शरद पवार यांची भेट
मुंबई : प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सुनावणी सुरू होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय खासदार संजय काकडे यांनी ‘सिल्व्हर ओक’ला येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. काकडे यांच्या पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना वेग आला आहे, मात्र आपली ही खासगी भेट असून, …
Read More »भावी पत्नीच्या उपचारासाठी पतीचे संस्थांना आवाहन
पनवेल : वार्ताहर हुंड्यासाठी मुलीचा छळ केल्याची अनेक प्रकरणे आपल्या कानावर येतात. लग्नानंतर मुलीसह तिच्या कुटुंबीयांना धमकाविण्याचे प्रकार समाजात आजही पाहावयास मिळत असताना पनवेलमधील हरिग्राम येथे राहणार्या विजय मोरे या तरुणाने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अश्विनी पंढरीनाथ शेळके (26) या तरुणीसोबत जमलेल्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच तिचे …
Read More »तळोजा एमआयडीसीत वृक्षतोड; पनवेल महानगरपालिकेकडे तक्रार
कळंबोली ः वार्ताहर एकीकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश सरकारकडून देण्यात येत आहे, तर दुसरीकडे तळोजा एमआयडीसी परिसरात मोठ्या संख्येने वृक्षतोड केली जात असून, याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या वृक्षतोडीविरोधात पनवेल महापालिका आणि वनविभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून वृक्षारोपणाचा संकल्प करून ‘झाडे लावा, …
Read More »पनवेल-कर्जत मार्गावर लोकल कधी?
2007मध्ये मालगाडी वाहतूक सुरू झाल्यानंतर आजतागायत कर्जत-पनवेल मार्गावर उपनगरीय प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी रेल्वेमंत्र्यांनी कार्यवाही करावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. या मार्गावर मालगाडी वाहतुकीनंतर काही गाड्या या मार्गाने चालविल्या जात आहेत. तर दुसर्या मार्गिकेसाठी भूसंपादन करण्याची कार्यवाही अत्यंत धीम्या गतीने होत आहे. मधू दंडवते देशाचे रेल्वेमंत्री …
Read More »स्वागतार्ह पुनरागमन
अजितदादांना असलेले राजकीय भान शिवसेनेच्या नेत्यांना असते तर ही वेळच आली नसती. अर्थात अजितदादांनी भाजपासोबत जाणे विरोधकांना चांगलेच झोंबले आहे हे तर दिसतेच आहे. परंतु या सार्याचा सांगोपांग विचार करून अत्यंत समंजसपणे देवेंद्रजी आणि अजितदादा यांनी हातमिळवणी केली आहे. महाराष्ट्रात नवे ‘देवेंद्र पर्व’ सुरू होत आहे आणि त्याला अजितदादांची भरभक्कम …
Read More »आठ किलोचा गांजा जप्त
पनवेल : बातमीदार उलवे व एनआरआय परिसरात गांजा या अमली पदार्थाची विक्री करणार्या माणिक जयराम रुडे (32) या व्यक्तीला परिमंडळ 1मधील अमली पदार्थविरोधी विशेष पथकाने उलवे भागात सापळा रचून अटक केली. त्याची गाडी आणि घरामधून पोलिसांनी सात किलो 900 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. अमली पदार्थ विरोधी विशेष पथकातील …
Read More »कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका
मोहोपाडा : वार्ताहर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा गावात एका घरासमोर चारा पाण्याची सोय न करता कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका करण्यात आली. रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या सतर्कतेमुळे या सहा गाई व दोन वासरांना जीवदान मिळाले आहे. मौजे आपटा येथे ही जनावरे सुफियान जलिल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper