Breaking News

महत्वाच्या बातम्या

महामार्गावर महाडनजीक अपघात

महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक मंगळवारी (दि. 26) रात्री भरधाव कार चालक रस्त्यालगत असलेल्या एका झाडावर आपटल्याने कारचे नुकसान झाले. मात्र कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. बिरवाडीयेथील रुपेश जनार्दन कदम (वय 26) याने मंगळवारी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास भरधाव कार (एमएच-06, बीएम-4053) चालवत रस्त्यालगत एका झाडाला ठोकर दिली. …

Read More »

‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक मोहिमेचा लाभ घ्या’

अलिबाग :  जिमाका ग्रामीण भागातील, तळागाळातील प्रत्येक ग्रामस्थाला डिजीटल बँकेचे व्यवहार समजावेत आणि तोही या प्रवाहात सामील व्हावेत,  यासाठी भारतीय रायगड डाक विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) च्या सहाय्याने ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचण्याची मोहीम सुरु केली आहे. या पोस्ट पेमेंट बँकेची माहिती अधिकाधिक जनतेपर्यंत पोचवा, असे प्रतिपादन जिल्हा डाक अधिक्षक …

Read More »

बंदी घातलेल्या दीपिका, स्नेहल भारतीय संघात

मुंबई : प्रतिनिधी काठमांडू (नेपाळ) येथे होणार्‍या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या दोन्ही कबड्डी संघांची निवड करताना निवड समितीने अजब प्रयोग केला. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत साखळीत गारद झालेल्या आणि नुकतीच महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेकडून बंदी घालण्यात आलेल्या दीपिका जोसेफ आणि स्नेहल शिंदे यांना भारताच्या मुलींच्या संघात स्थान देण्यात आले आहे, …

Read More »

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसन विजेता

कोलकाता : वृत्तसंस्था टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत झालेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकाराच्या नऊ लढतींपैकी अखेरच्या पाच लढतींमध्ये फक्त एक गुण कमावणार्‍या भारताच्या विश्वनाथन आनंदला प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी पात्र होण्यात अपयश आले. मॅग्नस कार्लसनने मात्र वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर एकूण विक्रमी 27 गुणांसह जेतेपदावर नाव कोरले. वर्षाच्या पूर्वार्धात अबिदजान (आयव्हरी …

Read More »

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विनेश, साक्षी खेळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जालंधर येथे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत होणार्‍या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील महिला विभागात जागतिक कांस्यपदक विजेती विनेश फोगट (55 किलो) व ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक (62 किलो) प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. पुरुषांत फ्री स्टाईल, ग्रीको रोमन व महिलांच्या विविध गटांत होणार्‍या स्पर्धेत …

Read More »

धवन ‘आऊट’, संजू ‘इन’

विंडीजविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत बदलांची मालिका सुरूच आहे. सर्वांत प्रथम पहिल्या टी-20 सामन्याचे ठिकाण बदलण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी तिसर्‍या पंचांकडे सोपवली. आता मालिकेला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सलामीवीर शिखर …

Read More »

महाआघाडीचे तीनचाकी सरकार चालणे कठीण, देवेंद्र फडणवीस यांचे भाष्य; मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरले नाही. त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच महाआघाडीचे तीनचाकी सरकार चालणे कठीण असल्याचे भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मंगळवारी (दि. 26) भरगच्च पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना …

Read More »

पनवेलमध्ये राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा, विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाच्या करंडकाने गौरविले जाणार

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे …

Read More »

संपकरी डॉक्टरांचा संप अखेर मागे

अलिबाग : प्रतिनिधी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांचे मानधन शासनाकडून वेळेत न दिल्याने डॉक्टरांनी संप पुकारला होता. जिल्हाधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक …

Read More »

उरणमध्ये बिबट्याची दहशत; लोक भयभीत

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिर्ले गाव परिसरात एका बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. बिबट्याच्या धास्तीने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. चिर्ले गावाच्या उत्तर दिशेला असणार्‍या जंगलात गेल्या काही महिन्यांपूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले होते. एका व्यक्तीने बिबट्याला पाहिले होते, मात्र त्याच्या बोलण्यावर वनखात्याच्या कर्मचार्‍यांसह पोलीस यंत्रणेनेही विश्वास …

Read More »