Breaking News

महत्वाच्या बातम्या

राज्यपालांकडून हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील शहीद 105 हुतात्म्यांना गुरुवारी (दि. 21) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड, कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी …

Read More »

रस्त्यांवर नोटांचा पाऊस

कोलकाता : कोलकातातील एका इमारतीत असलेल्या कंपनीच्या कार्यालयावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने छापा टाकला होता. त्यानंतर या इमारतीतून 2000, 500 आणि 100च्या नोटांचे बंडल खाली रस्त्यांवर फेकण्यात आले. हे पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यांवरून जाणार्‍यांची झुंबड उडाली होती. कोलकातातील एमके पॉइंट इमारतीतील सहाव्या मजल्यावरून बुधवारी दुपारी अचानक नोटांचा पाऊस पडू लागला. …

Read More »

शिवसेनेशी संभाव्य आघाडीस संजय निरूपम यांचा विरोध

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नवे सरकार राज्यात सत्तेवर येणार हे जवळपास निश्चित झाले असले तरी काही नेत्यांचा विरोधाचा सूर कायम आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी संभाव्य आघाडीला कडाडून विरोध दर्शवला आहे. ’शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून सहभागी होणे म्हणजे काँग्रेसला गाडून टाकण्यासारखे आहे,’ असे …

Read More »

पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले

वित्त व जीवितहानी नाही; सतत हादरे सुरू पालघर : प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील काही भाग गुरुवारी (दि. 21) सकाळी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी नोंदली गेली. यात कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाली नाही. गेल्या वर्षभरापासून या परिसराला भूकंपाचे हादरे बसत आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या …

Read More »

अयोध्येत गगनाला भिडणारे राम मंदिर बांधू

अमित शहा यांची घोषणा रांची : वृत्तसंस्था झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः धुरा हाती घेतली आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये बोलताना अमित शहा यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने अयोध्या प्रकरणात आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. अयोध्येवर आता सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राम …

Read More »

पत्रकार प्रफुल्ल पवार यांना पुरस्कार जाहीर

अलिबाग : महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन या पत्रकारांच्या संस्थेच्या वतीने अलिबागमधील ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल जगन्नाथ पवार यांना दि प्राईड ऑफ महाराष्ट्र या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आदर्श पत्रकार म्हणून त्यांचा हा गौरव होणार आहे. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात रविवारी (दि. 24) हा गौरव समारंभ-पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. त्यात राज्यभरातील विविध …

Read More »

साळाव येथे विवाहित महिलेला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी साळाव येथे एका विवाहीत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात एका इसमावर गुन्हा दाखल केला आहे. साळाव येथील प्राजक्ता कांबळे (वय 25) ही विवाहीत महिला मंगळवारी (दि. 19) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास  ओसरीवर जाऊबाईसह गप्पागोष्टी करीत बसली होती. त्यावेळी   तेथील सार्वजनिक रस्त्यावरून जाणार्‍या किशोर कांबळे यास प्राजक्ताने …

Read More »

श्री काळभैरवनाथ यांचा जन्मोत्सव साजरा

पोलादपूर : प्रतिनिधी श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानच्या वतीने मंगळवारी पोलादपूर नगरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी श्री काळभैरवनाथांचे दर्शन आणि तीर्थप्रसादासाठी भक्तांनी गर्दी केली होती. ग्रामदेवतांच्या देवस्थानामध्ये श्री काळभैरवनाथ, श्रीदेवी जोगेश्वरी, श्रीदेव रवळनाथ, श्री कालिकामाता, श्री मरीआई असे पंचायतन आहे. देवस्थानचे अध्यक्ष बाबूराव महाडिक …

Read More »

छायाचित्रकार समीर मोहिते यांना पुरस्कार जाहीर

 मुरूड : छायाचित्रकारितेत बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन फोटोग्राफी सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेने कोकणचे सुपुत्र समीर मोहिते यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा छायाचित्रकार पदवी पुरस्कार जाहीर केला आहे. समीर मोहिते गेली 15 वर्षे छायाचित्रण क्षेत्रात काम करीत आहेत. भारतातील विविध राज्यांच्या छायाचित्रणातील 32 विशेष पदव्या त्यांना प्राप्त झाल्या आहेत, तर विविध …

Read More »

मुरूड : येथील पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षकपदी रंगराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. मुरूड तालुका पत्रकार संघाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी यांचे अपघाती निधन झाल्यापासून हे पद रिक्त होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मुरूड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक पदावर रंगराव पवार यांची …

Read More »