नवी मुंबई : सिडको वृत्त सिडकोच्या व्हॅली शिल्प आणि सीवूड् इस्टेट या गृहनिर्माण योजनांतील मिळून शिल्लक 272 सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ शनिवारी (दि. 26) दुपारी 2.00 वा. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात आला. सदर 272 सदनिका या उच्च उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी उपलब्ध आहेत. …
Read More »अनंत कर्वे ः 55 वर्षे कंदील बनविणारा अवलिया
सेवा निवृत्तीचा काळ म्हणजे आराम, भटकंती. पण 74वर्षीय अनंत कर्वे यांनी स्वतःला आपल्या आयुष्यातील एका जुन्या छंदाने झपाटले आहे. टाकाऊपासून टिकाऊ आणि त्यातही आकर्षक वस्तू बनविणारे कर्वे यांना उतारवयात हा छंद वयाचे भान विसरायला लावतो. दरम्यान, या छंदातून त्यांनी हस्तकला आणि टिकाऊ वस्तूंचा खजिना उभा केला आहे. 39 वर्षे नोकरी …
Read More »वरुणराजाची बळीराजावर अवकृपा
दिवाळी आली, ऑक्टोबर संपायला आला तरी पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. परतीचा पाऊस झोडपतच आहे. कोकणात भातशेती हे मुख्य पीक घेतले जाते. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे पीक चांगले आले. लावणीसाठी पावसाची वाट पाहावी लागली नाही, पण भातपीक हाताशी आले व शेतकर्यांच्या हातचा घासच निघून गेला आहे. पावसामुळे शेतकर्यांची …
Read More »चोरीला गेलेले दागिने मिळाले परत
पाली ः प्रतिनिधी बहुतांश वेळेला चोरीला गेलेल्या ऐवजावर अनेकांना पाणी सोडावे लागते. मात्र सुधागड तालुक्यातील पाली येथील विशाल शिंदे यांच्या घरातील चोरीला गेलेला ऐवज पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे मिळाला. आपल्या चोरीला गेलेल्या दागिन्यांवर पाणी सोडून दिलेल्या विशाल शिंदे यांना सुखद अनुभव मिळाला आहे. विशाल नामदेव शिंदे (रा. हरिओम वास्तू सोसायटी, समर्थ नगर …
Read More »मुरूड वाचनालयातर्फे दिवाळी पहाट
मुरुड ः प्रतिनिधी येथील सार्वजनिक वाचनालय आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष अनिल कारभारी यांच्या हस्ते झाले. ही दिवाळी पहाट मैफल रंगली. रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी उपाध्यक्ष केदार गद्रे, कार्यवाह विनय मथुरे, संस्कृती समिती अध्यक्ष अस्मिता पेंडसे, नितीन पाटील, निवास रसाळ, ग्रंथपाल संजय भायदे, ज्येष्ठ गायक रवींद्र …
Read More »मानवाधिकार संघटनेकडून पालिका सफाई कामगारांना फराळ वाटप
मुरुड जंजिरा ः वार्ताहर मुरुड नगर पारिषदेतील सफाई कर्मचार्यांना दिवाळीनिमित्त मानवाधिकार संघटनेकडून दिवाळी फराळ व त्यांच्या मुलांसाठी वही, पेन अशा शालोपयोगी वस्तूंचे वाटप नगरपरिषद आवारात रविवारी (दि.27)करण्यात आले. मुरुड शहराची स्वछता अबाधित राखण्याचे काम सफाई कर्मचारी करीत असतात. अत्यंत तुटपुंज्या पगारात शहराची स्वछता राखण्याचे ते काम करीत असल्याने यंदा सफाई …
Read More »नागोठण्यात अभिनंदनाचा फलक फाडला
नागोठणे : प्रतिनिधी भाजपचे नवनिर्वाचित आमदार रविशेठ पाटील यांचे अभिनंदन करणारा बॅनर शनिवारी (दि. 26) रात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने फाडला असल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. आमदार रविशेठ पाटील यांचे खंदे समर्थक व येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच फरमान दफेदार यांनी उर्दू हायस्कूलनजिक रविशेठ यांचे अभिनंदन करणारा हा बॅनर लावला होता …
Read More »कर्जतचा गड जिंकल्याचा अभिमान -उद्धव ठाकरे
आ. महेंद्र थोरवे यांनी घेतली ‘मातोश्री’वर भेट कर्जत ः बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा सिद्ध झाले असून शिवसैनिकांचा विश्वास संपादन करून विजय मिळविला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे कौतुक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. कर्जत विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी झालेले आमदार …
Read More »मुलांना आनंदाचा बूस्टर डोस
साने गुरुजी स्मारकात अभिव्यक्ती शिबिर पाली ः प्रतिनिधी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर येथे 10 ते 13 वयोगटातील मुलांसाठी दिवाळीच्या सुटीत 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर कालावधीत अभिव्यक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वयातील मुलांनाही आता ताण, निराशा, स्पर्धा या सगळ्यातून जावे लागते. शाळेतील पूरक उपक्रम यासाठी उपयोगी पडतातही. …
Read More »माथेरानकरांना परवडेना रुग्णवाहिकेचे भाडे
कर्जत ः बातमीदार माथेरान नगरपरिकडेे एक महिन्यापूर्वी रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांच्या जीवावर बेतण्यासारखे अनेक प्रकार घडल्याने रुग्णवाहिकेमुळे नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न केल्याने मावळच्या खासदारांनी माथेरानकरांना आपल्या खासदार निधीतून नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. मात्र येथील नगरपरिषदेने सर्वसामान्य रुग्णांकडून अवाजवी दर आकारण्यास सुरुवात केल्याने रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या खिशाला चाट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper