Breaking News

महत्वाच्या बातम्या

प्राचार्या डॉ. सीमा कांबळे ग्लोबल टिचर अवॉर्डने सन्मानित

पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधील बापूसाहेब डी. डी. विसपुते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांना दिल्ली येथे तुर्कीच्या राजदूतांच्या हस्ते ग्लोबल टिचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार 70 देशांतील आदर्श शिक्षकांना देण्यात आला आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून महाविद्यालयात …

Read More »

बेलवलीतील विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत बेलवली येथे स्थानिक आमदार विकास निधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ पाटील यांच्या हस्ते आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांच्या प्रमुख …

Read More »

दोन मुलांच्या अहरणाचा प्रयत्न

मुरूड शहरात घबराटीचे वातावरण मुरूड : प्रतिनिधी शाळेत चाललेल्या दोन मुलांचे अपहरण करून त्यांना मारुती व्हॅनमधून पळवून नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी सकाळी तृतीयपंथींनी  केला. मात्र या मुलांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तो विफल ठरला असला तरी या घटनेने मुरूडमधील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून शहरातील नागरिकांना अधिक सुरक्षा प्रदान …

Read More »

नवी मुंबईत अनधिकृत कॉल सेंटर पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

पनवेल ः वार्ताहर सानपाडा, नवी मुंबई येथे एका इमारतीमध्ये अनधिकृत इंटरनॅशनल कॉल सेंटर चालत असल्याबाबत मध्यवर्ती कक्ष, गन्हे शाखेस गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त, पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, गुन्हे शाखा, सहा. पोलीस आयुक्त अजय कदम गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. …

Read More »

‘स्वच्छता अभियानाने देशाचे नाव उंचावले’

कर्जत : बातमीदार स्वच्छता अभियान राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाले असून या अभियानाने देशाचे नाव जगात पोहचविले आहे, त्यामुळे आपण कायमस्वरूपी स्वच्छतेवर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी येथे केले. मध्यरेल्वे प्रशासनाने 16 ते 30 सप्टेंबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचे जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने …

Read More »

प्रगल्भ व समर्थ नेतृत्व

एकाहून अधिकपक्षांचे बनलेले कडबोळे निश्चित ध्येयधोरणाने काम करणारे स्थिर सरकार देऊ शकत नाही हे आता सर्वसामान्यांनाही कळू लागले आहे. पूर्ण बहुमतातील सरकार कसे वेगाने आणि खंबीरपणे काम करू शकते त्याचा अनुभवही आपण सध्या केंद्रात घेतो आहोत. हे सारे अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्रातील प्रगतीशील जनतेने राज्यात स्थिर सरकार द्यावे हे मोदींचे …

Read More »

ऋषभ पंतसाठी धोक्याची घंटा!

निवड समिती पर्यायांच्या शोधात मुंबई : प्रतिनिधी यष्टीरक्षक ऋषभ पंतचा फलंदाजीतील ढासळलेला फॉर्म हा गेल्या काही दिवसांमधला भारतीय संघासाठीचा चिंतेचा विषय ठरला आहे. विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी पंतला पसंती देणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर विंडीज दौर्‍यात पंतला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली, …

Read More »

कुस्तीत सुरेखा वाघमारे सरस

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या कर्जत तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत तिघर शाळेतील सुरेखा शंकर वाघमारे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. रायगड जि. प. शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. यात विविध खेळांचा समावेश असतो. यंदा कर्जत तालुकास्तरीय …

Read More »

धोनीचा क्रिकेटमधील टाइम संपलाय : गावसकर

मुंबई : प्रतिनिधी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा जोरावर असतानाच माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धोनीचा टाइम आता संपलाय. टीम इंडियाने आता त्याच्या पलीकडे पाहायला हवे,’ असे गावसकर यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावसकर यांनी हे वक्तव्य केले. ‘धोनीच्या मनात …

Read More »

गणेश मोन्नाक यांची अध्यक्षपदी निवड

मुरूड : राजपुरी ग्रुप ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा सरपंच हिरकणी गिदी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. या सभेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी समाजसेवक गणेश मोन्नाक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गणेश मोन्नाक 2008 ते 2017 पर्यंत तंटामुक्ती समितीचे सदस्य, तर 2018 पासून उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी सागर रक्षक …

Read More »