Breaking News

महत्वाच्या बातम्या

अंगणवाडीचे वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीमधील एकता अपार्टमेंट ओनर्स असो. येथे गेली 10 वर्षे अंगणवाडी सुरू आहे. त्या ठिकाणी गेल्या 9 महिन्यांपासून विद्युत पुरवठा नसल्याने तेथील अंगणवाडी सेविका व छोट्या मुलांना गैरसोयीचा सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भातील माहिती स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम व शुभांगी निर्मळे यांना मिळताच त्यांनी याबाबत …

Read More »

शिवशाही रस्त्यातच पडली बंद; प्रवाशांचे पैसेही गेले आणि हालही झाले

पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाळा खिंडीत प्रवाशांना घेऊन जाणारी पनवेल-महाड शिवशाही बस बुधवारी (दि. 18) अचानक बंद पडली. कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. प्रवाशांनी गच्च भरलेली वातानुकूलित शिवशाही (एम 3802) बस बुधवारी पनवेल आगारातून सुटली खरी, मात्र ती कर्नाळा खिंडीत अचानक बंद पडली, सुरुवातीला …

Read More »

पनवेल महानगरपालिकेच्या ताफ्यात नव्या गाड्या

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत बुधवारी (दि. 18) नव्या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूजन करून या नवीन गाड्यांचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव …

Read More »

आयुष्यमान योजनेंतर्गत गोल्डन कार्डचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तक्का विभागातील भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 20च्या वतीने ‘आयुष्यमान भारत योजने’अंतर्गत गोल्डन कार्ड वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. 19) करण्यात आले होते. यानिमित्त तक्का विभागातील महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मध्ये भाजपच्या वतीने आयुष्यमान भारत योजने अंतर्गत नागरिकांना गोल्डन …

Read More »

गुजराती शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी विकासकामांचा धडाका पाहायला मिळत आहे. त्याअंतर्गत बापट वाडा येथील सिल्व्हर आपार्टमेंटच्या शेजारील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या आणि गुजराती शाळेच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ सभागृह नेते परेश ठाकूर आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 18) करण्यात आला. पनवेल येथील बापट पाडा येथील सिल्व्हर आपार्टमेंट …

Read More »

मानघर ते आवळीचा मळा रस्त्याचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांतून विविध ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्या अंतर्गत मानघर ते आवळीचा मळा या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. 19) या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात …

Read More »

प्रो कबड्डी : ‘यू मुम्बा’ने ‘यूपी’ला रोखले

पुणे : प्रतिनिधी अभिषेक सिंग आणि अर्जुन देशवालच्या आक्रमक चढायांना सुरिंदरसिंग आणि फझल अत्राचलीच्या पकडींची साथ मिळाल्याने यू मुम्बा संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धा संघावर 39-36 अशी मात केली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. पूर्वार्धात यूपी योद्धाच्या रिशांक देवाडिगा, श्रीकांत जाधव, सुरेंदर गिल यांनी आपला करिष्मा दाखवायला …

Read More »

सायना नेहवाल पराभूत; सिंधूची विजयी सलामी

चँगझ्होयू (चीन) : वृत्तसंस्था भारताच्या सायना नेहवालला चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला, तर वर्ल्ड चॅम्पियन पी. व्ही. सिंधूने अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली. महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफनने सायना नेहवालला 21-10, 21-17 असे सहज नमवले. सिंधूने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या चीनच्या ली शूरुईवर …

Read More »

विराट कोहली दुसर्या स्थानावर; आफ्रिदीनेही केले कौतुक

मोहाली ः वृत्तसंस्था भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्‍या टी-20 सामन्यात 7 गडी राखून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार विराट कोहलीने नाबाद 72 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेले 150 धावांचे लक्ष्य कोहलीने शिखर धवन आणि त्यानंतर श्रेयस अय्यरच्या साथीने पूर्ण केले. …

Read More »

दोन पदके निश्चित;अमित, मनीष उपांत्य फेरीत

ईकॅटरिनबर्ग (रशिया) ः वृत्तसंस्था अमित पांघल (52 किलो) आणि मनीष कौशिक (63 किलो) यांनी बुधवारी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून पुरुषांच्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेतील दोन पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अमितने फिलिपिनो कार्लो पालमचा 4-1 असा पराभव केला, तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील …

Read More »