Breaking News

महत्वाच्या बातम्या

खांदा कॉलनीत रंगली अभंगवाणी ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळ व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या माध्यमातून आयाजित ‘सकाळ प्रिमीयर नाते तुमचे आमचे’ हा कार्यक्रम खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉलमध्ये गुरुवारी (दि. 22) झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात अभंग वाणी, महिलांसाठी खेळ पैठणीचा …

Read More »

रोडपाली स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनंतर त्वरित कार्यवाही

पनवेल ः रामप्रहर वृत्त रोडपाली येथील स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढल्याने जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी (दि. 23) सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी पाहणी केली.  त्या अनुषंगाने महापालिकेचे आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांना हा परिसर स्वच्छ करण्याचे सूचित केले. त्यानंतर काही तासातच महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवून …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे ज्युडोमध्ये सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका अंतर्गत पनवेल येथे तालुका क्रीडा संकुलात नुकतीच ज्युडो स्पर्धा झाली. या स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले. 14 वर्षांखालील मुलांच्या गटात आर्यन पन्हाळे (इयत्ता सहावी) याने प्रथम क्रमांक, मुलींमध्ये जान्हवी पवार …

Read More »

कबड्डी स्पर्धेत वावळोली, चिवे संघांची चमक

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत वावळोली व चिवे येथील आदिवासी आश्रमशाळांच्या संघांनी दिमाखदार कामगिरी केली. नांदगाव येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत वावळोली शाळेच्या मुलांनी 19 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक, 17 वर्षे गटात मुलींनी प्रथम क्रमांक आणि मुलांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विजयी …

Read More »

बंगालकडून पटणाची शिकार

चेन्नई : वृत्तसंस्था सांघिक खेळाचे शानदार प्रदर्शन केलेल्या बंगाल वॉरियर्सने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पटणा पायरेट्सचा 35-26 असा पराभव करून प्रो कबड्डी लीगमध्ये विजयी आगेकूच केली. या दमदार विजयासह बंगालने गुणतालिकेत 33 गुणांसह दुसर्‍या स्थानी झेप घेतली असून, पटणा संघ 17 गुणांसह तळाला आहे. पटणाने नऊ सामन्यांतून सहा पराभव पत्करले आहेत. …

Read More »

आगरदांडा, खोरा बंदरामुळे पर्यटनाला गती

भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात व केंद्रात विराजमान झाल्यापासून मुरूड तालुक्यातील तीन महत्त्वाच्या बंदरांना कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांना मोठी सुविधा मिळाली आहे. केंद्र शासनाच्या सेतू व वाडी जोड प्रकल्पांतर्गत मुरूड तालुक्यातील तीन बंदरांना मोठा निधी मिळाला व या भागाचा विकास होण्यास मोठी मदत झाली. भारतीय …

Read More »

जल्लोश हवा, उन्माद नको

मुंबापुरीतील मराठी संस्कृतीचा दहीहंडी हा गणेशोत्सवाइतकाच ठळक घटक आहे. परंतु गेली काही वर्षे मात्र ट्रकमधून घोळक्याने जाणारे गोविंदा कालबाह्य व केविलवाणे दिसू लागले आहेत. इतर मंडळी आपापले कामाधंद्याचे दिनक्रम पार पाडण्यात मश्गुल असताना यांनी मात्र जिवाची जोखीम पत्करून दहीहंड्या फोडत शहरभर भटकायचे. उसने अवसान आणण्यासाठी प्रसंगी दारूचाही आधार घ्यायचा. या …

Read More »

पनवेल ः चांगू काना ठाकूर विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जयंतीनिमित्त दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.

Read More »

आरोग्य संमेलनात श्री धूतपापेश्वर यांचे आरोग्य शिबिर

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे दि. 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’ हे भारतातील पहिल्या आयुष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद औषध उत्पादनात अग्रगण्य असलेली ‘श्री धूतपापेश्वर लिमिटेड’ या कंपनीने संमेलनाला भेट देणार्‍या सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. …

Read More »

मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात फुटली ‘चॉकलेट’हंडी

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, उलवे नोड, पूर्व प्राथमिक शाखेत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त चॉकलेट हंडी फोडण्यात आली. चिमुरड्या राधा-कृष्णने नृत्य सादर केले ’कृष्णा’ अ‍ॅनिमेटेड चित्रपटातील दहीहंडी दृश्य पाहताना विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. या प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन, सेकंडरी पर्यवेक्षक भरत जितेकर यांची …

Read More »