Breaking News

महत्वाच्या बातम्या

गव्हाण येथे रक्षाबंधन पर्व उत्साहात साजरे

गव्हाण : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजपतर्फे रक्षाबंधन पर्व मोठ्या उत्साहात सुरू असून, त्याअंतर्गत गव्हाण पंचायत समिती मतदारसंघातही बुधवारी (दि. 7) या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित महिलांनी मुख्यमंत्र्यासाठी एक राखी आणि मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी पर्वाबद्दल सर्वांना माहिती दिली. केंद्र आणि …

Read More »

तमिळ थलायव्हाजने यूपी योद्धाला बरोबरीत रोखले

पाटणा : वृत्तसंस्था पाटण्याच्या पाटलीपुत्र बंदिस्त स्टेडियममध्ये बुधवारी (दि. 7) झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सामन्यात अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या तमिळ थलायव्हाजने दडपणाच्या परिस्थितीत कामगिरी उंचावून यूपी योद्धाला 28-28 असे बरोबरीत रोखले. दुसर्‍या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने पाटणा पायरेट्सचा 35-26 असा पराभव केला. रिशांक देवाडिगाच्या (5 गुण) दमदार चढायांच्या बळावर यूपीने …

Read More »

कोहली, रोहितने चाहत्याचा दिवस बनवला ’स्पेशल’

गयाना : वृत्तसंस्था  वेस्ट इंडिजविरोधातील ट्वेंटी-20 मालिकेत टीम इंडियाने निर्भेळ यश मिळवले. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजवर सात विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिका 3-0 अशी खिशात घातली. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका अंध …

Read More »

कर्नाटकमधून भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव उतरले

नवी मुंबई : प्रतिनिधी महापुरामुळे बाहेर गावावरून होणारी भाजीपाल्याची आवक थंडावल्यामुळे नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजरापेठेत गेल्या दोन दिवसापासून भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले होते.परंतु गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाल्याने बाहेर गावावरून भाजीपाला आल्याने गुरुवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार पेठेत भाज्यांचे भाव 20 ते 30 टक्क्यांनी कमी …

Read More »

पुरामुळे अडकलेल्या ट्रकचालकांची दैना ; पाण्यासोबत भात लागतोय खायला

सातारा : प्रतिनिधी सांगली, कोल्हापूर, सातार्‍यात पुराची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. नागरिकांसोबत या मार्गावर अडकलेल्या ट्रकचालक आणि क्लिनर लोकांचीदेखील आबाळ सुरू आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावरील कराडच्या पुढची वाहतूक पूर्णतः थांबल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा दिसतात. सातार्‍यातील शिरवळ या ठिकाणी जवळपास तीन हजार ट्रक रस्त्याच्या कडेला उभे केले …

Read More »

उलवा विद्यालयाची वर्षासहल

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवा विद्यालयाची शैक्षणिक वर्षासहल नुकतीच लांगेश्वर, मोरावे येथे झाली. सहशालेय उपक्रमांतर्गत या वर्षासहलीचे आयोजन सहलप्रमुख बी. आर. चौधरी यांनी मुख्याध्यापक एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले. गुरुकुल प्रकल्प प्रमुख व्ही. जी. पाटील यांनी सर्व नियोजन केले. या वेळी विद्यालयाचे चेअरमन …

Read More »

मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक 11 ऑगस्टपर्यंत बंद

पुणे : प्रतिनिधी घाटक्षेत्रात मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर कोसळलेली दरड काढण्यास आणखी तीन-चार दिवस लागणार असल्याने पुणे-मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारपर्यंत (दि. 11)  बंद ठेवण्यात येणार आहे. कोल्हापूरला जाणार्‍या महालक्ष्मी व सह्याद्री एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मुसळधार पावसामुळे शनिवारी (दि. 3) रात्री मंकी …

Read More »

कलम 370 : तत्काळ सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (दि. 8) नकार दिला. या याचिकेवर योग्य वेळी सुनावणी होईल, असे न्या. एन. व्ही. रमना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले. वकील मनोहरलाल शर्मा यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात …

Read More »

लालूपुत्र ड्रग्जच्या आहारी? ऐश्वर्याचा आरोप

पटना : वृत्तसंस्था बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांना ड्रग्जचे व्यसन असल्याचे त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी  म्हटले आहे. तेजप्रताप यादव यांच्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी ऐश्वर्या राय यांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात तेजप्रताप यादव गांजा ओढत असल्याचे तसेच नशेत घागरा आणि चोळी परिधान करत राधा बनून डान्स करतात, …

Read More »

‘स्पिडी’मधील स्थानिक कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही’

उरण : वार्ताहर स्पिडी मल्टीमोडल प्रा.लि. या मालाची हाताळणी करणार्‍या प्रकल्पातील स्पिडी इंडस्ट्रियल सर्व्हिस प्रा.लि. हा खाजगी ठेकेदार सोडून गेल्याने या ठेकेदाराच्या माध्यमातून प्रकल्पात सफाई कामगार म्हणून काम करणार्‍या 47 कामगारांवर पुढे अन्याय होऊ नये आणि ते काम करीत असणारी नोकरी अबाधित राखण्यासाठी स्पिडी व्यवस्थापनाने स्थानिक ठेकेदाराची नियुक्ती करीत सदर …

Read More »