Breaking News

महत्वाच्या बातम्या

मुरूडमधील ‘ते’ बांधकाम होणार जमीनदोस्त

भाजपच्या प्रयत्नाला यश; बेमुदत उपोषणाची सांगता मुरुड : प्रतिनिधी – शहरातील शेंगवाडा येथील नाल्यावरील बांधकाम तोडावे, या मागणीसाठी त्या परिसरातील नागरिकांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र प्रशासकीय अडचणीमुळे नगर परिषदेला नाल्यावरील बांधकाम तोडता येत नव्हते. भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करुन  जिल्हाधिकारी यांची …

Read More »

भाजप सदस्य नोंदणीसाठी अॅड. मनोज भुजबळ यांच्या कार्यालयातून सुरूवात

पनवेल ः प्रभाग 17मधील भाजप सदस्य नोंदणीसाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या कार्यालयातून सुरूवात केली, त्यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सदस्य नोंदणीसाठी 8980808080 या नंबरवर मीस कॉल देऊन भाजप परिवारामध्ये सदस्य नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

Read More »

शाकीबने मोडला सचिनचा विक्रम

लंडन : वृत्तसंस्था बांगलादेशचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनने अखेरच्या साखळी सामन्यातही आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखला. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्धशतक झळकावताना शाकीबने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा 50पेक्षा अधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत शाकीबने सचिनला मागे टाकले आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत …

Read More »

राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत शनिवारी (दि. 6) साजरा झाला. वाढसिवसानिमित्त अजिवली येथील जनता माध्यमिक व उपमाध्यमिक विद्यालयात नवीन वर्ग खोलीचे भूमीपूजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या वेळी …

Read More »

सुधागड पं. स.चा पुढचा सभापती भाजपचाच!

पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार; पक्ष सदस्य नोंदणीला तालुक्यात जोरदार प्रारंभ पाली : प्रतिनिधी  – सुधागड तालुक्यात भाजप मजबूत करण्याच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. शनिवारी (दि. 6) पालीतील भाजप संपर्क कार्यालयात सदस्य नोंदणी अभियान प्रभाविपणे राबविण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली.  तालुक्यातील शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख व पदाधिकार्‍यांनी अधिकाधिक सदस्य …

Read More »

शोएब मलिकची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश संघाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळविल्यानंतर पाकिस्तान संघातील खेळाडू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मी हा निर्णय घेण्याचे वर्षापूर्वीच ठरवले होते, असे मलिकने पत्रकार परिषदेत सांगितले. शोएबने ट्विटरवरूनही याबद्दल माहिती दिली. ‘आज मी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. त्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, …

Read More »

कुंडेवहाळ पूरग्रस्तांना प्रशांत ठाकूर यांचा दिलासा

महेश बालदी व ग्रामपंचायतीकडूनही सहकार्य पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बंबावी कोळीवाडा येथे मुसळधार पावसामुळे शनिवार (दि. 29)पासून पाच दिवस पाणी शिरले होते. सरपंच सदाशिव रामदास वास्कर व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केले. सरपंच सदाशिव वास्कर यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी …

Read More »

मुर्बीतील कार्यकर्ते भाजपत

शेकापनेते गुरुनाथ ठाकूर समर्थकांचा प्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्‍यांचा ओघ सातत्याने सुरु आहे. त्याअंतर्गत मुर्बी येथील शेकापचे युवा नेते गुरुनाथ ठाकूर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये शनिवारी (दि. 6) जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या …

Read More »

अँजेलोची शतकी खेळी

थिरिमनेसोबत श्रीलंकेचा डाव सावरला लंडन : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने 50 षटकांत 7 बाद 264 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली होती, पण अनुभवी अँजेलो मॅथ्यूजचे शतक (113) आणि थिरिमनेचे अर्धशतक (53) याच्या जोरावर श्रीलंकेने अडीचशे धावांचा टप्पा गाठला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा पर्याय स्वीकारला, मात्र …

Read More »

शिवसेना शाखाप्रमुखपदी विलास पाटील

पनवेल ः शिवसेना पक्षप्ररमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते उद्योगमंत्री, संपर्कनेते कोकण विभागाचे सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या उपस्थितीत रायगड (पनवेल) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या सहमतीने व पनवेल तालुका उपमहानगरप्रमुख दीपक घरत तसेच खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर …

Read More »