Breaking News

महत्वाच्या बातम्या

पुस्तकातून समाधीकडे…

अलीकडे योग, ध्यान (मेडीटेशन, समाधी हो..!) वैगेरे शब्दांची चलती आहे आणि साहजिकच आहे, आणि ज्याची चालती असते त्याच व्यापारीकरण होतेच. त्यामुळे ध्यान, योगचे (‘योग’साठी आपण ‘योगा’ हा तद्दन चुकीचा शब्द वापरतो. चुकीच इंग्रजी आत्मविश्वासाने शिकवल्याचा आणि शिकल्याचा हा परिणाम. ‘राम’सारख्या देवाचा ‘रामा’गडी या मुळेच झाला. असो, हा विषय वेगळा..!!) काही …

Read More »

मनसेचा फटका कुणाला..?

चार दिवसांपूर्वी संपलेल्या लोकसभा निवडणूकीचे निकाल समोर आल्यावर नुसती राजकीय पक्षांचीच झोप उडालेली नाही, तर आपल्याला राजकीय पंडित समजून वावरणार्‍या अनेकांची भंबेरी उडाली आहे. कारण राज्यात पुन्हा तितक्याच ताकदीने भाजपा शिवसेना युती जिंकण्याची अपेक्षा कोणी केलेली नव्हती. त्याहीपेक्षा नुसत्या देखाव्याला भुलून राजकीय आकलन व विश्लेषण करणार्‍यांना; या निकालांनी तोंडघशी पाडलेले …

Read More »

संसदेतील पक्षनिहाय संख्याबळ

Read More »

आमदार जयंत पाटील यांच्या निषेधार्थ रायगडातील पत्रकारांचा उद्या मोर्चा

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग येथील ‘लोकसत्ता’चे पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकापचे आमदार जयंत पाटील आणि आमदार पंडित पाटील यांनी लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांकडून सोमवारी (दि. 27) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी 10.30 …

Read More »

आईचे आशीर्वाद घेण्यासाठी मोदी आज गुजरातमध्ये

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत 303 जागा मिळवत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळवले, तर एनडीएला 350पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. या अभूतपूर्व विजयानंतर आईचे आशीर्वाद घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातमध्ये जाणार आहेत. गुजरातमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आईची भेट घेतील. आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर परवा …

Read More »

काँग्रेसचा दारूण पराभव होऊनही राहुल गांधींचा राजीनामा फेटाळला

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक शनिवारी (दि. 25) सकाळी पार पडली. या बैठकीस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित होते. बैठकीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला, मात्र समितीमधील नेत्यांनी …

Read More »

पॅरासेलिंग करताना पडून मुलाचा मृत्यू, एक गंभीर; मेरीटाइम बोर्डाचे दुर्लक्ष

मुरूड ः प्रतिनिधी पुण्यातील कसबा पेठ येथील सात जणांचा समूह मुरूड समुद्रकिनारी फिरण्यासाठी आला असता एका दुर्दैवी अपघातात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पर्यटक गणेश पवार (40) आणि त्यांचा मुलगा वेदांत पवार (15) पॅरासेलिंग करताना आकाशात उडाले. या वेळी पॅराशूट आकाशात उडताच अगदी काही मिनिटांतच …

Read More »

संसदेत स्त्रीशक्तीचा बोलबाला ; इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल समस्त भारतीयांनी नुकताच अनुभवला. भाजपला मिळालेल्या संपूर्ण बहुमतामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र लोकसभा निवडणुकीचा हा निकाल महिलांसाठीही विक्रमी ठरला आहे. कारण इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार निवडून आल्या आहेत. फक्त भाजपच नाही, तर सगळ्याच पक्षांच्या …

Read More »

एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी ; 30 मे रोजी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर सरकार स्थापनेसाठी दिल्लीतील संसद भवनात  काल बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते एनडीएच्या नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तसेच 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला समर्थन दिले. मोदींनी आज रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद …

Read More »

कर्नाळा अभयारण्यात पक्षी-प्राणी गणना

पनवेल : वार्ताहर कर्नाळा अभयारण्यातील पक्षी, प्राण्यांची गणना करण्यात आली. या गणनेत 37 प्रजातीचे प्राणी आणि पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या गणनेत 41 प्रकारच्या प्रजातींची नोंद झाली होती.  पक्षी गणनेसाठी लावण्यात आलेल्या कॅमेर्‍यात बिबट्याचे दर्शन घडले नसले, तरी या अभयारण्यात नियमित वावर असल्याचा दावा कर्नाळा अभयारण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी …

Read More »