सुरत ः वृत्तसंस्था येथील सरथाना भागातील तक्षशिला कॉम्प्लेक्स इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 19 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या इमारतीत एक डान्स क्लास आणि फॅशन इन्स्टिट्यूट आहे. …
Read More »खोपोलीत युतीच्या गोटात जल्लोष, तर आघाडीच्या कार्यकर्त्यांत सन्नाटा
खोपोली : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदार संघाचा निवडणुक निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. यात महायुतीच्या श्रीरंग बारणे यांच्या दणदणीत विजयाने शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांकडून गुरुवारी संध्याकाळपासून सुरू असलेला विजयोत्सव दुसर्या दिवशी शुक्रवारी ही साजरा करण्यात आला. दुसरीकडे पार्थ पवार यांच्या पराभवाने आघाडीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे खोपोलीत आघाडीच्या गोटात सन्नाटा तर …
Read More »सचिन तेंडुलकरला गोलंदाजांची चिंता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘वनडे क्रिकेटमध्ये तुम्ही अखेरचा रिव्हर्स स्विंग केव्हा पाहिला होता? दोन नव्या चेंडूंचा नियम आल्याने चेंडू अगदी अखेरपर्यंत टणक राहतो. गोलंदाजांची जणू कत्तलच होते आहे अन् क्रिकेट फलंदाजांचा एकसूरी खेळ झाला आहे. त्यामुळे रिव्हर्स स्विंग हा गोलंदाजीचा प्रकारच संपत चालला आहे…’ अशी हळहळ कुणा गोलंदाजाने नव्हे, तर …
Read More »निरा आणि ताडगोळे ठरताहेत वरदान; थकवा दूर करण्यासाठी नैसर्गिक उपाय
पाली : धम्मशील सावंत राज्यात सध्या उष्म्याची लाट आहे. रायगड जिल्ह्यातही उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेकजण आरोग्यवर्धक निरा आणि ताडगोळ्यांना पसंती देत आहेत. परिणामी निरा आणि ताडगोळ्यांची मागणी वाढली आहे. मुबंई – गोवा महामार्ग, पनवेल – खोपोली तसेच मुंबई -अलिबाग या मार्गांवर निरा विक्रेत्यांच्या …
Read More »भारतीय संघाने घेतली माजी कर्णधाराची भेट
लंडन : वृत्तसंस्था भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 साली इंग्लंडमध्येच वर्ल्ड कप जिंकला होता. आता पुन्हा एकदा इंग्लंडमध्येच क्रिकेटचा वर्ल्ड कप भरवला जात आहे. त्यामुळे मिशन वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने देशाला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणार्या कपिल देव यांची खास भेट घेतली. भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो, …
Read More »सर्पमित्राकडून साडेचार फु टी नागिणीची सुखरूप सुटका
मुरुड : प्रतिनिधी खैरा चणेरे भागात राहणारे सादिक खोत यांच्या घराच्या जोत्यामध्ये एका साडेचार फूट लांबीच्या नागिणीने वास्तव्य आढळून आले होते. काही दिवसांपुर्वी त्यांच्या घरातील व्यक्तींना या नागिणीचे दर्शन झाले होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य भीतीच्या छायेखाली वावरत होते. सादिक यांचे जवळचे नातेवाईक तुफेल दामाद यांनी मुरुडचे सर्पमित्र संदीप घरत यांना …
Read More »मुरूडच्या वैकुंठ स्मशानभूमीत लाखो रुपये खर्चून विविध सोयीसुविधा
मुरुड : प्रतिनिधी सुवर्णजयंती जिल्हा नागरिधान योजनेतून 42 लाख खर्च करून मुरुडमधील वैकुंठ स्मशानभूमीत सोयी सुविधा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली निसर्गरम्य परिसरात वैकुंठ स्मशानभूमी आहे. मात्र गेल्या अनेक वर्षात या स्मशानभूमीचा विकास झाला नव्हता. नगर परिषदेने सुवर्णजयंती जिल्हा नागरिधान योजनेतून 42 लाख खर्चून स्मशानभूमीत पिंडदान शेड, …
Read More »यंदाचा वर्ल्ड कप राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये
लंडन : वृत्तसंस्था 50 ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतीय टीम वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला पोहोचली आहे. 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. 44 वर्षात दुसर्यांदाच हा वर्ल्ड कप राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. राऊंड रॉबिन फॉरमॅटमुळे या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या 10 …
Read More »खोपोलीत युतीच्या गोटात जल्लोष, तर आघाडीच्या कार्यकर्त्यांत सन्नाटा
खोपोली : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदार संघाचा निवडणुक निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. यात महायुतीच्या श्रीरंग बारणे यांच्या दणदणीत विजयाने शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांकडून गुरुवारी संध्याकाळपासून सुरू असलेला विजयोत्सव दुसर्या दिवशी शुक्रवारी ही साजरा करण्यात आला. दुसरीकडे पार्थ पवार यांच्या पराभवाने आघाडीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे खोपोलीत आघाडीच्या गोटात सन्नाटा तर …
Read More »विराटला गांगुलीचे रेकॉर्ड मोडण्याची संधी
मुंबई : प्रतिनिधी 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. सौरव गांगुलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये तीन वर्ल्ड कप (1999, 2003, 2007) खेळले. यातल्या 2003 वर्ल्ड कपमध्ये तर गांगुली कर्णधार होता. या वर्ल्ड कपमध्ये भारत फायनलमध्ये पोहोचला, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper