पाटणा : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यानंतर देशवासीयांच्या मनात भडकलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान संजयकुमार सिन्हा आणि रतनकुमार ठाकूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते रविवारी (दि. 17) बिहारच्या बरौनी येथे बोलत होते. बिहारच्या बरौनी जिल्ह्यात विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र …
Read More »आय लव्ह पनवेल अक्षर मुद्रांचे अनावरण
पनवेल : प्रतिनिधी गावासाठी काही तरी करायचे आहे म्हणून असा मॉल करणे हे धाडसाचे असते असे पनवेल महापालिकचे आयुक्त गणेश देशमुख यांनी ओरॉयन मॉल पनवेल येथे आय लव्ह पनवेल या अक्षर मुद्रांचे अनावरण करताना शनिवारी (दि. 16) सांगितले. या कार्यक्रमास सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, …
Read More »फुटीरतावाद्यांना केंद्र सरकारचा दणका; सुरक्षा काढली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामामधील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना रसद पोहचविणार्या आणि आयएसआयशी कनेक्शन असलेल्या जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना केंद्र सरकारने जोरदार दणका दिला आहे. केंद्र सरकारने मीरवाइज उमर फारूखसह अब्दुल गनी बट्ट, हाशिम कुरैशी, बिलाल लोन आणि शब्बीर शाह या पाच फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. शिवाय त्यांना देण्यात येणार्या सरकारी …
Read More »दहशतवादी हल्ल्याचा निषेध, शहिदांना श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्त जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा पनवेल प्रभाग क्र. 17, शिवाजी नगर वसाहत येथे निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 39 जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे एकाच वेळी हळहळ आणि संताप …
Read More »चिंध्रणमध्ये विविध कामे प्रगतिपथावर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन पूल, गावातील अंतर्गत रस्ते आणि गटारांचे काम करण्यात येत आहे. हे काम सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने सुरू झाले असून, याबद्दल भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर आणि शिरवली विभागीय भाजप अध्यक्ष शिवाजी दुर्गे यांनी शासन …
Read More »जासईत शुभचिंतन; पारितोषिक वितरण
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकेनेते दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये शुभचिंतन सोहळा आणि वार्षिक पारितोषक वितरण समारंभाचे आयोजन शनिवारी (दि. 16) करण्यात आले होते. हा समारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी …
Read More »शहीद जवानांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्त जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर देशभरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. या हल्ल्यातील शहिदांना पनवेल शहरातील वडाळे तलावाजवळ शनिवारी (16 फेब्रुवारी) श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती …
Read More »किसान क्रेडिट कार्डचा लाभ घ्यावा’
अलिबाग : प्रतिनिधी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे. किसान क्रेडिट कार्ड या योजनेस पात्र शेतकर्यांनी आपल्या नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक अथवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था …
Read More »सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची
-अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ मुरूड : प्रतिनिधी समाजात शांतता राखण्यासाठी सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची आहे, मात्र सध्या सोशल मीडिया अफवा पसरवण्याचे माध्यम बनले आहे. दोन समाजांत तेढ निर्माण होईल अशी पोस्ट फॉरवर्ड करू नका. कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी प्रत्येक मोबाइलधारकाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा पोलीस …
Read More »विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो -सुनील गावसकर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 2019 साली इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना भारतीय फलंदाजीच्या तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावरच्या फलंदाजीचे कोडे सुटलेले नाही. काही खेळाडू सध्या या शर्यतीत आहेत. अशा वेळी विराट कोहली विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो, असे सूचक विधान प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले होते, ज्याला …
Read More »