Breaking News

महत्वाच्या बातम्या

तालुक्यातील 17 गावांचा म्हसळा पोलीस ठाण्यात समावेश करण्याची मागणी

म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील 82 पैकी 17 महसुली गावे दिघी सागरी, गोरेगाव व श्रीवर्धन या तीन पोलीस ठाण्याला जोडली आहेत. त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या ते अडचणीचे होत आहे. म्हसळा तालुक्यातील तुरूंबाडी, रोहीणी, आडी ठाकूर, गोंडधर, काळसुरी, खानलोशी ही 4164 लोकसंख्येची सहा गावे दिघी सागरी पोलीस ठाण्याला, आंबेत, तोराडी, लिपणी, वावे, महमद …

Read More »

पारदर्शकतेचा उत्सव

यंदाच्या निवडणुकीत भारतीय लोकशाही स्वतःचेच काही विक्रम मोडीत काढणार आहे. तब्बल 90 कोटी नोंदणीकृत मतदार या वेळी आपला मतदानाचा अधिकार बजावतील. ही आजवरची सर्वोच्च मतदारसंख्या आहे. इतकेच नव्हे, तर अमेरिका आणि युरोपातील जनसंख्येपेक्षाही हा आकडा मोठा आहे. यापैकी सुमारे साडेआठ कोटी मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. संपूर्ण देशाला ज्याची …

Read More »

सहा आसनी रिक्षाचालकांना न्याय देणार रविशेठ पाटील यांचे आश्वासन, थांब्याबाबत चर्चा

पेण : प्रतिनिधी आरटीओ अधिकारी तसेच पेण नगर परिषद अध्यक्षा व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून, मिनिडोअरसाठी एसटी स्टँडसमोर विक्रम अधिकृत थांबा दिला जाईल, अशी ग्वाही माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी विक्रम मिनिडोअर संघटनेच्या प्रतिनिधींना दिली. शहरांतून ग्रामीण भागात सेवा देणार्‍या विक्रम मिनीडोअरसाठी एसटी स्टॅडसमोर अधिकृत थांबा द्यावा, अशी मागणी …

Read More »

विराट कोहलीची डीआरएसवर पुन्हा नाराजी

मोहाली : वृत्तसंस्था मोहालीतील चौथ्या वनडेत अखेरच्या षटकांमध्ये तडाखेबंद फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणार्‍या अ‍ॅश्टन टर्नरविरोधातील डीआरएस (डिस्प्ले रिव्ह्यू सिस्टिम) अपीलनंतर दिलेल्या निर्णयावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डीआरएसच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येतो, असे त्याने म्हटले. भारताने 358 धावांचा डोंगर उभा केला, पण …

Read More »

ऑस्ट्रेलियाने रचला विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 गडी राखून विजय मिळवला. पीटर हँड्सकॉम्बचे शतक (117), ख्वाजाची संयमी खेळी (91) आणि टर्नरची तुफानी 84 धावांची खेळी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 359 धावांचे आव्हान 2 षटके राखून पार केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. त्याचबरोबर …

Read More »

पंतने संधी गमावली, कार्तिकला खेळवण्याची मागणी

मोहाली : वृत्तसंस्था अ‍ॅश्टन टर्नरची फटकेबाजी त्याचबरोबर पीटर हँड्सकॉम्ब आणि उस्मान ख्वाजा यांनी तिसर्‍या विकेटसाठी 192 धावांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथा वन डे सामना जिंकला. या सामन्यात यष्टिरक्षक रिषभ पंतचे गचाळ क्षेत्ररक्षण टीकेचे धनी ठरले. पंतने या सामन्यात सोप्या संधी गमावल्या. त्याच्या ढिसाळ कामगिरीमुळे दिनेश कार्तिकच्या समावेशाची मागणी जोर …

Read More »

प्रजनेशचा निकोलोजवर सनसनाटी विजय

इंडियन वेल्स : वृत्तसंस्था भारताच्या प्रजनेश गुणेश्वरने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तमविजय नोंदवताना इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानावर असलेल्या निकोलोज बासिलाशविलीचा पराभव केला. एकेरीच्या मुख्य फेरीत प्रथमच खेळत असलेल्या डावखुर्‍या प्रजनेशने 2 तास 32 मिनिटांत जॉर्जियाच्या खेळाडूचा 6-4, 6-7, 7-6ने पराभव केला. जागतिक क्रमवारीत 97व्या …

Read More »

स्मृतीची टी-20मध्ये तिसर्या स्थानी झेप

दुबई : वृत्तसंस्था भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला ट्वेन्टी-20 क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेत कारकिर्दीत सर्वोत्तम तिसरे स्थान पटकाविले आहे. हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व मानधनाने केले. तीन सामन्यांत तिने 72 धावा केल्या. तिसर्‍या सामन्यात अर्धशतकही ठोकले होते. दुखापतीमुळे मालिकेत खेळू …

Read More »

कविंदर सिंगचा सुवर्ण‘पंच’

हेलसिंकी : वृत्तसंस्था भारताचा कविंदर सिंग बिष्ट (56 किलो) याने सुवर्णपदकाची कमाई करीत फिनलॅँडच्या हेलसिंकीमध्ये सुरू असलेल्या 38व्या जीबी बॉक्सिंग स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकविला. तीन वेळचा आशियाई पदक विजेता थापा (60 किलो) याच्यासोबतच गोविंद साहनी (49 किलो), राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या मोहम्मद हसमुद्दीन (56 किलो) व दिनेश डागर (69 किलो) …

Read More »

राज्यात तापमानाचा पारा वाढला; यवतमाळात सर्वाधिक तापमान

पुणे ः प्रतिनिधी राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता वातावरणही तापू लागले आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़  राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान यवतमाळ येथे 39 अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे 14 अंश सेल्सिअस नोंदविले …

Read More »