उरण : रामप्रहर वृत्त : खोपटे बांधपाडा ग्रामपंचायत निवडणुकीत _ सरपंच पदासाठी भाजप तर्फे विशाखा प्रशांत ठाकूर यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम ..के .म्हात्रे यांच्या कडे दाखल करण्यात आला. सदस्य पदासाठी राजेंद्र आत्माराम म्हात्रे,शुभांगी अविनाश ठाकूर,अच्युत दत्तात्रेय ठाकूर,मेघा संदिप ठाकूर,नवनाथ नारायण ठाकूर,रंजिता अच्युत ठाकूर, लक्ष्मण घरत आदींनी उमेदवारी अर्ज …
Read More »संरक्षण दलातील रुग्णालयातील औषधांची खुल्या बाजारात विक्री
पनवेल : वार्ताहर : संरक्षण दलासह शासकीय रुग्णालयात मोफत वितरणासाठी असलेली औषधे बेकायदेशीररीत्या मिळवून, सदर औषधे खुल्या बाजारात विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नुकतेच तळोजा व सानपाडा येथील औषधांच्या पेढीवर टाकलेल्या छाप्यावरुन उघडकीस आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने देखील या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या …
Read More »ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव धोक्याची घंटा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था घरचे मैदान गाजवणार्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारताने न्यूझीलंडविरुद्धची वन डे मालिकाही जिंकली. आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाचा हा फॉर्म अतिशय चांगला असल्याने अनेकांनी भारताला विश्वचषक विजयासाठी प्रबळ दावेदार मानले होते, मात्र घरच्या मैदानावर विराट कोहलीच्या भारतीय संघाला …
Read More »कर्नाटकने जिंकला सय्यद मुश्ताक अली चषक
इंदूर : वृत्तसंस्था मयांक अगरवालची तुफानी फटकेबाजी आणि रोहन कदमच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर कर्नाटकने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राला आठ गडी व नऊ चेंडू राखून धूळ चारत विजेतेपदाला गवसणी घातली. या पराभवामुळे तब्बल नऊ वर्षांनंतर स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे महाराष्ट्राचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. नौशाद शेख (नाबाद 69) …
Read More »आला रे आला… युवराज आला!
मुंबई : प्रतिनिधी मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्यांदा इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे. तीन वेळा विजेतेपद पटकावणार्या मुंबईने 2018मध्ये समाधानकारक कामगिरी केली आणि 2019साठीच्या लिलावात त्यांनी अगदी अखेरच्या क्षणाला युवराज सिंग व लसिथ मलिंगाला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मलिंगाने यापूर्वीही मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले …
Read More »न्यूझीलंडमधील गोळीबारातून बांगलादेशचे खेळाडू बचावले
ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्था न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू थोडक्यात बचावले आहेत. सध्या बांगलादेशचे खेळाडू न्यूझीलंड दौर्यावर आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते जलाल युनिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडू बसमध्ये होते आणि मशिदीत जाण्याची तयारी करीत असतानाच गोळीबार झाला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळच्या …
Read More »फेडरर, नदाल उपांत्यपूर्व फेरीत
इंडियन वेल्स (अमेरिका) : वृत्तसंस्था रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दिग्गजांनी आपापल्या सामन्यात अपेक्षित विजय मिळवताना इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. यासह उपांत्य फेरीत हे दोन्ही दिग्गज एकमेकांविरुद्ध खेळण्याची शक्यता वाढली आहे. जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेल्या स्पेनच्या नदालने पुन्हा एकदा एकतर्फी झालेल्या लढतीत बाजी …
Read More »श्रीसंतला ‘सर्वोच्च’ दिलासा
न्यायालयाने आजीवन बंदी उठवली नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आरोप झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आजीवन क्रिकेटबंदी घातलेला भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज एस. श्रीसंत याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. श्रीसंतवरील आजीवन बंदी न्यायालयाने उठवली आहे. 2013 साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप श्रीसंतवर …
Read More »सीमावर्ती भागात महाराष्ट्र अन् कर्नाटक पोलिसांचे संयुक्त चेकपोस्ट ः सुहास वारके
सोलापूर ः प्रतिनिधी सध्या राज्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्थेसाठी प्रशासनाने महामार्ग, सीमावर्ती भागावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलीस प्रशासनाची एक बैठकही झाली आहे. सीमावर्ती भागातून होणारी गुन्हेगारी कारवाई रोखण्यासाठी दोन्ही राज्यांच्या पोलिसांचे संयुक्त चेकपोस्ट उभारण्यात येत असल्याची माहिती …
Read More »कोस्टगार्ड अधिकार्याच्या पत्नीची फसवणूक
मुंबई ः प्रतिनिधी सायबर ठकाने मिझोरमला गाडी पोहचविण्याच्या नावाखाली कोस्टगार्ड अधिकार्याच्या पत्नीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवई येथे राहणार्या तक्रारदार यांचे पती हे कोस्टगार्डमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पतीचा मित्र मिझोरम येथे राहतो. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper