Breaking News

महत्वाच्या बातम्या

काबूलमध्ये दहशतवादी हल्ला

काबूल ः वृत्तसंस्था : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. येथील पीडी 13मध्ये अब्दुल अली मजारी यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील पीडी 13 येथे अब्दुल अली मजारी यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे …

Read More »

20 लाखांपर्यंतची ग्रॅज्युटी करमुक्त

पेन्शनर्सला दिलासा मुंबई ः प्रतिनिधी : 20 लाखांपर्यंत मिळणार्‍या ग्रॅज्युटीवर आता कोणताही कर आकारला जाणार नसल्याची घोषणा करण्यात आली असून या निर्णयामुळे 2018-19मध्ये निवृत्त होणार्‍या नोकरदारवर्गाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाची माहिती दिली असून ग्रॅज्युटी कायद्यांतर्गत न येणार्‍या नोकरदारांना हा निर्णय …

Read More »

‘जैश’चे देशात अस्तित्वच नाही

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामागे ‘जैश ए मोहम्मद’ ही दहशतवादी संघटना होती. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तरही दिले. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच पाकिस्तान लष्कराने उलट्या बोंबा मारत ‘जैश ए मोहम्मद’ ही संघटना आमच्या देशात अस्तित्वातच …

Read More »

पेस्ट कंट्रोल करणं बेतलं जीवावर

दोन तरुणांचा मृत्यू पुणे ः प्रतिनिधी : पुण्यात पेस्ट कंट्रोल करणं दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. ढेकूण घालवण्यासाठी खोलीत पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. पेस्ट कंट्रोल करण्यात आलेल्या खोलीतच दोघे तरुण झोपले होते. सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृतदेह …

Read More »

सख्ख्या भावाने केला बलात्कार

नागपूर ः प्रतिनिधी : जीवे मारण्याची धमकी देऊन सख्ख्या भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये समोर आला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक व रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी नराधम भावाला ताब्यात घेतले आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित मुलगी आणि तिचा भाऊ राहतो. …

Read More »

फॉक्सवॅगन कंपनीला मोठा धक्का

राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावला 500 कोटींचा दंड नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : जर्मनची कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) कंपनीला 500 कोटींचा दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम येत्या दोन महिन्यांत भरण्याची ताकीद एनजीटीने फॉक्सवॅगनला दिली आहे. आपल्या कारमध्ये बेकायदारित्या चीप सेट लावल्याप्रकरणी एनजीटीने …

Read More »

उधाणग्रस्त शेतकर्यांना मिळणार आर्थिक मदत

मंत्री दिवाकर रावते यांच्या पाठपुराव्यास यश मुंबई ः प्रतिनिधी : समुद्राच्या उधाणामुळे शेतपिकाचे किंवा शेतजमिनीचे नुकसान झाल्यास आता शेतकर्‍यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. आतापर्यंत अशा नुकसानीसाठी शेतकर्‍यांना कोणतीही मदत मिळत नव्हती, पण राज्याचे खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी अशा प्रकरणी मदत देण्यासंदर्भात महिन्यापूर्वी केलेल्या मागणीला अनुसरुन मंत्रिमंडळ …

Read More »

महिलांना समान अधिकार मिळाले पाहिजेत -डॉ. पद्मश्री बैनाडे

अलिबाग : प्रतिनिधी महिला दुर्बल असल्यामुळे त्यांना आरक्षण दिले जाते. महिलांना आरक्षण नव्हे तर समान अधिकार मिळाले पाहिजेत.  ते मिळवण्यासाठी महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन  रायगडच्या निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी गुरुवारी (दि. 7) येथे केले. अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने दिल्या जाणार्‍या तेजस्विनी पुरस्कारांचे गुरुवारी वेश्वी येथील …

Read More »

पेट्रोलपंपावर काम करणारी एकमेव महिला मंजू बिलछाडी

खोपोली : प्रतिनिधी महिला काम करीत नाहीत, असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही. पेट्रोलपंपावर प्रामुख्याने पुरुष काम करताना आपण बघतो. मात्र आता या क्षेत्रातही महिला आता पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत. खालापूर तालुक्यात खोपोली-पेण रस्त्यावर सारसन या गावी असलेल्या ‘राम’ पेट्रोलपंपावर मंजू उमेश बिलछाडी (रा. शांतीनगर, खोपोली) या गेल्या 2 …

Read More »

डॉ. मोहन दोसी यांना ‘सेवाश्री’ पुरस्कार

माणगाव : प्रतिनिधी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल माणगाव येथील येथील डॉ. मोहन दोसी यांना सांगली येथील बिझनेस एक्सप्रेस व श्री फौंडेशनतर्फे बिझनेस एक्सप्रेस सेवाश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सांगली येथील विष्णू भावे नाटय मंदिरात 16 मार्चला होणार्‍या कार्यक्रमात डॉ. दोसी यांना हा पुरस्कार समारंभपुर्वक प्रदान करण्यात येणार …

Read More »