जेएनपीटी ः प्रतिनिधी सोनारी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप युतीच्या उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन सरपंचपदाच्या उमेदवार पूनम महेश कडू यांनी मतदारांना केले. त्या प्रचारसभेत बोलत होत्या. व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, ज्येष्ठ नेते कृष्णा कडू, कामगार नेते सुधीर …
Read More »टीम इंडियाची परदेश भरारी
ऑस्ट्रेलिया संघाला कसोटीत तब्बल 72 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर न्यूझीलंडमध्ये ‘किवीं’ना पराभूत करून टीम इंडियाने ‘10 इयर चॅलेंज’ही यशस्वीपणे पूर्ण केले. आता ‘विराटसेना’ पुन्हा एकदा ‘कांगारूं’शी मायदेशात भिडणार आहे. सध्याचा भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून, प्रत्येक खेळाडूला पर्याय उपलब्ध आहे. असे असूनही संघ कधी कधी मोक्याच्या वेळी …
Read More »रायगडच्या प्रणितची अवकाशभरारी
नासा’च्या मंगळ मोहीम संशोधनासाठी निवड पनवेल : बातमीदार सायंटिस्ट अस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट प्रणित पाटील या अलिबागच्या सुपुत्राची अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या अतिशय खडतर अशा मंगळ मोहिमेच्या संशोधनासाठी कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. मूळचे अलिबागचे असलेले पाटील कुटुंब सध्या पनवेलमध्ये वास्तव्यास आहे. प्रणितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमात झाले आहे. …
Read More »सुकापूरमध्ये रस्तेकामाचा शुभारंभ
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून पाली देवद-सुकापूर येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष …
Read More »पाकचे पाणी रोखण्याची तयारी सुरू
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सिंधू पाणीवाटप करारातील भारताच्या वाट्याचे पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी रोखणार असल्याचे जाहीर केल्यानंतर दुसर्याच दिवशी केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने त्यासाठीचा आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कसे पाणी रोखता येईल याची माहिती देण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात अत्यंत संतापाची लाट असून, पाकिस्तानला चांगलाच धडा …
Read More »अपघातामुळे बारावीचा विद्यार्थी परीक्षेस मुकला
ठाणे ः प्रतिनिधी एका टेम्पो ट्रॅव्हलर बसच्या धडकेमध्ये बारावी परीक्षेचा इंग्रजीचा पेपर द्यायला निघालेला रोहित चंदनशिवे (19) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 10 वा.च्या सुमारास तीनहात नाका येथे घडली. याप्रकरणी बसचालक संदीलकुमार पुजारी (36) याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी …
Read More »श्रीदेवीच्या साडीला सव्वा लाखाची बोली
मुंबई ः प्रतिनिधी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूला येत्या 24 फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होत असून यानिमित्ताने कपूर कुटुंबीयांनी श्रीदेवींच्या साडीचा ऑनलाईन लिलाव ठेवला आहे. हा लिलाव सुरू झाला असून आतापर्यंत या साडीला सव्वा लाखांपर्यंतची बोली लागली आहे. श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने 14 …
Read More »प्रेमपत्रावरून दोन कुटुंबांत राडा; 10 जण जखमी
राजकोट : वृत्तसंस्था एका 13 वर्षीय किशोरवयीन मुलाने 10 वर्षांच्या मुलीला प्रेमपत्र लिहिल्याने या दोघांच्या परिवारातील मंडळी एकमेकांशी भिडल्याची घटना घडली. या घटनेत जवळपास 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील गोलिडा आनंदपूरमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा हा सतत मुलीसोबत छेडछाड करत होता. तिच्या शाळेच्या …
Read More »लग्नसोहळ्यात हवेत गोळीबार; डान्सर तरुणीचा मृत्यू
सहरसा ः वृत्तसंस्था बिहारमधील सहरसा जिल्ह्यामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाह सोहळ्यात हवेत गोळीबार केल्यामुळे डान्सर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकृती सिंह ऊर्फ मधू असं मृत्यू झालेल्या डान्सरचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील एका गावामध्ये विवाह सोहळ्यानिमित्त डान्सच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »‘शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे’
पुणे ः प्रतिनिधी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करायची असेल, तर सरकार एकाच पक्षाचे असावे, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. लोणीकाळभोर येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या पदवीप्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विश्वनाथ कराड, गायिका उषा मंगेशकर, मंगेश कराड, संजय काटकर, सुधाकर नाडकर्णी आदी मान्यवर व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper