Breaking News

महत्वाच्या बातम्या

भिंगारी येथे शॉटसर्किट मुळे कारला आग

पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील भिंगरी येथील एचपी पेट्रोलपंपा जवळ एका महिंद्रा एक्सव्ही गाडीला शॉटसर्किट मुळे अचानकपणे आग लागल्याची घटना आज दुपारी एक वाजल्याच्या सुमारास घडली आहे. पळस्पे बाजूकडून पनवेल बाजूकडे जाणार्‍या रस्तावरुन सिल्वर रंगाची महिंद्रा एक्सव्ही गाडी नंबर एमएच 04 एफएफ 9329 घेऊन दोघेजण येत असताना अचानकपणे गाडीच्या बोनेट …

Read More »

खोपोली भाजप युवा मोर्चातर्फे पत्रकारांचा सन्मान

खोपोली ः प्रतिनिधी भाजप युवा मोर्चातर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 6) खोपोली व खालापूर तालुक्यातील पत्रकारांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम शहर युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर व शहर सरचिटणीस विनायक मांडपे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद …

Read More »

मॅनेजरने हॉटेल मालकाला लावला पाच लाखांना चुना

महाड ः प्रतिनिधी      महाड शहरानजीक असलेल्या पी. जी. रिजेन्सी हॉटेल अँड रिसॉर्ट येथे काम करणार्‍या मॅनेजरने हॉटेल मालकला पाच लाखांचा चुना लावून पलायन केले. पी. जी. रिजेन्सी हॉटेल अँड रिसॉर्ट येथे मोहित सतीश बाली (रा. नाशिक) हा मॅनेजर म्हणून काम करीत होता. एप्रिल ते ऑक्टोबर 2022 यादरम्यान त्याने हॉटेलमध्ये येणार्‍या …

Read More »

आचार्य जांभेकरांच्या पोंभुर्ले गावी सुधारणा करणार -ना. रवींद्र चव्हाण

दर्पण पुरस्कारांचे पत्रकारांना वितरण पोलादपूर ः प्रतिनिधी पत्रकारितेद्वारे ठाम मत मांडण्याची परंपरा दर्पणने सुरू केली. बाळशास्त्रींनी दर्पण मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीला आरसा दाखवला, तेच काम पत्रकारितेत आजही सुरू आहे. त्यामुळेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या पोंभुर्ले गावी सुधारणा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे …

Read More »

सामान्य माणसाशी असलेली नाळ तोडू नका

आमदार भरत गोगावले यांचा डॉक्टरांना मौलिक सल्ला महाड ः प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण महाग होत असेल, तरी चांगल्या शिक्षणातून चांगले डॉक्टर घडत आहेत, मात्र डॉक्टरांनी सर्वसामान्य माणसाशी असलेली नाळ तोडता कामा नये असा सल्ला आमदार भारत गोगावले यांनी दिला. रायगड मेडिकल असोसिएशनच्या 23व्या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. महाडमधील डॉ. …

Read More »

उल्हास नदीकिनारा होतोय हिरवागार

निर्मल जल अभियानातर्फे वृक्षलागवड व संवर्धन कर्जत ः प्रतिनिधी उल्हास नदी निर्मल जल अभियानातर्फे कर्जत उल्हास नदीकिनारी संत तुकाराम घाट आणि संत ज्ञानेश्वर घाटावर वृक्षलागवड करून गेल्या पावणेचार वर्षांपासून त्यांचे संवर्धनाचे काम अभियानातर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकिनारा आता हिरवागार दिसत असून कर्जतकरांमधून समाधान व्यक्त होत आहे. आत्तापर्यंत संस्थेने तसेच …

Read More »

शेतीला पुरक व्यवसायही केले पाहिजेत : मंत्री अतुल सावे

क्षात्रैक्य कृषक महोत्सवास सुरुवात अलिबाग ः प्रतिनिधी  आजच्या पिढीला शेतीत रस नाही. त्यांना चांगल्या पगाराच्या नोकर्‍या हव्या आहेत, परंतु शेतीदेखील चांगले क्षेत्र आहे. त्यात मनापासून काम केले तर चांगले उत्पन्न मिळू शकते, परंतु केवळ शेती करून चालणार नाही. शेतीला पुरक व्यवसायदेखील केले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याचे सहकार आणि ओबीसी कल्याण …

Read More »

एसटी कामगार संघटनेचा संवाद मेळाव्या विविध विषयांवर चर्चा

पेण ः प्रतिनिधी रायगड विभागाच्या एसटी कामगार संघटनेच्या संवाद मेळावा पेण येथील महाकाली हॉल येथे उत्साहात झाला. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांच्याबरोबर कर्मचार्‍यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. कर्मचार्‍यांना राज्य शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन द्यावे, प्रलंबित आर्थिक मागण्याची पूर्तता तातडीने करण्यात यावी, याबाबतची मागणी …

Read More »

अपघातग्रस्तांसाठी खोपोलीचा आधार; आपत्कालीन स्थितीत मदत बनली चळवळ

खोपोली ः प्रतिनिधी खोपोली शहर पुणे व मुंबई या दोन महानगरातील मध्यवर्ती शहर आहे. शहराच्या लागून द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे महामार्ग, लोकल व मोठी औद्योगिक वसाहत असल्याने या परिसरात सतत वेगवेगळ्या प्रकारचे अपघात, दुर्घटना घडत असतात. या सर्व आपत्कालीन स्थितीत येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय सामाजिक संस्था व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांची मदत …

Read More »

खांदा कॉलनीत हरिनाम सप्ताह

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती   पनवेल : रामप्रहर वृत्त श्री संत भगवान बाबा व वामन भाऊ पुण्यतिथीनिमित्त खांदा कॉलनी येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन शनिवा (दि. 7)पासून करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विणापूजन करून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. त्यांच्यासोबत पनवेलच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील याही उपस्थित …

Read More »