Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतीमधील सेवा शुल्क आकारणी बंद

आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या हद्दीतील सिडको वसाहतींमधील सर्व्हिस चार्जेस (सेवा शुल्क) 1 नोव्हेंबर 2022पासून आकारणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत करीत भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको आणि विशेषत्वाने राज्याचे …

Read More »

दिविल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अन्याय

पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुका झाल्यानंतर प्रकर्षाने पुढे आलेली गोष्ट म्हणजे खातेपिते खाते या स्वरूपात निवडणूक विभागाकडे पोलादपूर तहसिलदारांचा दृष्टीकोन आहे. पोलादपूर तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये महिला तहसीलदारांना गेल्या चार पाच वर्षांपासून तालुका दंडाधिकारी पदावरून बेकायदेशीररित्या हितसंबंध जोपासण्याची संधी प्राप्त झाली आहे. पर्यायाने लोकशाहीची खुलेआम मुस्कटदाबी सुरू असल्याचे दिसून आले …

Read More »

करावे तसे भरावे

‘खातो नथी, खावा देतो नथी’ असा नरेंद्र मोदी यांचा जुनाच लौकिक होता, तो मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतरही कायम राहिला. भ्रष्ट पुढार्‍यांकडे करड्या आवाजात खुलासा मागणारे कुणी तरी सत्तेवर आल्याचा आनंद भारतीय जनतेला मात्र झाला. भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई आजही जोरात सुरू आहे. आणि त्याच्याच झळा महाराष्ट्रातील काही नेत्यांना लागत आहेत. मतांची बेगमी …

Read More »

खालापूरवासियांना विकासाची प्रतिक्षा

खोपोली: प्रतिनिधी नगरपंचायत खालापूरमध्ये वर्षभरात ठोस विकास कामे झाली नसून, केवळ बॅनरच्या माध्यमातून विकासनिधीचे आकडे खालापूर नागरिकांना पहायला मिळाले आहेत. खालापूर नगरपंचायत निवडणूकिला जानेवारी वर्ष पूर्ण होत आहे. सत्तापूर्तीचे वर्ष साजरे होत असताना ठळक असे विकास काम दृष्टीस पडलेले नाही. खालापूर नगरपंचायत हद्दीत कोट्यवधीची  विविध विकासकामे आणल्याचे बॅनर अनेकदा दर्शनी …

Read More »

रायगड जिल्ह्यात भूजल पातळी घटतेय

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस भूजल पातळी घटत चालली आहे. महाड, पोलादपूर, सुधागड या सारख्या डोंगराळ आणि चांगले पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये देखील भूजलपातळी घटत आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 0.49 मीटर एवढे  आहे.  पाणी समस्येचा अचूक अंदाज यावा म्हणून  भुजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण केले जाते. यात गेल्या …

Read More »

राज्य बालनाट्य स्पर्धेत रायगडचे कलाकर चमकले

बळी नाटकाला रसिकांची दाद; सहकलाकारांचा सन्मान पाली : प्रतिनिधी 19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत अम्युचर थिएटर नागोठणे रायगड प्रस्तुत बळी या नाटकातील बालकरांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रायगडच्या झोतिरपाडा बेणसे येथील पायल कुथे व अन्य  बाल कलाकरांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला. बळी नाटकाला नाट्यरसिकांनी भरभरून दाद दिली. तसेच अभिनयासाठी …

Read More »

चौक विभागातून भाजपात इनकमिंग सुरूच

कार्यकर्त्यांचा आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत प्रवेश खोपोली, उरण : प्रतिनिधी, वार्ताहर खालापूर तालुक्यात महाविकास आघाडीला खिंडार पडले असून चौक जिल्हा परिषद विभागातील टेंभरी ग्रामपंचायतीमधील शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 11) प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना …

Read More »

‘सिनेट’ सदस्यपदी मयुरेश नेतकर यांची नेमणूक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली नियुक्ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्यपदी पनवेल येथील मयुरेश नेतकर यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल मयुरेश नेतकर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते …

Read More »

‘दिबां’च्या प्रतिमेचे नवी मुंबई महापालिकेने पूजन करावे

विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका अनेक युगपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करुन त्यांच्या कार्याला उजाळा देवून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहे. त्यानुसार लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त (13 जानेवारी) महापालिकेने ‘दिबां’च्या प्रतिमेचे पूजन करावे, अशी मागणी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ …

Read More »

पनवेल पोलिसांच्या वतीने समाजप्रबोधन कार्यक्रम

पनवेल ः वार्ताहर पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून 2 जानेवारी ते 08 जानेवारी रोजी दरम्यान पोलीस रेजिंग डे सप्ताह पनवेल तालुका पोलिसांच्या वतीने साजरा करण्यात आला. पनवेल तालुका पोलिसांमार्फत परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त पकंज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल परिसरात विविध समाजप्रबोधन उपक्रम  राबवण्यात आले. यामध्ये नशा मुक्ती व सायबर गुन्ह्याबाबत …

Read More »