Breaking News

महत्वाच्या बातम्या

खोपोलीजवळ टँकर वेल्डिंगदरम्यान स्फोट; दोन जण गंभीर

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर रिकाम्या पेट्रोल टँकरला वेल्डिंग करीत असताना स्फोट होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी 1.30च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे महामार्गावर हाळ गावच्या हद्दीत सागर हॉटेलसमोरील गॅरेजमध्ये एका रिकाम्या पेट्रोल टँकरचे (एमएच 49 बीएफ 7570) वेल्डिंग काम सुरू होते. या वेळी …

Read More »

सीमाप्रश्नी महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर

नागपूर : प्रतिनिधी कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंच न् इंच जागा महाराष्ट्राचीच असून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे, निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे असल्याचा ठराव मंगळवारी (दि. 27) महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या …

Read More »

अलिबाग शहापूर येथे उधाणाचा तडाखा

22 घरांसह 300 एकर शेतीला फटका अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील शहापूर येथे सोमवारी (दि. 26) पहाटे 3 वाजता उधाणाचे पाणी घरात शिरल्याची घटना घडली. यामुळे 22 घरांसह 300 एकर शेतीला या उधाणाचा तडाखा बसला. सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास शहापूर गावाला उधाणाच्या पाण्याने वेढा दिला. गाढ झोपेत असलेल्या गावकर्‍यांची यामुळे …

Read More »

आगरकोट किल्ल्याला गतवैभव मिळणार!

केंद्रीय पुरातत्व विभागाकडून प्रवेशद्वाराची डागडुजी रेवदंडा : प्रतिनिधी केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पुढाकाराने रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या (चौकोनी बुरूज) डागडुजीचे काम सुरू झाल्याने इतिहासप्रेमींनी समाधान व्यक्त केले. रेवदंडा आगरकोट किल्ला ढासळत असल्याने याकडे इतिहासप्रेमींनी अनेक वेळा केंद्रीय पुरातत्व खात्याचे लक्ष वेधले होते. अखेर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या …

Read More »

नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलिसांची फौज तैनात

अलिबाग : प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी  रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी 86 ठिकाणी 90 वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. अतिउत्साही पर्यटकांवर, मद्यपान …

Read More »

कोणाच्या बापाची हिंमत?

सीमावासियांचा पुळका महाविकास आघाडीच्या नेत्यांना सध्या आलेला दिसतो, पण महाविकास आघाडीचे हेच नेते चार महिन्यांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रातील सत्तेचे लोणी वाटून खाण्यात मश्गूल होते. त्यांच्याच काळात सीमावासियांसाठी असलेल्या योजना धडाधड बंद झाल्या, हे लोक विसरलेले नाहीत, तर शिंदे-फडणवीस सरकारने या योजना सत्तेवर येताच पुन्हा सुरू केल्या. कर्नाटकचा निषेध करणारा ठराव विधिमंडळात बहुदा …

Read More »

पनवेल महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे नागरिकांना आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील पनवेल शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, उन्हाळ्यातील पाणी टंचाई लक्षात घेता 15 जून 2023 पर्यंत पाणी पुरविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या दृष्टीने 26 डिसेंबरपासून पनवेल शहरामध्ये उंच जलकुंभ निहाय एक भाग आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारी सुभेदार वाडा, …

Read More »

पनवेलच्या फडके नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांना भाडे सवलत

भाजप सांस्कृतिक सेलच्या पाठपुराव्याला यश पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका मालकीच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांच्या भाडेदरांमध्ये 75 टक्के सवलत देण्याचा निर्णय पनवेल महापालिका प्रशासनाने आहे. या कामी भारतीय जनता पक्षाने पाठपुरावा केला होता. यासंदर्भात 4 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र भाजप सांस्कृतिक सेलच्या पदाधिकार्‍यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर …

Read More »

भाजयुमोच्या वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा यांच्या वतीने भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त रविवारी (दि. 25) वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच अभिवादन करून या स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. …

Read More »

कोरोना रोखण्यासाठी पनवेल मनपा सज्ज

पनवेल : प्रतिनिधी चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका प्रशासनाच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्या वतीने विविध पातळ्यांवरती तयारी करण्यास सुरूवात केली आहे. कळंबोली येथे कोविड समर्पित रूग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत तसेच महापालिका स्वत:ची आरटीपीसीआर लॅब सुरू करणार आहे. …

Read More »