पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप जगातील एक नंबरचा पक्ष आहे आणि त्या पक्षातील निवडून आलेले ग्रामपंचायतीचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शनिवार, दि. 24) येथे केले. देशाचे माजी पंतप्रधान …
Read More »नाताळ साजरा करण्यासाठी अलिबागला पसंती
अलिबाग : प्रतिनिधी नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटकांनी अलिबागला पसंती दिली आहे. अलिबाग शहर आणि आसपासच्या परिसरातील हॉटेल्स, ग्रामीण भागातील कॉटेजेसची बुकिंक फूल्ल झाली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायिक सध्या खुश आहेत. नाताळ साजरा करण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक अलिबागला येत असतात. कोविडमुळे दोन वर्षे पर्याटक येऊ शकले नव्हते. यंदा …
Read More »भाजप नेते अॅड. चेतन पाटील यांच्याकडून मुरूडमधील मासळी शेडची पाहणी
मुरूड : प्रतिनिधी भाजप आमदार रमेश पाटील यांनी दिलेल्या आमदार निधीतून मुरूड मासळी मार्केटच्या पाठिमागील शेड नव्याने बांधण्यात येत आहे. हे काम तत्परतेने मार्गी लागण्यासाठी भाजप मच्छीमार सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड. चेतन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 23) या ठिकाणी भेट देऊन कामाची पहाणी केली. व ठेकेदाराला लवकरात लवकर काम …
Read More »श्रीवर्धनकरांना होतोय धुळीचा त्रास
रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था करण्याची मागणी श्रीवर्धन : प्रतिनिधी शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी जेसीबीनेे खोदकाम केले जात आहे. जलवाहिन्या टाकून झाल्यानंतर माती पसरून खोदकाम बुजवण्यात येत आहे. त्यामुळे श्रीवर्धन शहरातील नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सत्तरच्या दशकामध्ये रानवली या गावी बांधण्यात …
Read More »नांदगाव-भिंगारी रस्त्याचे रुंदीकरण
भाजपचे अजय बहिरा यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव-भिंगारी गावातील गणपती विसर्जन घाटाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास महापालिकेमार्फत सुरुवात झाली आहे. नांदगाव-भिंगारी रस्ता हा अरुंद असल्याने नागरिकांना तेथुन दुचाकी व चारचाकी वाहनांना तेथून ये-जा करण्यास समस्या उद्भवत होत्या. तसेच या रस्त्यावर …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक पलटी; चालकाचा मृत्यू
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली एक्झिटजवळ शुक्रवारी (दि. 23) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सिमेंटच्या गोणी भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन त्याने पुढे चाललेल्या ट्रकला धडक देऊन पलटी झाला. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकमधील सिमेंटच्या गोणी रस्त्यावर पसरल्याने महामार्गावरील वाहतूक काहीकाळ बाधित झाली होती. सिमेंटच्या गोणी घेऊन …
Read More »गव्हाण हद्दीतील गावांमध्ये सोयीसुविधा द्या
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सिडको प्रशासनाला सूचना बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये पायाभूत सुविधा मिळण्यासंदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 23) सिडको प्रशासनासोबत चर्चा केली. उलवे नोड रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉॅम्प्लेक्समध्ये झालेल्या बैठकीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …
Read More »खालापुरात ब्लास्टिंगमध्ये माय-लेकाचा मृत्यू
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी पनवेल-कर्जत रेल्वेच्या दुसर्या मार्गाचे काम सुरू असताना ब्लास्टिंगमुळे उडालेले दगड कर्जत-चौक या मुख्य रस्त्यावर येऊन आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी 5.30च्या सुमारास घडली. देवकाबाई महादू बडेकर (वय 60) आणि त्यांचा मुलगा सचिव …
Read More »१०२ दिव्यांगांना मिळाले जयपूर फूटचा आधार
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल आणि साधू वासवानी मिशन पुणे यांचा कौतुकास्पद उपक्रम पनवेल-प्रतिनिधी जनसेवेचा वसा असाच कायम सुरूच ठेवणार असून सामान्य परिवाराला सन्मानाने जीवन जगता आल पाहिजे या भावनेतून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ काम करत असल्याचे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी येथे …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी शिलेदारांचा शनिवारी सत्कार
पनवेल-प्रतिनिधी देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिनानिमित्त उत्तर रायगड भाजपच्यावतीने ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा पनवेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पनवेल, उरण, कर्जत व खालापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकताच पार पडल्या. या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या शिलेदारांचा भाजपचे रायगड जिल्हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper