Breaking News

महत्वाच्या बातम्या

वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा; तूर्तास उपोषण स्थगित

पनवेल : वार्ताहर, उरण : बातमीदार महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सोमवारी (दि. 28) खांदा कॉलनी येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते, परंतु वरिष्ठ पातळीवर सकारत्मक चर्चा झाल्याने तूर्तास हे बेमुदत उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न – …

Read More »

‘सीकेटी’त कागदी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात राष्ट्रीय कैडेट कोर विभाग व दृष्टी फाउंडेशन यांच्या समन्वयाने    रविवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता बहुउद्देशीय कागदी पिशव्या कसे बनवायचे या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी दृष्टी फाउंडेशनचे …

Read More »

मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात 42 दुचाकींना आग

पनवेल : वार्ताहर हार्बर रेल्वे मार्गांवरील मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात गवताला आग लागून परिसरात उभ्या असलेल्या तब्बल 42 दुचाकी आगीच्या भक्षस्थानी पडल्या. सोमवारी (दि. 28) सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच कळंबोली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ते आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु या भीषण …

Read More »

जासई उड्डाणपूल 2023मध्ये खुला

रखडलेले काम लवकरच होणार पूर्ण, नव्या सरकारच्या कार्यवाहीमुळे वेग उरण : प्रतिनिधी उरण ते पनवेल व नवी मुंबई यांना जोडणार्‍या उड्डाणपूल मार्च 2023ला हा पूल प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला जाणारा असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मार्गावरील प्रवासी व वाहतूकदार यांनी आनंद व्यक्त …

Read More »

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची शुक्रवारपासून अंतिम फेरी

ज्येष्ठ कलावंत, रंगकर्मी जयंत सावरकर यांचा ’गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 9 व्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम …

Read More »

विविध ठिकाणी संविधान दिन साजरा

ग्रंथालयात संविधान विशेष दालनाचा शुभारंभ नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 15 येथील ग्रंथालयात 18 विषयांनुसार तीन हजारांहून अधिक ग्रंथांची विषयनिहाय आकर्षक मांडणी केलेली आहे. यामध्ये अधिक सुनियोजितता आणत संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयामध्येच ‘संविधान विशेष‘ स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. या दालनाचा शुभारंभ महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते …

Read More »

अखेर माथेरानमध्ये ई-रिक्षा धावणार!

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार प्रारंभ कर्जत : विजय मांडे प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरानमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ई-रिक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांची दमछाक दूर होईल. त्याचबरोबर हातरिक्षाची अमानवी प्रथा हद्दपार होणार आहे. ई-रिक्षेचे विद्यार्थ्यांसाठी पाच रुपये, तर माथेरानचे नागरिक व पर्यटकांसाठी 35 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. माथेरान हे मुंबई …

Read More »

वाहन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

अलिबाग : प्रतिनिधी वाहन चोरी करणारी एक आंतरराज्यीय टोळी रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाने जेरबंद केली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 30 लाख रुपये किमती एकूण 12 वाहने पोलीसांनी जप्त केली आहे. या टोळीला जेरबंद केल्यामुळे राज्यभरातील विवीध भागातील 12 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना …

Read More »

महाराष्ट्रात लोकाभिमुख सरकार -चित्रा वाघ

खोपोली : प्रतिनिधी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार हे लोकाभिमुख व सर्वसामान्यांचे सरकार आहे. महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या सर्वांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत, ही जबाबदारी तुमची व माझी आहे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी रविवारी (दि. 27) खोपोली येथे केले. त्या महिला मेळाव्यात बोलत …

Read More »

पालीच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा समर्थकांसह भाजपमध्ये दाखल

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का मुंबई : प्रतिनिधी पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गीता पालरेचा यांनी सोमवारी (दि. 28) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पालरेचा आणि …

Read More »