Breaking News

महत्वाच्या बातम्या

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीनजीक अपघातात सहा जणांचा मृत्यू, दोघे जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीनजीक ढेकू गावाच्या हद्दीत गुरुवारी (दि. 17) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एर्टिगा कारने पुढे जाणार्‍या अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील सहा जणांचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्याहून मुंबईकडे येणार्‍या …

Read More »

प्रसिद्धीसाठी स्वातंत्र्यवीरांवर टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना फटकारले मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रसारमाध्यमांकडून जास्त प्रसिद्धी मिळत नव्हती. ती मिळावी म्हणून ते वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फटकारले आहे. राहुल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यासंदर्भात …

Read More »

भगवान बिरसा मुंडा चषक क्रिकेट स्पर्धा

भाजप नेते संजय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त महान जनजाती स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती व राष्ट्रीय जनजाती गौरव दिन पनवेल तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा होत आहे. त्या अंतर्गत वनवासी कल्याण आश्रम आणि पनवेल तालुका भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून तसेच भाजप रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

रिटघरच्या श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत यश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती प्रकारात रयत शिक्षण संस्थेच्या रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते उच्च माध्यमिक विद्यालयाने यश प्राप्त केले आहे. विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. नावडे येथील प. जो. म्हात्रे विद्यालय येथे झालेल्या तालुका क्रीडा स्पर्धेत श्री भैरवदेव विद्यालय व …

Read More »

विद्यार्थ्यांनी घेतली टपाल, बँकेच्या कामांची माहिती

सीकेटी विद्यालयातर्फे क्षेत्रभेटी नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय मराठी प्राथमिक विभागाच्या वतीने बुधवारी (दि. 16) इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांची पोस्ट ऑफिस, व गुरुवारी (दि. 17) इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची अभ्युदय बँक नवीन पनवेल येथे क्षेत्रभेट देण्यात आली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसचे व्यवहार …

Read More »

भाजपच्या पाठपुराव्याने तळोजा सबवेची दुरुस्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाने केलेल्या पाठपुरावामुळ तळोजा येथील भुयारी मार्गात होणारी पाणी गळती थांबविण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. तळोजा (पाचनंदनगर) वसाहतीचे प्रवेशद्वार भुयारी मार्गात पाणी साचण्याची समस्या वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष निर्दोश केणी यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन …

Read More »

गुंडाच्या मालमत्तेवर हातोडा

विकी देशमुखच्या घराभोवतीचे बांधकाम पाडले पनवेल : रामप्रहर वृत्त योगी आदीत्यनाथ पॅटर्न राबवून नवी मुंबई पोलिसांनी तसेच सिडकोने कुख्यात गुंड विकी देशमुख यांच्या घराभोवती असणारे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. खून, बलात्कार, खंडणी, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्हे करुन विकी देशमुख यांचे पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरामध्ये दहशत माजवली होती. …

Read More »

सागरी सुरक्षा अभियानांतर्गत किनार्‍यांवर दक्षता

उरण : वार्ताहर मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर दरवर्षी पोलीस यंत्रणेकडून सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येते. यावर्षी मंगळवारी (दि. 15) या अभियानाला सकाळी सुरुवात झाली. या अभियानात उरणमधील सर्व सागरी किनार्‍यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील हद्दीत प्रवेश करणार्‍यांची ही पोलिसांकडून तपासणी केली जात …

Read More »

रेल्वे स्टेशन परिसरात चोरांचा सुळसुळाट

पनवेलसह नवी मुंबईत दररोज वाहनचोरीच्या घटना नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त रेल्वेस्थानकासमोरील मोकळ्या जागेवर स्वत:चे वाहने उभे करून झटपट लोकल पकडण्यासाठी अनेक नोकरवर्गाची धावपळ पहायला मिळते, मात्र मुंबईतून पुन्हा परतल्यावर स्वत:चे वाहन उभे केलेल्या ठिकाणी नसल्याचे पाहिल्यावर वाहनाची शोधाशोध सुरू होते. अखेर सर्वत्र शोधल्यानंतर वाहन मिळत नसल्याची खात्री झाल्यावर …

Read More »

पनवेलमध्ये सुवर्णा भात जातीच्या पिकाचा पीक कापणी प्रयोग पूर्ण

अलिबाग : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रात पिकांच्या उत्पादनाची माहिती अंतिम करण्यासाठी 1944 सालापासून खरीप व रब्बी हंगामात पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी पीक कापणी प्रयोगाकरीता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील सुधारीत यादीनुसार गावनिहाय एकूण 18 (एका गावासाठी प्रत्येकी दोन असे एकूण 36) पीक कापणी प्रयोग …

Read More »